10th 12th 10000 Scholarship In Marathi जर तुम्ही नुकतीच दहावी किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! आता तुम्हाला मिळणार तब्बल ₹10,000 ची शिष्यवृत्ती! विशेष म्हणजे, जर तुम्हाला परीक्षेत ५०% पेक्षा जास्त गुण मिळाले असतील, तरीही तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी घेऊन येत आहे एक खास आर्थिक सहाय्य योजना.
10th 12th 10000 Scholarship In Marathi
10th 12th 10000 Scholarship संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण ९४ टक्के निकाल लागला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली. राज्य सरकारकडून कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून एक महत्त्वाची योजना राबवली जाते. ‘दहावी – बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना’ असे योजनेचे नाव आहे.
कोणाला मिळणार ही आर्थिक मदत?
राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी ही खास शिष्यवृत्ती योजना आहे. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना याचा लाभ मिळेल.
काय आहे ही योजना?
महाराष्ट्र सरकारची ‘दहावी – बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य’ योजना बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या योजनेत, दहावी आणि बारावीमध्ये ५०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या कामगारांच्या मुलांना ₹10,000 चे आर्थिक सहाय्य मिळते.
योजनेसाठी पात्रता काय आहेत?
* अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत सदस्याचा मुलगा/मुलगी असावा.
* विद्यार्थ्याने दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत किमान ५०% गुण मिळवलेले असावेत.
* ही शिष्यवृत्ती बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त दोन मुलांना मिळू शकते.
* अर्जदार आणि त्याचे कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
अधिक माहिती Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
अधिक माहिती Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
10th 12th 10000 Scholarship
अर्ज कसा करायचा?
- ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार.
- अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक कामगार कल्याण कार्यालयामार्फत माहिती मिळवा.
कसा डाउनलोड करा अर्ज ?
- शिष्यवृत्तीसाठी, तुम्हाला MBOCWW च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- येथे तुम्हाला कल्याण योजना टॅबवर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला यादीत दुसऱ्या क्रमांकावर शिक्षण टॅब मिळेल.
- यापैकी, 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांच्या 10000/ क्लिक करा.
- येथे तुम्हाला खाली डाउनलोड फॉर्मचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
Disclaimer :
10th 12th 10000 Scholarship In Marathi वरील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केली गेली आहे. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शासकीय कार्यालयांतून सविस्तर माहिती घ्यावी. या योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल स्वतः चौकशी करून खात्री करावी. या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.