अकरावीत ऑनलाईन प्रवेश कसा घ्यायचा? कॉलेज कसे निवडावे? स्टेप बाय स्टेप प्रोसेस मराठीमध्ये संपूर्ण माहिती पहा | 11th Admission Online Form In Marathi

11th Admission Online Form In Marathi आज आपण पाहणार आहोत की अकरावी मध्ये आपल्याला प्रवेश कसा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे कोणती लिंक असेल आणि कॉलेजच्या ऍडमिशनच्या तारखा काय असतील कॉलेज कसे निवडायचे कोणता अर्ज कसा करायचा याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण नेमकी पूर्ण प्रोसेस बघूयात.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

11th Admission Online Form In Marathi

11th Admission Online Form संपूर्ण माहिती :

महाराष्ट्र राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये निकाल हा महत्त्वाचा असतो दहावीचा निकाल लागला यामध्ये मुलींनी परत एकदा बाजी मारली आहे आणि जवळपास विद्यार्थ्यांना थोडंसं अपयश काही मुलांना यश प्राप्त झालेला आहे राज्यात 94.2% निकाल लागलेला आहे विद्यार्थी आता पुढच्या प्रतीक्षेत आहेत की आपल्याला पुढे प्रवेश कसा घ्यायचा

कॉलेज कसे निवडायचे या संपूर्ण गोंधळात आहेत की लिंक कुठल्या असेल ऍडमिशन ची तारीख काय असेल या सर्व प्रोसेस मध्ये त्यांचा वेळ जात आहे तुम्हाला आता या लेखनामध्ये सर्व माहिती मिळणार आहे यावर्षी महाराष्ट्र शासनाने सांगितले की महाराष्ट्रात सर्वत्र अकरावीचे प्रवेशी ऑनलाईन होणार आहे तर याविषयी आपण संपूर्ण माहिती बघुयात.

अकरावी प्रवेश प्रक्रिया तारीख :

19 मे 2025 पासून अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. (11th Admission Online Form In Marathi) 19 मे पासून तुम्ही ऑनलाइन अप्लाय करु शकतात. महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी पोर्टल सुरु करुन दिले आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करु शकतात. यासाठी 100 रुपये फी भरावी लागणार आहे.

11th Admission Online Form

१. वेबसाइटला भेट द्या :
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट [11thadmission.org.in](https://11thadmission.org.in/)वर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे रहिवासी ठिकाणी निवडायचे आहे. (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक)
२. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन :
होमपेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल.
यात तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल ही वैयक्तिक माहिती भरायची आहे.
यानंतर तुमचा १०वीचा सीट नंबर, वर्ष, बोर्ड ही माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे द्या. यानंतर एक पासवर्ड ठेवून रजिस्ट्रशेन करा.
३. लॉग इन आयडी तयार :
यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचा लॉग इन आयडी आणि अॅप्लिकेशन नंबर तयार होईल. हा नंबर तुमच्याजवळ ठेवा.
४. फॉर्म १ भरा (11th Admission Form 1) :
यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. त्याची उत्तरे द्या.
तुम्हाला तुमचा पत्ता, पालकांचे फोन नंबर,व्यवसाय याबाबत माहिती द्यायची आहे.
यानंतर तुम्हाला SC/ST/OBC/EWS कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे.
५. कागदपत्रे अपलोड करा :
यानंतर तुम्हाला दहावीचे मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागेल.
यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेटदेखील अपलोड करावे लागेल.
६.रजिस्ट्रेशन फी भरा :
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ती भरु शकतात.
7. फॉर्म २ भरा :
(11th Admission Online Form In Marathi) यानंतर तुम्ही फॉर्म १ भरल्यानंतर तो फॉर्म लॉक करा.
यानंतर पुन्हा एकदा लॉग इन केल्यावर तुमचे रहिवासी ठिकाण टाका.
यानंतर तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी विचारली जाईल. तुम्हाला जे कॉलेज हवे आहे त्याी यादी टाका.
यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे.
८. मेरिट लिस्ट :
यानंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. एकूण ३-४ मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे.
यानंतर तुम्हाला कॉलेज लागेल. जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे कॉलेज लागले तर तुम्हाला अॅडमिशन घ्यावे लागेल.
जर तुम्हाला जे कॉलेज लागले आहे त्यासाठी तुम्हाला अॅडमिशन घ्यायचे नसेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरु शकतात. (11th Admission Online Form In Marathi)

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ दहावीचा निकाल जाहीर, नेहमी प्रमाणे मुलींची बाजी, “या” जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

Leave a Comment