Realme GT 6 पॉवरफुल फोन भारतात लॉंच झाला आहे. त्याचबरोबर फोनचे स्पेसिफिकेशन, किंमती आणि स्टोरेज Realme कंपनीने जाहीर केले आहे. realme gt 6 तीन व्हेरिएंटमध्ये सादर करून पूर्ण मार्केटमध्ये खळबळ उडून दिलेली आहे सर्व सोशल मीडियावर या AI स्मार्टफोनची चर्चा चाललेली आहे. हा फोन अनेक AI फीचर्ससह उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. Realme कंपनीने या आधी Realme GT 6T लॉन्च केला होता त्यापुढेच व्हर्जन म्हणजे आता Realme GT 6 लॉंच केला याफोन मध्ये Next जनरेशन AI फीचर्स आहेत . पहिल्या खरेदीमध्ये कंपनी आकर्षक डिस्काउंट देत आहे. चला तर मग आपण या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, किंमती आणि सर्व फीचर्स पाहूया.
Realme GT 6 माहिती
Realme कंपनीने आपल्या GT सिरीजमधील नवीन स्मार्ट फोन 20 जून 2024 रोजी Realme GT 6 लॉंच केला त्यासोबत हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे त्याचबरोबर या तीन मोडलेच्या किंमती समोर आलेल्या आहेत. हा रिलमी कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप AI स्मार्टफोन आहे असे कंपनीने जाहीर केले आहे. या फोनच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर Snapdragon 8s Gen 3 आहे. 120Hz रिफ्रेश रेट आहे. FHD AMOLED डिस्प्ले या फोनला देण्यात आलेला आहे.
कॅमेरा बद्दल बोलायचं झाले तर 50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा आहे आणि विडिओ कॉललिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनची बॅटरी पॉवरफुल 5500mAh पर्यंत आहे. फोनची विक्री 25 जून 2024 पासून अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरून करून शकतात.
Realme GT 6 Variants
रिअलमी कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये फोन लॉंच केलेला आहे आणि या फोनची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे हे तीन व्हेरिएंट पुढीलप्रमाणे
- 16 GB RAM + 512 GB storage
- 12 GB RAM + 256 GB storage
- 8 GB RAM + 256 GB storage
Realme GT 6 किंमत
रिअलमी GT 6 पहिला व्हेरिएंट 16GB RAM + 512GB स्टोरेजची किंमत 44,999- रुपये इतकी आहे.
रिअलमी GT 6 दुसरा व्हेरिएंट 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 42,999/- रुपये इतकी आहे.
रिअलमी GT 6 तिसरा व्हेरिएंट 8GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 40,999/- रुपये इतकी आहे.
24 जून 2024 पासून हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीला उपलब्ध होणार आहे. फोनवर ऑफरबद्दल माहिती अशी आहे की, बँक कार्डवर 4000 रुपये सूट उपलब्ध होणार आहे आणि पहिल्या सेल दरम्यान ICICI बँक कार्डवर रुपये 2000/- चा डिस्काउंट मिळणार आहे.
Realme GT 6 दोन कलरमध्ये उपलब्ध आहे एक म्हणजे फुअल्ड सिल्वर (Fluid Silver) आणि दुसरा रेझर ग्रीन (Razor Green) हे दोन कलरमध्ये पर्याय आहेत.
हे पण वाचा ⇓
motorola edge 50 ultra | AI च्या जगात, No 1 AI स्मार्टफोन लॉंच | संपूर्ण स्पेसिफिकेशन आणि माहिती
vivo x fold 3 pro | भारतातील पहिला स्लिम फोल्डेबल फोनबद्दल संपूर्ण माहिती
Realme GT 6 स्पेसिफिकेशन
20 जून 2024 रोजी रिअलमी GT 6 भारतात लॉंच झाला आहे. अतिशय आकर्षक फीचर्स आहेत फोनचे स्पेसिफिकेशन पुढीलप्रमाणे
*प्रोसेसर*
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने असा आहे. रॅम आणि स्टोरेज तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 14 वर चालतो या सोबत 4 वर्षासाठी OS अपडेट दिलेले आहे. आणि 4 वर्षासाठी सुरक्षा अपडेट भेटत आहे. असे Realme कंपनीने घोषित केले आहे.
*डिस्प्ले*
रिअलमी GT 6 चा डिस्प्ले 6.78 इंच चा डिस्प्ले मिळतो स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि 6000 नीट्सची पीक ब्राईटनेट्स 2780X1264 पिक्सेल रिज्युअलशन आहे. SGS A ग्रॅड सनलाईट रेडिबल सर्टिफिकेशन मिळत आहे.
*रॅम आणि स्टोरेज*
16 GB RAM + 512 GB storage
12 GB RAM + 256 GB storage
8 GB RAM + 256 GB storage
*कॅमेरा*
फोटोग्राफीसाठी रिअलमी कंपनीने GT 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा Sony LYT – 808 सेन्सर OIS सपोर्ट करतो त्याचसोबत 50 मेगापिक्सेलचा Samsung JN5 कॅमेरा दिला आहे आणि वाईड ऍंगलसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. स्मार्ट सेल्फीसाठी आणि विडिओ कॉललिंगसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
*बॅटरी*
5500mAh ची बॅटरी दिलेली आहे. 120W फास्ट चार्जिंग स्पोर्ट करते. रिअलमी कंपनीचा असा दावा आहे की, फोनची १००% चार्जिंग अवघ्या 26 मिनिटात पूर्ण फोन चार्ज होईल.
*कनेक्टिव्हिटी*
Realme GT 6 फोनमध्ये ड्युअल सिम, WIFI 6 , ब्लूटूथ, आणि NFS
*सॉफ्टवेअर*
Android 14 वर Realme UI 5.0
*मुख्य स्पेसिफिकेशन*
डिस्प्ले | 6.78 इंच (1264 X 2780) पिक्सेल |
रियर कॅमेरा | 50 मेगापिक्सेल +50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल |
बॅटरी | 5500mAh |
फ्रंट कॅमेरा | 32 मेगापिक्सेल |
OS | Android 14 |
वजन | 201.00 ग्रॅम |
डायमेनशन | 162.00 X 65.10 X 8.65 |
कलर | Fluid Silver , Razor Green |
स्पेशल फीचर्स Next AI
Realme GT 6 फोनमध्ये स्पेशल Next AI फीचर्स मिळतात 1. AI Imaging 2. AI Efficiency 3. AI Personification असे AI फीचर्स देण्यात आलेले आहेत तसेच फोनमध्ये AI smart Image matting फीचर्समध्ये फोटो एडिटिंग आणि स्टोरेजची सुविधा मिळते आणि अजून AI night Vision mode जो अंधारात असेल तरी चांगले फोटो आणि विडिओ क्लीक करून देतो. AI फीचर्समुळे तुम्हाला फोटोग्राफीचा पुरेपूर अनुभव घेता येईल.
कलर ऑप्शन
Realme GT 6 दोन कलरमध्ये उपलब्ध आहे एक म्हणजे फुअल्ड सिल्वर (Fluid Silver) आणि दुसरा रेझर ग्रीन (Razor Green) हे दोन कलरमध्ये पर्याय आहेत.
डिस्काउंट ऑफर
हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीला उपलब्ध आहे आणि अधिकृत स्टोरमध्ये सुद्धा हा फोन उपलब्ध आहे. फोनवर ऑफरबद्दल माहिती अशी आहे की, बँक कार्डवर 4000 रुपये सूट उपलब्ध आहे आणि पहिल्या सेल दरम्यान ICICI बँक कार्डवर रुपये 2000/- चा डिस्काउंट मिळणार आहे.
FAQ’s
प्रश्न : Realme GT 6 कधी लॉंच झाला आणि विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल?
उत्तर : Realme GT 6 20 जून 2024 रोजी लॉंच आणि विक्रीसाठी 24 जून 2024 पासून
प्रश्न : कॅमेरा किती मेगापिक्सेल आहे?
उत्तर : 50 मेगापिक्सेल +50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल
प्रश्न : बॅटरी किती आहे?
उत्तर : 5500mAh
प्रश्न : या फोनमध्ये रॅम आणि स्टोरेज किती आहे?
उत्तर : 16 GB RAM + 512 GB storage ,12 GB RAM + 256 GB storage, 8 GB RAM + 256 GB storage
Realme GT 6 Youtube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा ⇐
सारांश :
Realme GT 6 या नवीन बद्दल माहिती आपण या लेखात पाहिली आहे यामध्ये किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अशी माहिती जाणून घेतली आहे. जर तुम्ही नवीन मोबाइल घेण्याचा विचार करत असाल तर Realme GT 6 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या फोन विषयी काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर आम्हाला नक्की कॉमेंट करा. आणि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद ||