Nothing कंपनीने आज Nothing Phone 2a Plus भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. पहिला 50 मेगापिक्सेल कॅमेरा असणारा फोन भारतात लॉन्च झाला आहे. फोनचा प्रोसेसर Media Tek Dimensity 7350 Pro 5G देण्यात आलेला आहे. आणि दोन रियर 50 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेले आहे. AMOLED डिस्प्लेसह असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे. चला तर या नवीन फोनची सर्व माहिती आपण पाहूया
Nothing Phone 2a Plus इंग्लंड मधील प्रसिद्ध फोन ब्रँड Nothing भारतात गाजत आहे. Nothing कंपनीने भारतात दोन व्हिरिएंटमध्ये हा फोन सादर करण्यात आलेला आहे. पहिला व्हिरिएंट 8GB रॅम व 256GB स्टोरेज आणि दुसरा व्हिरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असे दोन व्हिरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. फोनमध्ये ब्लॅक आणि ग्रे कलरचे पर्याय देण्यात आलेले आहे. फोनच्या विक्री बद्दल बोलायचे झाले तर 7 ऑगस्ट 2024 पासून फोन फ्लिपकार्ट, आणि ऑफलाईन स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे.
Nothing Phone 2a Plus माहिती
Nothing कंपनीने नवीन फोन Nothing Phone 2a Plus लॉन्च केला आहे या स्मार्टफोनची खासियत म्हणजे दोन रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेलचे आहे आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा जबरदस्त असा कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनचा प्रोसेसर हा Media Tek Dimensity 7350 Pro 5G देण्यात आलेला आहे. फोनची बॅटरी 5000 mAh ची बसविण्यात आलेली आहे. 50W चा फास्ट चार्जर सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. रिफ्रेश रेट 120Hz आहे. चला तर मग अजून फोनची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
Nothing Phone 2a Plus Price इंडियामध्ये किंमत
Nothing कंपनीने नवीन फोन nothing phone 2a plus दोन व्हिरिएंटमध्ये लॉन्च केला असून त्याच्या किंमती सुद्धा जाहीर केल्या आहे. पहिला व्हिरिएंट 8GB रॅम व 256GB स्टोरेज या व्हिरिएंटची किंमत 29,999/- रुपये आहे. आणि दुसऱ्या व्हिरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज या व्हिरिएंटची किंमत साधारण 31,999/- रुपये इतकी आहे. लॉन्चिंग ऑफेरबद्दल बोलायचे झाले तर, या फोनवर 2000 रुपयांची सूट देण्यात आलेली आहे. फोनमध्ये दोन कलर ऑप्शन देण्यात आलेले आहे एक ब्लॅक आणि दुसरा ग्रे असे दोन कलर ऑप्शन आहे. या स्मार्टफोनची विक्री ही 7 ऑगस्ट पासून ई कॉमर्स साईट फ्लिपकार्ट वर दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.
मॉडेल | किंमत |
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज | 29,999/- |
12GB रॅम आणि 256GB स्टोरेज | 31,999/- |
लॉन्चिंग ऑफेरबद्दल बोलायचे झाले तर, या फोनवर 2000 रुपयांची सूट देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा⇓
Oppo K12x 5G | ओप्पोचा 360 डिग्री डॅमेज प्रूफ फोन लॉन्च, जबरदस्त फीचर्स जाणून घ्या संपूर्ण माहिती
Poco M6 Plus 5G | 108 MP कॅमेरा फोन 1 ऑगस्टला लॉन्च किंमत 15000
Nothing Phone 2a Plus Specifications
- Nothing च्या नवीन फोनचा डिस्प्ले 6.7 इंचचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
- फोन Media Tek Dimensity 7350 Pro 5G प्रोसेसरसह आहे.
- रिफ्रेश रेट 120Hz , रिजोल्यूशन 1080X2412 पिक्सेल आहे.
- 1300 पिक ब्रायनट्स आणि 240 Hz टच सॅम्पलिंग रेट आहे.
- डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शनसह आला आहे.
- हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित Nothing OS 2.6 वर चालतो.
- Nothing कंपनीने स्मार्टफोनसाठी 3 अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्ष सिक्युरिटी पॅच देणार आहे.
- फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा दोन देण्यात आलेले आहे एक 50 मेगापिक्सेल आणि दुसरा 50 मेगापिक्सेल असे दोन 50 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेले आहे.
- सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला आहे.
- 5000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे. 50W फास्ट चार्जर सपोर्ट करतो.
Nothing Phone 2a Plus Camera Sensor
nothing कंपनीने या नवीन फोनमध्ये दोन रियर कॅमेरा देनाय्त आलेला आहे. कॅमेरा सेटअप असा केला आहे की, फोनच्या मागे 10x डिजिटल झूम आणि इलेक्ट्रॉनिक इमेज EIS सह ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन OIS सह 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि दुसरा 114 डिग्री फिल्ड ऑफ व्यु सह 50 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलेला आहे. असे दोन 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप करण्यात आलेला आहे. म्हणजे हा स्मार्टफोन फोटो प्रेमींसाठी चांगला फोन असणारा आहे.
सेल्फी आणि विडिओ कॉलिंग फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल सेट करण्यात आलेला आहे. nothing कंपनीने जबरदस्त असा सेल्फी कॅमेरा दिलेला आहे या आधी कोणत्याही फोनमध्ये इतका जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला नाही. सेल्फी आणि विडिओसाठी एक चांगला अनुभव हा नवीन स्मार्टफोन नक्की देईल.
बॅटरी आणि चार्जर
Nothing Phone 2a Plus या नवीन फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे जी भरपूर पॉवर पॅक आहे आणि 50W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलेला आहे.
कनेक्टिव्हिटी
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE
- WIFI 6, ब्लूथुथ 5.3 JPS, 360 डिग्री अँटीना आणि USB टाईप सी पोर्ट मिळतो.
- सेन्सरमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
- ड्युअल सिम सपोर्ट
- अलेक्समिटर, इलेक्ट्रॉनिक कंपास, आंबियन्ट लाईट सेन्सर समावेश आहे.
- ड्युअल स्टीरियो स्पीकरचा समावेश आहे.