DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग 289 पदांची भरती सुरु | आताच अर्ज करा

DTP Maharashtra Bharti 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 मेगा पदांची भरती सुरु झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आलेले आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी शोधताय तरी ही माहिती तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात (DTP Maharashtra Bharti 2024) विविध पदांसाठी वेगवेगळ्या विभागात 289 पदाची भरती सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविणायत येते आहे. महाराष्ट्र शासन विभागा अंतर्गत पुणे विभाग, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण, आणि अमरावती विभागात विविध रिक्त पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. 

DTP Maharashtra Bharti 2024 माहिती 

महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विविध विभागात रिक्त पदासाठी भरती जाहीर केली आहे त्यानुसार पदांची नाव १. रचना सहाय्यक २. उच्च श्रेणी लघुलेखक ३. निम श्रेणी लघुलेखक या पदांसाठी भरती निघाली आहे. तरी इच्छुक उमदेवरानी आज अर्ज करावा. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि चांगली संधी आहे. ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी भरतीची PDF नीट वाचून ऑनलाईन फॉर्म भरणे. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय आवश्यक आहे. यामध्ये आपण कोणत्या विभागात किती जागा आहे, ऑनलाईन अर्जची मुदत, वयाची अट, अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, नोकरीचे ठिकाण या सारख्या महत्वाच्या गोष्टी माहिती पाहणार आहोत. 

DTP Maharashtra Bharti 2024 ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 

ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. 

अ. क्र. तपशील/ कार्यवाईचा टप्पा  दिनांक आणि कालावधी 
१.  ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी  दिनांक ३० जुलै २०२४ ते दिनांक २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत 
२. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  दिनांक ३० ऑगस्ट २०२४ 
३. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे  संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 
४. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक  संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 

 

हे पण वाचा ⇓
IBPS Recruitment 2024 : बँकिंग क्षेत्रात 896 पदांची मेगा भरती, आजच ऑनलाइन अर्ज करा.

DTP Maharashtra Bharti 2024 भरली जाणारी रिक्त पदे

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे या रिक्त पदांची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहे.

  • रचना सहाय्यक (गट ब) 
  • उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब) 
  • निम श्रेणी लघुलेखक (गट ब) 
रिक्त पदांचा तपशील 

महाराष्ट्र राज्यातील विविध विभागा अंतर्गत पुणे विभाग, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण, आणि अमरावती विभागात विविध रिक्त पदासाठी जागांची भरती निघाली आहे. कोणत्या पदांमध्ये किती जागा आहे ते खालीलप्रमाणे 

पदाचे नाव  रिक्त पदे 
रचना सहाय्यक (गट ब) 261
उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब) 19
निम श्रेणी लघुलेखक (गट ब) 09
एकूण रिक्त पदे  289

 

वयाची अट

18 वर्ष ते 38 वर्ष

  • वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मागासवर्गीय/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/मागास वर्गासाठी वयोमर्यादा 05 वर्ष शिथिल राहील.
  • तसेच दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल राहील. 
शैक्षणिक पात्रता 
अ. क्र. पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता 
१.  रचना सहाय्यक (गट ब) अभियांत्रिकी पदवी 
२. उच्च श्रेणी लघुलेखक (गट ब) दहावी पास,  टायपिंग स्पीड इंग्लिश 40 WPM मराठी टायपिंग 30 WPM 
३. निम श्रेणी लघुलेखक (गट ब) दहावी पास, टायपिंग स्पीड इंग्लिश 40 WPM मराठी टायपिंग 30 WPM 

 

DTP Maharashtra Bharti 2024 अर्ज फी 
  • रुपये 1000/- (GST सह ) अराखीव (खुला) प्रवर्ग उमेदवारासाठी 
  • रुपये 900/- (GST सह) राखीव प्रवर्ग उमेदवारासाठी 
DTP Maharashtra Bharti 2024 अर्ज कसा भरायचा 
  • महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे. 
  • इच्छुक उमेदवारांनी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे त्यासाठी महाराष्ट DTP अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
  • अर्ज भरण्यासाठी वेब साईट, भरतीची जाहिरात PDF आणि माहिती पाहण्यासाठी खाली लिंक्स दिल्या आहे.  
अर्ज आणि जाहिरातीसाठी महत्वाच्या लिंक्स 
  • ऑनलाईन आजरा करण्यासाठी येथे क्लीक करा – APPLY
  • अधिक माहितीसाठी आणि जाहिरात PDF येथे पहा – PDF
  • अधिकृत वेबसाईट – https://dtp.maharashtra.gov.in/
DTP Maharashtra Bharti 2024 Notification
भरती संस्था महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
पदाचे नाव रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम श्रेणी लघुलेखक
रिक्त पदे 289
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा
आर्जची मदत 30 जुलै 2024 ते 29 ऑगस्ट 2024
वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष
शैक्षणिक पात्रता  दहावी ते अभियांत्रिकी पदवी 
वेतन   रुपये 38,000/- ते 1,32,300/-

 

टीप :

  • भरावयाच्या उपरोक्त संवर्ग/पदाचा सामाजिक/ समांतर / आरक्षणात तसेच, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • वरील राखीव / बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
  • उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे हि शासन नियमानुसार अनाथसाठी व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सादर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न  करता भरली जातील.
  • रचना सहाय्यक, उच्च श्रेणी सहाय्यक आणि निम श्रेणी सहाय्यक या तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. आवश्यतेनुसार वरील वेळा पत्रकातमध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळच्यावेळी संकेत स्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. 
  • प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबंधीत किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • प्रस्तुत जाहिरात ही परीक्षेसंदभातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अहर्ता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची जवाबाबदारी याबाबतचा सविस्तर तपशील https://dtp.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर सर्वसाधारण सूचना या सादरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  
  • भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना इत्यादी संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. 
  • उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून संकेत स्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

जर तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास आणि अजून नवनवीन नोकरी अपडेटसाठी आम्हाला नक्की कॉमेंट करा. आणि ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment