Rent Agreement Online Maharashtra In Marathi ऑनलाईन भाडेकरार आता राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणार असून, त्यासाठी भाडेकरार २.० हि प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात 17 फेबुवारी पासून सुरु करण्यात येत आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून, पक्षकारांची माहिती आधार क्रमांकांद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात हि प्रणाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर लागू करण्यात येणार आहे.
Rent Agreement Online Maharashtra In Marathi
ऑनलाईन भाडेकरारासाठी भाडेकरार १.९ हि संगणक प्रणाली वापरली जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात 13 लाख 10 हजाराहून अधिक जास्त भाडेकरार ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आले आहेत. सध्या नागरिकांचा ऑनलाईन भाडेकरार करण्याकडे कल वाढला आहे, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या विभागात भाडेकरारांची विक्रमी दस्त नोंदणी होत असते. त्यामुळे अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी २.० हि अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे.
Rent Agreement Online Maharashtra In Marathi या लेखात आपण अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी २.० हि अद्ययावत संगणक प्रणाली काय आहे ते पाहणार आहोत.
Free Rent Agreement Online Maharashtra In Marathi
नवीन प्रणाली कधी त्रुटींची दुरुस्ती करून आता भाडेकरार २.० ही नवीन संगणक प्रणाली अस्तीत्वात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यात ही प्रणाली 17 फेबुवारी पासून अमलात येणार आहे. त्यातील त्रुटी लक्षात घेऊन येत्या पंधरवड्यात ही प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रणालीमुळे राज्यात एका ठिकाणाहून अन्य जिल्ह्यात भाडेकरार ऑनलाईन करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक (माहिती तंत्रज्ञान) यांनी दिली आहे.
या संगणक प्रणालीत मराठी करार करता येणार आहे. शुल्क भरण्यासाठीही स्वतंत्र विंडो किंवा वेबसाईटला जावे लागणार नाही. येत्या पंधरा दिवसात राज्यभर ही प्रणाली लागू करण्यात येईल.
Rent Agreement Online Maharashtra
क्यूआर कोडचा वापर :
भाडेकरार आता मराठीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच भाडेकरारसाठीचे शुल्क भरण्यासाठी याच पोर्टलवरून क्यूआर कोडचा वापरू करून “पे टू आयजीआर” या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकारांचे आधार क्रमांक यात टाकल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती आधार पोर्टलवरूनच मिळवली जाणार आहे. यातून फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत.
या प्रणालीत सुरक्षे संदर्भातील उपाय अधिक कडक करण्यात आल्याने विभागाला तसेच पक्षकारांना देखील फसवणुकीचे प्रकार टाळता येणार आहेत.
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA 1337 फ्लॅटची सोडत आज जाहीर, अँप्लिकेशन नंबर टाकून चेक करा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||