गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध, जमीन, तिच्या सीमा, शेजारील गट नंबर, तसेच मालकी हक्क यांची संपूर्ण, असा डाउनलोड करा | Gaon Nakasha Maharashtra Online

Gaon Nakasha Maharashtra Online महाराष्ट्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकरी आणि नागरिकांसाठी गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता कुठलीही जमीन, तिच्या सीमा, शेजारील गट नंबर, तसेच मालकी हक्क यांची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेळ वाचणार असून, त्यांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहे. सदर माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gaon Nakasha Maharashtra Online

गाव नकाशा कसा पाहता येणार आहे ?

महाराष्ट्र राज्यभरातील नागरिकांसाठी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर गाव नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी पुढील प्रक्रिया अवलंबाबी सावितर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि जिल्हा निवडा.
  2. त्यानंतर तालुका आणि गाव निवडा.
  3. गाव नकाशा पर्यायावर क्लिक करा ⇒ संबधीत गावाचा नकाशा दिसेल. सर्व्ह नंबर टाका – त्या क्षेत्राचा सविस्तर नकाशा PDF स्वरूपात उपलब्ध होईल. 
  4. नकाश्याची प्रिंट काढता येईल, त्यामुळे भविष्यातील संदर्भासाठी तो सहज वापरता येईल.

Gaon Nakasha Maharashtra Online डिजिटल व्यवस्थापनासाठी ‘प्रत्यय’ प्रणालीचा शुभारंभ


राज्य सरकारने महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ‘प्रत्यय’ प्रणाली सुरू केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबई येथे या डिजिटल प्रणालीचे उद्घाटन झाले. ही प्रणाली संपूर्ण विभागाचे कामकाज पेपरलेस आणि अधिक वेगवान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

‘प्रत्यय’ प्रणालीची वैशिष्ट्ये :

  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया – फेरफार, तक्रारी, अपील आणि पुनर्विलोकन अर्ज डिजिटल पद्धतीने दाखल करता येतील.
  • तात्काळ अपडेट्स – अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीचा वेळ आणि संबंधित बाजूची माहिती एका क्लिकवर मिळेल.
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा – भविष्यात अर्जदार आणि अधिकारी घरबसल्या सुनावणीसाठी ऑनलाइन सहभागी होऊ शकतील.
  • वेळ आणि खर्चाची बचत – अपीलदार व वकील ऑनलाइन हजर राहू शकतील, त्यामुळे प्रवासाचा खर्च वाचेल. 
  • पूर्णपणे पारदर्शक प्रणाली – डिजिटल स्वरूपामुळे गैरव्यवहार रोखले जातील आणि नागरिकांना जलद सेवा मिळेल. 

डिजिटल योजनेचा पुढील टप्पा
महसूलमंत्र्यांनी सांगितले की, भविष्यात संपूर्ण सुनावणी प्रक्रियेलाही ऑनलाइन स्वरूप दिले जाणार आहे. तालुका, जिल्हा आणि शासन स्तरावर अर्ज प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘प्रत्यय’ प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावेल.Gaon Nakasha Maharashtra Online

ही नवीन डिजिटल व्यवस्था शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा बदल ठरणार असून, जमिनीच्या नोंदी, नकाशे आणि अपील प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Gaon Nakasha Maharashtra Online Free

गाव नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या नवीन नियमाची माहिती होईल आणि या माहितीचा त्यांना फायदा होईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Gaon Nakasha Maharashtra Online

Leave a Comment