Ladki Bahin yojana April Installment Date ; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आल्यानंतर आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असा दावा केला जाऊ लागला आहे.
Ladki Bahin yojana April Installment Date
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हफ्त्याचे वितरण काही दिवसांपूर्वी कारणात आले. त्यामुळे आता महिल्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी जमा होणार?
एप्रिलचा हफ्ता ‘रामनवमी’ च्या दिवशी मिळण्याची शक्यता :
लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हफ्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हफ्ता देण्याची शक्यता आहे. यंदा रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 /- रुपये जमा होऊ शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार नाही | Ladki Bahin yojana April Installment Date
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती. ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शकता असून आतापर्यंत 9 लाखाहून महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
आता पर्यंत महिलांच्या खात्यात किती पैसे जमा झाले आहे ?
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10 वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?
लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सातत्याने विरोधकांकडून बोलण्यात येत आहे. यावर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टता दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.Ladki Bahin yojana April Installment Date
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Ladki Bahin yojana April Installment Date