Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी बंधनकारक केली आहे. मात्र, सर्व्हर डाउन, मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि शिधापत्रिकाधारकांची उदासीनतेमुळे अजूनही लाखों शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाने ई-केवायसी प्रक्रियेस 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra
राज्यातील सर्व ग्राहकांचे रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत. तरीदेखील वितरणात गळती होत असल्याचे दिसून आले आहे. गळती रोखण्यासाठी राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. कार्डावर नावे असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत असलेले आधारकार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशिनमध्ये बोटांचे ठसे स्कॅन करून ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
त्यासाठी सुरुवातीला 31 ऑक्टोबर 2024 अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे ई-केवायसी व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे ई-केवायसी करता आले नव्हते. त्यामुळे नंतर 31 डिसेंबर 2024 आणि 31 मार्च 2025 पर्यंत प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही सर्व्हर डाउन आणि मशीनमधील तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अजूनही लाखो शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी करणे प्रलंबित आहे.
Ration Card e kyc Online Date Extended
केंद्र शासनाकडे ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी अनेक राज्यांनी केली होती. त्यावर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलअखेर 100 टक्के ई-केवायसी पूर्ण न झाल्यास अनुदान रोखण्याचा आणि अन्नधान्य कपात करण्याचा इशारा राज्यांना दिला आहे.
Ekyc करण्याची मुदत का वाढवण्यात आलेली आहे ?
शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी बंधनकारक केली आहे. मात्र, सर्व्हर डाउन, मशीनमधील तांत्रिक अडचणी आणि शिधापत्रिकाधारकांची उदासीनतेमुळे अजूनही लाखों शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी पूर्ण झालेले नाही.त्यामुळे केंद्र शासनाने ई-केवायसी प्रक्रियेस 30 एप्रिल 205 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
मोबाइल वरून Ekyc प्रक्रिया करा :
- ई-केवायसी करण्यासाठी मेरा ई-केवायसी (Mera Ekyc) मोबाईल ॲप, आधार फेस आरडी सेवा ॲप असे दोन ॲप डाउनलोड करा.
- हे दोन्ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
- नंतर आधारकार्ड नंबर टाका,
- पुढे OTP येईल तो टाका व कॅप्टचा प्रविष्ट करा.
- पुढे फेस कॅमेरा ओपन होईल, फोटो Capture केल्यानंतर ekyc पूर्ण होईल.
- या ॲपवर फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान्वादेर झटपट व सोप्या पद्धतीने पडताळणी होऊ शकते. रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Ration Card e kyc Online Date Extended In Maharashtra