ब्रेकींग न्यूज; राज्यात म्हाडा “या” विविध ठिकाणी सुमारे 19 हजार 497 घरे बांधणार, स्वस्त घरांचं स्वप्न साकार | Mhada News Today Marathi

Mhada News Today Marathi महाराष्ट्र राज्यात म्हाडाची 19 हजार 497 घरे बांधण्यात येणार असून, त्यासाठी ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद म्हाडाने अर्थसंकल्प्यात केली आहे. म्हाडाचा २०२५-२६ चा अर्थसंकल्पाला व २०२४-२०२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात राज्यभरात 19 हजार 497 घरे उभारण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mhada News Today Marathi

म्हाडा च्या अर्थसंकल्पात कोकण मंडळांतर्गत 9902 मुंबई मंडळांतर्गत 5199 , पुण्यात 1836 , नागपूरमध्ये 692 , छत्रपती संभाजीनगर मध्ये 1608 , नाशिकमध्ये 91 , अमरावतीमध्ये 169 घरे बांधण्याचे उध्दीष्टे ठेवण्यात आले आहे. मुंबईतील घरांसाठी 16 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आलेली आहे.  

जिल्हा  घरांची संख्या 
पुणे  1836
मुंबई  5199
कोकण  9902
नागपूर  692
छत्रपती संभाजीनगर  1608
नाशिक  91
अमरावती  169

 

Mhada new update mumbai

मुंबईतील पुनर्विकास योजनेसाठी 2800 कोटी :

मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्वेतील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिमेतील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धार्थनगर येथे घरे उभारणीसाठी 573 कोटी रुपयांच्या तरतुदीचा त्यात समावेश आहे.

परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी 57.50 कोटी रुपये, बोरिवली सर्वे क्र.160 मधील योजनेसाठी 200 कोटी., संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी 200 कोटी, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी 177.79 कोटी, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी 50 कोटी, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी 85 कोटी, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी 30 कोटी, गोरेगाव सिद्धधार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.Mhada News Today Marathi

पुणे मंडळ अंतर्गत 585.97 कोटी रुपयांची तरतूद :

पुणे मंडळांतर्गत 1836 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्टे आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळांतर्गत 692 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात १००९.३३ कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळांतर्गत 1608 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ आता पाण्याची चिंता मिटली; बोअरवेलसाठी 50 हजार रुपये सरकारकडून अनुदान, पहा संपूर्ण डिटेल्स

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; पुणे विभागामध्ये 2 लाख घरे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणार, त्वरित अर्ज करा 

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जोईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Mhada News Today Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment