Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील मुलींना शिक्षणासाठी दहा हजार रुपये कसे मिळणार कोणाला मिळणार यासाठी पात्रता निकष काय आहेत अर्ज कसा करावा लागेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत राज्यातील मुलींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला आता दहा हजार रुपये कसे मिळतील ते बघुयात संपूर्ण माहिती.
Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana
Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्यातील नवजात बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने “श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये जागतिक महिलादिनी (8 मार्च) जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने 10 हजार रुपयांची ठेव (फिक्स डिपॉजिट) करण्यात येणार आहे.
राज्यातील राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल नेहमीच मुलींच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळे योजना घेऊन येत असतात यामध्ये भरपूर काही योजना असतात ज्यामध्ये मुलींना आर्थिक फायदा मिळत असतो जसं की लाडकी बहीण योजना असेल माझी कन्या भाग्यश्री योजना असेल लेक लाडकी योजना असेल अशा भरपूर काही योजना आहेत.
ज्यामुळे महिलांना याचा लाभ होऊन त्यांनी थोडसं आर्थिक सक्षम होऊन पुरुषांच्या बरोबरीला त्या येऊ शकतात परंतु तुम्हाला माहित आहे का आता आणखीन एक योजना आलेली आहे सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या अंतर्गत तुमच्या मुलीला दहा हजार रुपये मिळू शकतात आता हे दहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील तर बघूयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana 2025
सिद्धिविनायक मंदिर च्या उत्पनात विक्रमी वाढ :
श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च 2025 रोजी संस्थानचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक 31 मार्च 2025 रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
न्यासाचे सर्व विश्वस्त, प्रशासन यांची नियोजनबध्द कार्यपध्दती आणि भाविकांच्या भक्तीमय सहभागामुळे सन 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न जे रू 114 कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी रू 133 कोटींच्या घरात गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास 15% नी वाढ झालेली आहे.
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे,
त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरून लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरूपाचा धोरणाला श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा या हेतुने महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) स्वरूपात त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
न्यास व्यवस्थापन समितीकडून अशा स्वरूपाची अभिनव योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आलेला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सिद्धीविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून न्यासास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब व गरजू रूग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तक पेढी योजना राबविणे, डायलेसिस सेंटरद्वारे रूग्णांना मदत करणे इत्यादि स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Siddhivinayak Bhagyalaxmi Yojana