गुड न्यूज; RBI कडून रेपो दरात कपात, सर्वसामान्यांचे EMI कमी होणार, पहा किती कमी होणार EMI | Repo Rate Today In marathi rbi

Repo Rate Today In marathi rbi आरबीआयकडून सलग दुसऱयांदा रेपो दारात  टक्क्यांनी कपात केली आहे. भारतीय रिझव्र्ह बँकेने टॅरिफ वॉर चिंतेच्या पाशवर्भूमीवर अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बुधवारी सलग दुसऱयांदा प्रमुख व्याजदर रेपो  टक्क्यांनी कमी करून  टक्के केला आहे. त्याचबरोबर बँकेने भूमिका ‘उदार करीत भविष्यात व्याजदरात आणखी कपात होण्याचे संकेत दिले.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Repo Rate Today In marathi rbi

भारतीय केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला. जगात टॅरिफ वॉर भडकलेले असतानाच आरबीआयने रेपो दरात कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. . RBI ने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो रेट आता 6 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग दुसऱ्यांदा भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज सकाळी 10 वाजता रेपो रेट जाहीर केले. त्यानुसार, सलग दुसऱ्यांदा व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. ही कपात जवळपास 5 वर्षांत म्हणजे 56 महिन्यानंतर दिसून आली. या कपातीनंतर सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला.

गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात मोठी कपात झाली. त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला होईल. गेल्या काही दिवसांपासून हे क्षेत्र मंदीशी सामना करत होते. त्यातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा मोठा परिणाम टेक कंपन्यांसह ग्लोबल रिअल इस्टेट कंपन्यांवर दिसून येत आहे.

Repo Rate Today

20 लाख गृहकर्ज, 20 वर्ष मुदत; लाभ किती ?(Repo Rate Today In marathi rbi)

व्याजदर  EMI  व्याज  परतफेड 
जुने  9% 17,995 23,18,685 43,18,685
नवे  8.75% 17,674 22,41,811 42,41,811
लाभ  0.25% 321 76,874 76,874

 

असा बदलत गेला रेपो रेट : (Repo Rate Today In marathi rbi)

7 फेब्रुवारी 2025 6.25%
8 जून 2023 6.50%
7 डिसेंबर 2022 6.25%
30 सप्टेनम्बर 2022 5.90%
5 ऑगस्ट 2022 5.40%
8 जून 2022 4.90%
4 मे 2022 4.40%
22 मे 2022 4%
6 फेब्रुवारी 2020 5.15%

 

  • रेपो रेटबाबत मोठी घोषणा :

आरबीआय एमपीसीच्या सर्व सदस्यांनी एकमताने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या कपातीनंतर, रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सनी कमी होऊन 6% झाला आहे. त्यामुळे कर्जाचा EMI कमी होणार आहे.

  • टॅरिफबाबत मोठी घोषणा :

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, टॅरिफमध्ये वाढ केल्याने निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल. वाढत्या अनिश्चिततेमुळे चलनावर दबाव दिसून येईल. त्याचा परिणाम महागाईवरही दिसून येण्याची शक्यता आहे. एकूणच, जागतिक व्यापार आणि धोरणात्मक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वाढीवर लक्ष ठेवले जाईल.

  • UPI व्यवहारांची मर्यादा ठरवण्याचा अधिकार NPCI ला मिळेल :

सध्या, पर्सन टू मर्चंट (P2M) UPI व्यवहारांची मर्यादा RBI ने निश्चित केली आहे. आता आरबीआयने प्रस्तावित केले आहे की, या व्यवहारांची मर्यादा ठरवण्याची जबाबदारी एनपीसीआय (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडे देण्यात येईल. बँका आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर एनपीसीआय यावर निर्णय घेईल.(Repo Rate Today In marathi rbi)

इतर महत्वाची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment