जमिनीचे सातबारे व खाते 1880 पासूनचे, आता पहा एका क्लिक वर, “या” पद्धतीने चेक करा | Maharashtra land records online

Maharashtra land records online आता तुम्ही तुमच्या जमिनीचे जुने सातबारा, खाते उतारे आणि फेरफार मोबाईलवर बसून पाहू शकता. ही सुविधा महाराष्ट्र सरकारने दिली आहे. यासाठी सरकारने एक वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 1880 सालापासूनची कागदपत्रे पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra land records online

सातबारा उताऱ्यात जमिनीचा प्रकार, मालकी हक्क, क्षेत्रफळ, खरेदी-विक्रीच्या नोंदी, भूमापन क्रमांक, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी सर्व जमिनीसंदर्भातील नोंदी नमूद असतात. 7/12 उतारा ही एक कायदेशीररित्या मान्य रजिस्टर असतो. हा उतारा संबंधित तलाठी किंवा अधिकारी यांना अर्ज देऊन काढता येतो. असे. राज्य सरकारने महाभूलेख संकेतस्थळावर सातबारा ऑनलाइन पाहण्याची सोय केली आहे. आता हा ‘ऑनलाईन सातबारा कसा बघायचा’ हे तुम्हांला माहिती असायला हवे.

ऑनलाईन कशी करायची प्रक्रिया ?

वेबसाईटवर जा:

सर्वात आधी https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या वेबसाईटवर जा.

नाव नोंदवा (नोंदणी):

तुम्ही प्रथमच ही सुविधा वापरत असाल तर ‘New User Registration’ वर क्लिक करा.

तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, जन्मतारीख, जिल्हा, तालुका, पिन कोड अशी माहिती भरा.
एक पासवर्ड तयार करा आणि फॉर्म सबमिट करा.
तुमचं अकाऊंट आधीच असेल, तर User ID आणि Password वापरून लॉगिन करा.

ऑनलाइन सातबारा बघणे

  • या प्रक्रियेत सर्वांत आधी bhulekh.mahabhumi.gov.in महाराष्ट्र शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर साइटचे होमपेज ओपन होईल त्यावर तुम्हांला डावीकडे महाराष्ट्राचा नकाशा आणि उजवीकडे लोगो व त्याखाली विभागनिवडीचा पर्याय दिसेल.
  • महाराष्ट्र राज्यांतील सहा विभागांपैकी तुम्ही जमीन कोणत्या विभागातील आहे त्या विभागाला सिलेक्ट करून ‘गो’ ला क्लिक करा.
  • पुढे तुम्ही निवडलेल्या विभागाचे नाव स्क्रीनवर दिसेल आता ‘7 12 कसा बघायचा हा तुमचा प्रश्न आहे म्हणून तिथे ‘7/12’ व ‘8 अ’ या दोघांपैकी 7/12 निवडा.
  • तुमच्या जमिनीच्या संबंधित त्या विभागांतर्गत येणारा जिल्हा, तालुका, ग्राम सिलेक्ट करा. त्यानंतर काही ऑप्शन तुम्हांला दिसतील.
  • जसे जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, मालकाचे नाव-मधले नाव-आडनाव पैकी एखादी माहिती नमूद करून तुमचा मोबाइल क्रमांक टाइप करा.
  • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर या प्रक्रियेची पुढची पायरी कॅपचा कोडची असेल अचूक कोड टाका; कॅपचा वेरीफाय झाला की तुमच्या समोर संबंधित 7/12 उतारा येईल.

माहिती शोधा (Regular Search) :

लॉगिन केल्यावर ‘Regular Search’ वर क्लिक करा.
त्यानंतर, तुम्ही जिल्हा, तालुका, गाव, कार्यालयाचं नाव, आणि कागदपत्राचा प्रकार निवडा.
मग सर्वे नंबर टाका आणि ‘Search’ वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला त्या जमिनीचे जुने कागदपत्र मोबाईलवर दिसतील.

हे लक्षात ठेवा:

फक्त ज्या गावांची माहिती वेबसाईटवर आहे, तीच पाहता येईल.
फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच ही माहिती बघा. (Maharashtra land records online)

ऑनलाईन सुविधेमुळे काय फायदा होतो? :

  • शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जुनी जमिनीची कागदपत्रं घरबसल्या मिळतात.
  • आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
  • यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हफ्ता तारीख फिक्स, “या” दिवशी येणार 1500 रुपये

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(Maharashtra land records online)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment