PF ATM Withdrawal Process in marathi नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. हे अकाउंट ईपीएफओद्वारे सुरु केले जाते. आता ईपीएफओमध्ये मोठा अपडेट होणार आहे. ईपीएफओ ३.० व्हर्जन सुरु केले जाणार आहे. यामुळे तुम्हाला पीएफ एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार आहे.
PF ATM Withdrawal Process in marathi
केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे. ईपीएफओने कोट्यवधी कर्मचाऱ्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी डिजिटल बदल केले आहेत. हे ईपीएफओ ३.० व्हर्जन मे किंवा जून महिन्यापासून सुरु होणार आहे. म्हणजे अवघ्या काही दिवसांतच तुम्हाला पीएफचे पैसे एटीएमद्वारे काढता येणार आहेत. PF चे पैसे आता ATM ने काढता येणार. त्यासाठी EPFO 3.0 हे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहक थेट एटीएमने पैसे काढू शकता. सोबतच युपीआयने पैसे खात्यात ट्रान्सफर देखील करू शकता.
PF ATM सुविधा :
मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओ लाभार्थ्यांना ३.० व्हर्जनमुळे पीएफ सेटलमेंट लवकर होणार आहे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. त्यांनी सांगितले की,ऑटोमॅटिक क्लेम, डिजिटल सर्व्हिस आणि एटीएमद्वारे फंड काढण्याच्या सर्व्हिस प्रोवाइड केल्या जाण्यात आहे. ईपीएफओची (EPFO) प्रक्रिया अधिक सुलभ करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
PF ATM Withdrawal Process
नवीन व्हर्जनमुळे आता पीएफच्या दाव्यांसाठी तुम्हाला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरद नाही. तुम्ही घरबसल्या ओटीपी टाकून ईपीएफओ खाते अपडेट करु शकतात. पेन्शन काढण्यासाठी रिक्वेस्ट करु शकतात.
मनसुख मांडविया यांनी सांगितले की, सध्या सरकारच्या गॅरंटीसहित २७ लाख कोटी रुपयांचा फंड आहे. सरकार सध्या पीएफवर (PF Interest Rate) ८.२५ टक्के व्याज देते. यामध्ये ७८ लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारक आहे. आता त्यांना देशातील कोणत्याही खात्यातून पेन्शन (Pension) काढता येणार आहे.
ATM मधून PF चे पैसे कसे काढायचे?
आता कर्मचाऱ्यांना लवकरच एटीएममधून पीएफ काढता येणार आहे. तुम्ही जसे इतर खात्यातील पैसे काढतात तसेच एटीएममधून काढू शकणार आहात. यासाठी १ लाख रुपयांची लिमिट असणार आहे. यासाठी तुम्हाला डिजिटल एटीएम कार्ड दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (PF ATM Withdrawal Process in marathi) मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मे किंवा जून महिन्यात ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
PF ATM कसे काम करेल?
ईपीएफओ एटीएम कार्ड अगदी डेबिट कार्डसारखे काम करेल. पैसे काढण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमचा UAN लिंक करावा लागेल, OTP पडताळून पहावा लागेल आणि नंतर पैसे काढावे लागतील. या सुविधेद्वारे, तुम्ही नियोक्त्याच्या मंजुरीची वाट न पाहता तुमचे पीएफ पैसे काढू शकाल.
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ आता पती पत्नी दोघांना दरमहा 10 हजार रुपये मिळणार, पहा आवश्यक कागदपत्रे
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद (PF ATM Withdrawal Process in marathi)