E Pink Rickshaw Yojana Maharashtra आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना मोफत रिक्षा मिळणार आहे कोणत्या योजनेअंतर्गत रिक्षा मिळणार आहे यासाठी आपल्याला काय कागदपत्रे लागतील अर्ज कोठे करायचा आहे पात्रता काय असतील त्याचप्रमाणे वयाची अट काय असेल आपल्याला अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचा हा रिक्षा आपल्याला कसा मिळेल आणि सरकारकडून मोफत मिळणार आहे याबाबत आपण आज माहिती पाहणार आहोत.
E Pink Rickshaw Yojana Maharashtra
ई- पिंक रिक्षा संदर्भातील संपूर्ण माहिती :
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या विकासासाठी नेहमीच केंद्र सरकारने राज्य सरकार वेळोवेळी आपले योजना राबवत असताना महिलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना या केंद्र सरकार राज्य सरकारने लागू केलेले आहेत महाराष्ट्रात यादी देखील महिलांसाठी लाडकी लेक त्याचप्रमाणे माजी कन्या भाग्यश्री योजना मुख्यमंत्री लाडके योजना या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या सक्षमी करण्यासाठी हार्दिक सह्याद्री जातं त्याचप्रमाणे केंद्र सरकार देखील भरपूर काही योजना राबवत असतं
प्रधानमंत्री मातृत्व योजना त्याचप्रमाणे लखपती योजना आणखी विमा सखी योजना या अंतर्गत महिलांना थोडासा फायदा मिळतो या योजनेअंतर्गत आता महिलांना लाभ देखील मिळतो आता तुम्हाला माहिती आहे का महिलांना मोफत रिक्षा मिळणार आहे आता कोणते योजना अंतर्गत मिळणारे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा बघूया संपूर्ण माहिती
E Pink Rickshaw Yojana
E Pink Rickshaw Yojana Maharashtra राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजु महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
महिलांसाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा या सरकारी योजनेचा उद्देश
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
- त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
E pink Rickshaw योजनेसाठी आवश्यक पात्रता :
सदर योजना ही राज्यातील गरजू मुली व महिला यांच्यासाठी असून, आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे
1. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
2. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
3. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 3 लाखापेक्षा जास्त नसावे.
5. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील.
6. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त
7. युवती, अनुरक्षणगृह/बालगृहातील आजी/माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल.
8. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल.
ई-रिक्षा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅनकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पनाचा दाखला
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- रेशनकार्ड
- चालक परवाना
- सदर रिक्षा महिला चालविणार असल्याचे हमीपत्र
- ऑनलाईन अर्ज
ई- पिंक रिक्षा योजनेची कार्यपद्धती – अर्ज कुठे करावा ?
1. इच्छुक महिला पिंक ई-रिक्षासाठी (E Pink Rickshaw Yojana Maharashtra) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील.
2. प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्यात येईल.
3. पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निक्षीत केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल.
4. अंतिम मंजूरीनंतर अर्जदार शासनास निश्चीत केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज मंजूर करून घेईल.
5. बँकेकडून घेतलेल्या 70 % कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहिल.
6. बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या 70%कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरेल.
7. अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधीत वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
8. रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधीत वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करुन देण्यात येईल,
9. पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालविली जात आहे, याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतुक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहिल. तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असतांना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
10. लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा(E Pink Rickshaw Yojana Maharashtra) मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे.
11. सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयाची असणार आहे.
इतर सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |