Ladki Bahin Yojana May Hafta Date आज आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणीचा मे चा 11 वा हप्ता कधी मिळणार कोणाला मिळणार या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याच्या हफ्तायची वाट पाहतात याचा एक महत्वाची मोठी अपडेट माहिती पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana May Hafta Date
लाडकी बहीण योजना मे चा 11 वा हफ्ता संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडके बहिणी योजना सुरू केली अत्यंत कमी कालावधीत सर्वात लोकप्रिय योजना असणारी महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात
त्याचप्रमाणे माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी महिलांना 2100 रुपये देणार अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस 2100 रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार याबाबत माहिती पाहूया.
Ladki Bahin Yojana May Hafta
(Ladki Bahin Yojana May Hafta Date) लाडकी बहीण योजना मे चा ११ वा हफ्ता 20 ते 25 मे 2025 या तारखे दरम्यान मिळणार आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता 20 ते 25 मे रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मे महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार? याकडे आता लक्ष लागले आहे. मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली होती.
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे.
याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण महिलांपैकी जवळपास 11 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजना मे हफ्ता 20 ते 25 मे 2025 दरम्यान मिळणार :
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यापासून पैसे हे शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा केले जात आहेत. त्यामुळे मे महिन्यात देखील लाडक्या बहिणींना तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतात.
निष्कर्ष :
(Ladki Bahin Yojana May Hafta Date) महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |