SBI Savings Scheme In Marathi भारतीय स्टेट बँक (SBI) ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून कोट्यवधी भारतीयांचं खातं या बँकेत आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एसबीआय विविध प्रकारच्या एफडी आणि बचत योजनांवर चांगल्या व्याजदरात रिटर्न देत आहे. अशाच एका खास स्कीमबाबत आपण येथे माहिती पाहणार आहोत – ही स्कीम आहे SBI ची 2 वर्षांची निश्चित ठेव (FD), ज्यात तुम्ही ₹2 लाख गुंतवून ₹32,044 पर्यंत निश्चित व्याज मिळवू शकता.
SBI Savings Scheme In Marathi
SBI 2 वर्षाच्या FD वर मिळणार जबरदस्त परतावा :
एसबीआय सध्या विविध कालावधीच्या एफडी प्लॅन्सवर 3.50% ते 7.55% पर्यंत वार्षिक व्याज देत आहे. विशेष म्हणजे, 444 दिवसांच्या “स्पेशल एफडी” योजनेवर सामान्य खातेदारांना 7.05% आणि वरिष्ठ नागरिकांना 7.55% पर्यंत व्याज दिलं जातंय. जर तुम्ही 2 वर्षांसाठी एफडी करता, तर सामान्य गुंतवणूकदाराला 7.00% आणि वरिष्ठ नागरिकांना 7.50% पर्यंत व्याज दर मिळतो. यामुळे ही योजना अल्पकालीन पण नफ्यासाठी उपयुक्त मानली जाते.
रुपये 2 लाख गुंतवल्यास मिळणार इतका परतावा :
जर एखाद्या व्यक्तीने, ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे, ₹2,00,000 ची एफडी 2 वर्षांसाठी सुरू केली, तर त्याला maturity च्या वेळी एकूण ₹2,29,776 मिळतील. यामध्ये ₹29,776 हे फिक्स व्याज असेल. त्याचप्रमाणे, जर 60 वर्षांवरील वरिष्ठ नागरिकाने अशीच एफडी केली, तर त्याला maturity च्या वेळी एकूण ₹2,32,044 मिळतील, यामध्ये ₹32,044 हे निश्चित व्याज असेल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरते.
SBI Savings Scheme
कमी रिस्क आणि निश्चित परतावा – एक परिपूर्ण पर्याय :
एफडी ही पारंपरिक गुंतवणूक पद्धती असून त्यात बाजार जोखमीचा धोका नसतो. त्यामुळे ज्यांना आपल्या बचतीवर स्थिर परतावा हवा आहे आणि ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, (SBI Savings Scheme In Marathi) त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे. शिवाय एसबीआयसारख्या विश्वासार्ह बँकेत एफडी करणं हे अनेकांसाठी मानसिकदृष्ट्या सुद्धा शांतीदायक ठरतं.
गुंतवणुकीपूर्वी व्याजदरांची अधिकृत पडताळणी करावी :
भारतीय रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये बदल करत असल्याने त्याचा थेट परिणाम एफडीच्या व्याजदरांवर होतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा शाखेत जाऊन अद्ययावत व्याजदर तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता.
डिस्क्लेमर : SBI Savings Scheme In Marathi वरील लेखात नमूद केलेली माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित असून ती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. एफडी दर, परतावा आणि अन्य अटी काळानुसार बदलू शकतात. गुंतवणुकीपूर्वी अधिकृत बँक शाखेत किंवा वेबसाइटवर जाऊन अद्ययावत माहिती तपासून घ्यावी. लेखातील कोणतीही माहिती आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेऊ नये. |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |