4 वर्षीची प्रतीक्षा संपली; पुणे जिल्हा बँकेची (PDCC) भरती प्रक्रिया सुरु, हॉलतिकिट असे डाउनलोड करा | PDCC Hall Ticket Download

PDCC Hall Ticket Download पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, पुणे बँकेच्या लेखनिक पदासाठी दि.०७/०८/२०२१ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरून दि.०७/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्द‌तीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यापैकी पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, सदर प्रलंबित लेखनिक पदाची भरती प्रक्रिया ज्या टप्यावर प्रलंबित झालेली होती त्या टप्यावर पुढे सुरू करण्यात येत आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PDCC Hall Ticket Download

PDCC Hall Ticket संपूर्ण माहिती : 

1. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लेखनिक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी दिनांक ०७.०८.२०२१ ते दिनांक १७.०८.२०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

2. बँकेच्या लेखनिक सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केलेल्या त्या उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर ई-मेल आय.डी. वर लिंक पाठवण्यात येणार आहे. सदर लिंक द्वारे उमेदवारांना आपला पासवर्ड नव्याने अद्यावत करावयाचा आहे.

3. ज्या उमेदवारांचा ई-मेल आय.डी. व मोबाईल नंबर बदललेला आहे त्यांना ई-मेल आय.डी. व मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

4. बदलण्यात आलेल्या ई-मेल आय.डी. वर सरळसेवा भरती प्रक्रियेची लिंक पाठवण्यात येईल. सदर लिंक द्वारे उमेदवारांना आपला पासवर्ड नव्याने अद्यावत करावयाचा आहे. अद्यावत करण्यात आलेला ई-मेल आय.डी. व मोबाईल नंबर पुन्हा बदलता येणार नाही.

5. उमेदवारांना ई-मेल आय.डी. व मोबाईल नंबर बदलण्यासाठी नोंदणीकृत क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, जन्मतारीख व आधार क्रमांक इ. माहिती आवश्यक आहे.

6. ज्या उमेदवारांनी ई-मेल व मोबाईल नंबर यशस्वीरित्या बदललेले आहे, त्यांना पुढील प्रक्रियेसाठी अद्यावत केलेल्या ई-मेल व मोबाईल नंबर सरळसेवा भरतीसाठी ग्राह्य राहणार आहेत.

7. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र याबाबतची माहिती लॉगिन आयडीमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळावर (पोर्टल) भेट देऊन भरतीबाबतची माहिती अद्यावत करून घ्यावी.

PDCC Bank Ticket Download करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ EPFO न्यूज; PF मध्ये झाले 5 नवीन बदल, नागरिकांना “या” गोष्टी कराव्या लागणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

सूचना (PDCC Hall Ticket Download) :

उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करतांना नमूद केलेल्या ई-मेल आय. डी. वर सदर भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक उद्या सोमवार, दि. १९/०५/२०२५ रोजी पाठविण्यात येणार आहे. बँकेच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या/येणाऱ्या सुचनांचे अवलोकन व पालन करून उमेद‌वारांनी पुढील सर्व प्रक्रिया पुर्ण करून ध्यावी, बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

डिस्क्लेमर : PDCC Hall Ticket Download या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. हॉल तिकीट अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत वेबसाईटवरून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment