Ladki Bahin Yojana; लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी रुपये वितरण, आदेश जारी “या” दिवशी पैसे बँक खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana Tribal Fund transfer 335 Crore Maharashtra Government राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजेनसाठी आता आदीवासी विकास विभागाकडून मोठा आर्थिक हातभार देण्यात आला आहे. अनुसूचित जमातीतील महिलांना लाभ देण्यासाठी मे महिन्यासाठी या योजनेसाठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. शुक्रवारी आदीवासी विकास विभागाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे अधिवासी महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजने अंतर्गत मानधनाचे वाटप लवकरच होणार आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana Tribal Fund transfer 335 Crore Maharashtra Government

या निधीचा उपयोग केवळ त्या आदीवासी महिलांसाठी केला जाणार आहे, ज्या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत. या पूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले होते कि, अनुसूचित जमातीतील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विकास विभागाच्या बजेटमधून दिला जाईल. याच पार्श्वभूमीवर २०२५-२६ च्या अर्थसंकलपात अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी 21415 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

या पैकी आदीवासी विकास विभागासाठी देण्यात 3420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठीच 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. (Ladki Bahin Yojana Tribal Fund transfer 335 Crore Maharashtra Government ) हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा होणार असून, यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. 

राज्य सरकारचा निर्णय आदिवासी भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे अनेक महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ लवकरच मिळेल आणि त्यांना स्वयंपूर्णतेचा आधार मिळेल. 

“या” दिवशी बँक खात्यात पैसे येणार : 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी पाहत होत्या. योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार असे देखील महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने देखील सांगण्यात आलेले होते परंतु याबद्दलची तारीख अथवा प्रत्यक्षात निधी मात्र वितरित करण्यात आला नव्हता.

आता मात्र योजनेसाठी मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाचे सर्व मार्ग मोकळे झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे.ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला होता त्या सर्व बहिणींना मे महिन्याचा देखील हफ्ता मिळणार आहे.

हेही वाचा : केंद्र सरकारचे नवीन नियम “या” नागरिकांना ‘आयुष्मान कार्ड’ मिळणार नाही? योजनेच्या नवीन अटी, पात्रता जाणून घ्या 

हेही वाचा : चांगला निर्णय, म्हाडाने घरांच्या किंमती कमी केल्या | सुमारे 1.50 लाखापर्यंत सूट

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

डिस्क्लेमर : Ladki Bahin Yojana Tribal Fund transfer 335 Crore Maharashtra Government या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योजनेची अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment