Navi Mumbai Cidco Lottery नवी मुंबईत सध्या जागांचे आणि घरांचे भाव कोट्यवधींच्या घरात आहेत. सिडको 22 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. वाशी, खारघर आणि द्रोणागिरीत मिळणार घरं
Navi Mumbai Cidco Lottery
विमानतळ आणि वेगाने रस्तेमार्गाचे जाळे विणले जाणाऱ्या नवी मुंबईत सध्याच जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे नवी मुंबईत सर्वसामान्यांना घर विकत घेणे अवघड होऊन बसले आहे. साध्या वन बीएचके घरांची किंमत कोट्यवधींच्या घरात गेली आहे. त्यामुळे नवी मुंबईत (Navi Mumbai homes) चांगल्या परिसरात घर घेणे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नसते.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांकडे (CIDCO Lottery) डोळे लावून बसलेले असतात. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून लवकरच नव्या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून नवी मुंबईतील तब्बल 22 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील.
22 हजार घरांसाठी लॉटरी :
जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील गृहयोजनेतील शिल्लक राहिलेल्या 16 हजार घरांचासुद्धा यात समावेश केला जाणार आहे. सिडकोने अलीकडेच काढलेल्या 26 हजार घरांच्या विक्री योजनेला विविध कारणांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. असे असले तरी सोडतीत यशस्वी ठरलेल्या जवळपास दहा हजार ग्राहकांनी घराचा पहिला हप्ता भरला आहे. हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.Navi Mumbai Cidco Lottery
हेही वाचा : क्लिक करा ⇒ Whatsapp धारकांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार ‘हे’ नवीन फीचर्स, संपूर्ण माहिती वाचा
नवीन मुंबई कोणत्या परिसरात घरे ?
लवकरच सिडकोच्या घरांची सोडत प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून घरांच्या लॉटरीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु होईल, असा अंदाज आहे. लॉटरीत जवळपास 22 हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय. सिडकोच्या संचालक मंडळाची आज बैठक आहे. या बैठकीत सोडत प्रक्रिया कधी सुरु होणार, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या नव्या सोडतीमधील 22 हजार घरांमध्ये वाशीसह, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणागिरी येथील घरांचा समावेश आहे.
मुंबईत 5000 घरांसाठी लॉटरी
मुंबईत म्हाडा प्राधिकरणाकडून दिवाळीपूर्वी 5000 घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडाने पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरं बांधणीचं उद्दिष्ट ठेवलं असून मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी 5000 घरांची सोडत निघाल्यास तो सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरेल.Navi Mumbai Cidco Lottery
हेही वाचा : क्लिक करा ⇒ शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सरकारकडून मिळणार 5 लाख रुपये अनुदान, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Navi Mumbai Cidco Lottery वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.