Farmer Id Card List Maharashtra फार्मर आयडी सध्या अनेक योजनांसाठी मागितली जात आहे तसेच ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना’ आणि ‘नमो शेतकरी योजना’ या योजनांसाठी देखी फार्मर आयडी कार्ड ची गरज भासत आहे त्यामुळे राज्यभरात अनेक शेतकऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून याची यादी कशी चेक करायची? आपण या लेखात पाहणार आहोत.
Farmer Id Card List Maharashtra
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असून त्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आयडी (Farmer ID Card) यादी डाउनलोड करून आपले नाव कसे चेक करायचे? यासाठी शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. चला तर मग हि संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.
फार्मर आयडी (Farmer ID Card) नेमकं काय आहे ?
महाराष्ट्र राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकाने अग्रोस्टॊक (Agristock Scheme ) अंतर्गत फार्मर आयडी कार्ड मंजूर करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप मोठे फायदे होणार आहेत त्यामध्ये जमिनीची माहिती, बाजार भाव, पिकाची उत्पन्न, पिकावरील रोग आणि त्यावरील आवश्यक माहिती, डिजिटलायझेशन आणि जमीन मालकांसाठी संबंधीत असणारी सर्व माहिती. अशा प्रकारची इतर माहिती शेतकऱ्यांना एकाच ठकाणी उपलब्ध होणार आहे.
या फार्मर आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकरी राज्यातील विविध सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात पीएम किसान सारख्या योजनेचा पुढील हफ्ता मिळण्यासाठी तर बंधनकारक करण्यात आलेले आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ आज सकाळीच 8 वाजता सोन्याचा भाव घसरला, सोन्याचे लाईव्ह आजचे दर पहा, दुकानात खरेदीसाठी गर्दी
फार्मर आयडी (Farmer ID Card) यादी कशी चेक करायची :
- फार्मर आयडी कार्ड (Farmer Id Card List Maharashtra) स्टेटस चेक करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट भेट द्या.
- त्यानंतर येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा. व त्यानंतर तुम्ही नोंदणी आधीच केलेली असेल तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
- स्क्रीनवर तुम्हाला लगेच तुमच्या नोंदणीची सर्व माहिती उपलब्ध होते.
- युनिक फार्मर आयडी तपासा : स्क्रीन वर तुम्हाला युनिक फार्मर आयडी क्रमांक दिसतो सद्य यामध्ये दुरुस्तीचा पर्याय सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्ही नोंदणी करताना जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला दिसते.Farmer Id Card List Maharashtra
फार्मर आयडी (Farmer ID Card) डाउनलोड या पद्धतीने करा :
- प्रथम फार्मर आयडी कार्ड या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. येथील लॉगिन करताना तुमचा आधार कार्ड नंबर चा वापर करा.
- माहिती पहा ‘view Details ‘ हा पर्याय दिसतो त्यावर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला तुम्ही आयडी कार्ड पहारा येईल. तुम्ही प्रोफाइल ची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
- पीडीफ डाउनलोड करावी : वरील बाजूला तुम्हाला Generate PDF या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि तुमचे आयडी कार्ड डाउनलोड करायचे आहे तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकतात.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; लाडकी बहीण योजना जून हफ्ता 1500 नाहीतर 3000 रुपये “या” महिलांना मिळणार, यादीत तुमचे नाव आहे का?
फार्मर आयडी कार्डचे फायदे कशा प्रकारे मिळतात :
सरकारी योजना तसेच अनुदान आणि कर्ज सुविधा प्रक्रिया सोपी होण्यास मदत होईल.
पीक विमा संबंधी अपडेट तसेच बाजार भाव, जमीन मालकीची खात्रीशीर माहिती घरबसल्या मिळेल तसेच शेती संबंधित मार्गदर्शन मिळेल. पिकाची सर्व माहिती मिळेल. हमीभाव आणि बाजारभाव अशी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
डिजिटल शेती व्यवस्थापना याच्या माध्यमातून चालना मिळणार आहे.
फार्मर आयडी काढून तुम्ही अशा प्रकारे सर्व लाभ मिळवू शकता त्यामुळे लवकर लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढणे देखील महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजना , नमो शेतकरी योजना यांचा हफ्ता जमा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. Farmer Id Card List Maharashtra
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Farmer Id Card List Maharashtra वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.