म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती पहा | Mhada Lottery 2025

Mhada Lottery 2025 म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक मंडळाकडील 1418 घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज नोंदणीला प्रारंभ झाला आहे. म्हाडा योजनांचा धमाका सुरु, 1418 घरांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात, अर्ज प्रक्रिया, दर व संपूर्ण माहिती !   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mhada Lottery 2025

म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर-जिल्हा, बीड व नाशिक शहरामधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1 हजार 418 निवासी सदनिका व भूखंडांच्या ऑनलाइन संगणकीय सोडतीद्वारे विक्रीकरिता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा ‘गो लाईव्ह’ शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आला.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे आदी उपस्थित होते.Mhada Lottery 2025

हेही वाचा : क्लिक करा ⇒ जुलैच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण, ग्राहकांना खरेदीसाठी सुवर्णसंधी

“या” ठिकाणी 1418 घरांसाठी सोडत 

छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1 हजार 148 सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 164 सदनिका,20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 39 सदनिका/भूखंडांचा समावेश आहे. तसेच नाशिक मंडळातील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील 63 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 04 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 1148 सदनिका, अल्प उत्पन्न गटाकरिता 266 सदनिका, मध्यम उत्पन्न गटाकरिता 04 सदनिकांचा समावेश आहे.Mhada Lottery 2025

अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु 

छत्रपती संभाजी नगर व नाशिक मंडळाच्या संगणकीय सोडतीसाठी एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच Integrated Housing Lottery Management System (IHLMS 2.0) या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपवर सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी 12.00 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेण्याकरिता दि. 11 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. दि. 11 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. दि. 12 ऑगस्ट, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.

अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी दिनांक दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर केली जाणार आहे. सोडतीचे स्थळ व दिनांक मंडळातर्फे नंतर कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण जून हफ्त्यासाठी निधी मंजूर, “या” दिवशी एकत्र 3000 रुपये जमा होणार, लिस्ट जाहीर

लॉटरीची अधिकृत जाहिरात 

म्हाडा लॉटरीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

अँप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करून अर्ज भरू शकता : 

सोडतीत सहभागी होण्यासाठी IHLMS 2.0 या प्रणालीच्या माध्यमातून अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, अर्ज भरणा, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत. तसेच सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे मोबाइल ऍप स्वरुपात देखील उपलब्ध आहे. अर्जदार अँड्रॉइड (android) फोन मध्ये प्ले स्टोअर आणि आयओएस (ios) प्रणालीच्या अॅप स्टोर मधून म्हाडा लॉटरी ऍप डाउनलोड करू शकतात.Mhada Lottery 2025

याव्यतिरिक्त https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी केले आहे.

Disclaimer : Mhada Lottery 2025 वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी. 

Leave a Comment