Mahajyoti Free Tablet 2025 तुम्ही अथवा तुमच्या परिवारातील मित्रांपैकी कोणीही 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असल्यास त्यांच्यासाठी महाज्योतीमार्फत पुढील परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यासाठीच इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच प्रत्येक दिवशी 6 GB इंटरनेट डेटा देखील पुरवण्यात येतो.
मित्रांनो महा ज्योती अंतर्गत मिळणाऱ्या मोफत टॅबलेटचा मूळ उद्देशात असतो की ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पास करून अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतले आहे आणि त्यांना सीईटी असेल किंवा नीट असेल अथवा जे डबल इ असेल या परीक्षांची तयारी करण्यासाठीच हा टॅबलेट आणि त्यासोबत मोफत 6GB इंटरनेट डेटा दिला जातो.
Mahajyoti Free Tablet 2025
मित्रांनो सदरील अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 31/07/2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. सदरील अर्ज मध्ये पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे अर्ज केल्यास ते अर्ज ग्राह्य धरलेला नाहीत यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहेत. आणि अर्ज करत असताना सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन केलेले असावेत. यामध्ये निवड प्रक्रियेबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे राहणार आहेत.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA तर्फे ई- लिलाव, 80 वर्षाच्या भाडेपट्टा तत्वावर भूखंड पुण्यातील “या” ठिकाणी उपलब्ध, त्वरित अर्ज करा
फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता :
- विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावीला विज्ञान शाखेमध्ये ऍडमिशन घेतलेले असावे.
- अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्ग त्यासोबतच नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा.
- विद्यार्थ्यांची निवड ही दहावी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर त्यासोबतच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.Mahajyoti Free Tablet 2025
फ्री टॅबलेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- दहावी पास प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश केल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट
- अनाथ असल्यास संदर्भातील दाखला
- दिव्यांग असल्यास संदर्भातील दाखला Mahajyoti Free Tablet 2025
हेही वाचा : क्लिक करा ⇒ मोठी बातमी; लाडकी बहीण हफ्त्याचे वितरण पुन्हा होणार ! महिलांना 3000 रुपये “या” दिवशी मिळणार?
महा ज्योतीच्या या कॉल सेंटर नंबर
0712-2870120/21 सदरली योजनेचा अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तुम्ही महा ज्योतीच्या या कॉल सेंटर नंबर वर कॉल करून सर्व माहिती घेऊ शकणार आहात. योजनेसाठी लवकरात लवकर तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत आणि या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा आहे याची अर्ज करण्याची लिंक त्यासोबतच अधिकृत जाहिरात खाली देण्यात आलेली आहे.
फ्री टॅबलेट योजना जाहिरात | येथे क्लिक करा ⇐ |
फ्री टॅबलेट ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Mahajyoti Free Tablet 2025 वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.