Antyodaya Ration Card Free Saree Scheme अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. साधारण होळीपर्यंत हे साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात 48 हजार 874 महिलांना हि साडी मिळणार आहे. त्या सर्वाधिक 7 हजार 975 साडया बारामती तालुक्यात वितरित केल्या जाणार आहेत. रेशन दुकानावर अन्न धान्याबरोबर आता साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, सरकारने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडयांचे वाटप करण्यात येणार आहे.
Antyodaya Ration Card Free Saree Scheme
अंत्योदय अन्न योजना (AAY) रेशन कार्ड म्हणजे गरीब कुटुंबाना अनुदानित अन्न मिळवून देण्यासाठी भारत सरकारची योजना आहे. या रेशन कार्डधारकांना दरमहा अन्न्नध्यान मिळते. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमधून एक कोटी सर्वात गरीब कुटुंबांची निवड करणे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात अनुदानित दराने (तांदूळासाठी प्रति किलो ३ रुपये आणि गव्हासाठी प्रति किलो २ रुपये) तांदूळ आणि गहू पुरवणे समाविष्ट होते.
(Antyodaya Ration Card Free Saree Scheme) राज्य सरकारांनी ओळखलेल्या गरीब कुटुंबांना या प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहेत. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने अन्नधान्य मिळते.
Antyodaya Ration Card
अंत्योदय रेशन कार्डसाठी पात्रता :
- रिक्षा चालक, रोजंदारी मजूर, आणि कुली यांसारख्या स्थिर उत्त्पन्न नसलेल्या व्यक्ती
- बेरोजगार व्यक्ती, महिला आणि वृद्ध
- शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेली व्यक्ती
- 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्ध पेशनधारक
- 1 लाख 50 हजार पर्यंत वार्षिक उत्त्पन्न असलेले कुटुंब
- योजनेचा लाभ हा भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, कुंभार, चांभार, मोची, विणकर, सुतार, लोहार, झोपडपट्टीतील रहिवाशी, रोजंदारी करणारे नागरिक, हमाल, मालवाहक, सायकलरिक्षा चालवणारे, हातगाडी चालवणारे, फळ विक्रेते, फुल विक्रेते, गारुडी, कचऱ्यातील वस्तू गोळा करणारे तसेच निराधार असे नागरिक या योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. Antyodaya Ration Card Free Saree Scheme
अंत्योदय कार्डधारकांना मोफत साडी, एक साडी दरवर्षी मिळते :
राज्य सरकारने अंत्योदय शिधाधारकांना एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अंत्योदय कार्डधारक आहे. तर सार्वधिक कमी कार्डधारक हवेली तालुक्यात असल्याचे शासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा सणासुदीचा क्षण आनंदाचा असणार आहे.
जिल्ह्यातील सुमारे 48 हजार 874 शिधाधारकांना अर्थात महिलांना मोफत साडी देण्याचा या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोउद्योग विभागाकडून केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभाग कडून शिधाधारकांची संख्या व त्याचे वितरण केले जाणार आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद || Antyodaya Ration Card Free Saree Scheme