avocado in marathi | एवोकॅडो आहे काय ? आरोग्यासाठी उत्तम | एवोकॅडो फळ खाण्याचे 10 फायदे | avocado benefits

avocado in marathi | एवोकॅडो नक्की काय : एवोकॅडो हे एक अमेरिकामधील उत्कृष्ट असे खाण्याचे फळ आहे. हे फळ हिरव्या रंगाचे असून या फळाच्या साली जाड असतात, या एवोकॅडो फळामध्ये एक मोठे बी किंवा बीज असते, त्याचा आकार खूप मोठा असतो. खाण्यासाठी चविष्ट आणि विविध गुणधर्मामुळे हे पूर्ण जगात खूप लोकप्रिय आहे. हेल्दी जीवन राहण्यासाठी खूप असे लोक आहेत जे एवोकॅडो फळाचा वापर करत आहे. एवोकॅडोमध्ये असणाऱ्या विविध पोषक गुणधर्मामुळे ते खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फळ खूप कमी लोकांच्या खाण्यात येते या फळाबद्दल जास्त कोणाला माहित नाही म्हणून आज आपण या लेखात या विषयी माहिती पाहणार आहोत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एवोकॅडो फळाबद्दल माहिती | avocado in marathi

एका एवोकॅडोमध्ये सुमारे १७० कॅलेरीज असतात, व्हिटॅमिन इ, फायबर, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन सी या सर्व गोष्टी भरपूर प्रमाणात आढळतात. यात असणारे फटी ऍसिड हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असे फळ आहे. हे फळ खाण्याचे अनेक प्रकारचे फायदे असतात. भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी याचा उपयोग होतो, त्वचेवरचा सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, शरीरातील हाडे मजबूत होतात, निरोगी डोळे राहण्यासाठी एवोकॅडो फळ खाणे फायदेशीर ठरते, यातील फायबरमुळे पोट व्यवस्तीत साफ होण्यास मदत होते. अशा अनेक प्रकारचे फायदे आपण पुढे पहाणार आहोत, चला तर मग.

avocado fruit in marathi
avocado fruit in marathi

एवोकॅडोमध्ये पोषक घटक | avocado fruit in marathi

एवोकॅडो फळामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक आहे याची माहिती खाली दिलेली आहे. 

पोषक घटक  100 ग्रॅम प्रति 
फॅट 15.4 g
कैल्शियम  13 mg
व्हिटॅमिन सी  8.80 mg
व्हिटॅमिन ई  1.97 mg
व्हिटॅमिन ए  7 mg
व्हिटॅमिन बी 3 1.91 mg
व्हिटॅमिन बी 5 1.91 mg
एनर्जी  167 Kcal
प्रोटीन  1.96 g
फायबर  54 mg
कार्बोहाफ्ट्स  8.64 mg
आयरन  0.61 mg
जिंक  0.68 mg

एवोकॅडो खाण्याचे विविध फायदे | avocado benefits in marathi 

  1. त्वचेसाठी उपयोग 
  2. कॅन्सरपासून बचाव 
  3. ब्लड शुगर कमी करते 
  4. डोळ्यांसाठी फादेशीर 
  5. हाडयांच्या मजबुतीसाठी 
  6. सांधे दुखी कमी करण्यासाठी 
  7. वजन कमी करण्यासाठी 
  8. हृदय निरोगी राहण्यासाठी 
  9. केस चांगले राहण्यासाठी 
  10. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी.
avocado benefits in marathi
avocado benefits in marathi

वरील सर्व फायदे एवोकॅडो फळ खाल्यामुळे होते त्याचा पूर्ण माहिती खालीलप्रमाणे 

१) त्वचेसाठी उपयोग 
त्वचेवर चांगला ग्लो येण्यासाठी आणि चेहरा चमकदार होण्यासाठी एवोकॅडो फळ झाले जाते. या फळामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी मोठा प्रमाणात असतात. तसचे या फळाचा फायदा चेहेर्यावरील सुकूत्या कमी होण्यास मदत होते.

२) कॅन्सरपासून बचाव 
एवोकॅडो फळ खाल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते कारण या फळामध्ये फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, आणि फायटोकेमिकॅल यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कर्करोगासाठी झुंज देण्यासाठी डॉक्टर एवोकॅडो फळ खाण्याचा सल्ला देतात.

३) ब्लड शुगर कमी करते
मेक्सिकोच्या नॅशनल इन्स्टूट ऑफ कार्डियोलॉजि संस्थामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणतुन असे सिद्ध झाले कि, एवोकॅडो फळ डायबीज टाईप २ होण्यापासून बचाव करते. डायबीज टाईप २ लोकांना एवोकॅडो फळ उपयुक्त होत आहे.

४) डोळ्यांसाठी फादेशीर
एवोकॅडो फळ हे डोळ्यांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असे फळ आहे. या फळामध्ये असणारे ल्युटीन वाढत्या वयानुसार येणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांवर फादेशीर ठरते जसे कि मोतीबिंदू आणि इतर अजून काही समस्या ज्या डोळ्या संबधीत असतात. 

५) हाडयांच्या मजबुतीसाठी 
एवोकॅडो फळ हाडांसाठी फायदेशीर आहे कच्या एवोकॅडो फळामध्ये बोरॉन मिनरल असते जे हाडांच्या मजबूत करण्यासाठी होत असतो या फळामध्ये इंफ्लामेंट्री पोषक घटक असल्यामुळे सांधे दुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

६) सांधे दुखी कमी करण्यासाठी
सांधे दुखी कमी करण्यासाठी आणि पायावरील सूज कमी करण्यासाठी एवोकॅडो फळ खाणे अतिशय फायदे देणार आहे एवोकॅडो फळ यामधील गुणधर्मामुळे संधिवात टाळण्यासाठी मदत होते.

७) वजन कमी करण्यासाठी
एवोकॅडो फळ खाल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही या फळामध्ये बराच प्रमाणात कैलरीज आणि फायबरचे प्रमाण असते यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते जर तुमचे वजन सतत वाढत असेल किंवा तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडो फळ घेणे आवश्यक आहे याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

८) हृदय निरोगी राहण्यासाठी
एका सर्वेक्षणातून असे लक्षात आले की, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी एवोकॅडो फळ हृदयाला मदत करते आणि आपले हृदय निरोगी राहते. या फळामध्ये फॅटी ऍसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम व्हिटॅमिन इत्यादी पोषक द्रवे असल्यामुळे आरोग्य आणि हृदय एकदम निरोगी राहण्यासाठी मदत करते. म्हणून आपल्या आहारात एवोकॅडो फळ असणे गरजेचे आहे. 

९) केस चांगले राहण्यासाठी
कसे चांगले राहण्यासाठी एवोकॅडो फळ फायदेशीर आहे. एका संशोधनात असे मानले आहे की, या फळामध्ये व्हिटॅमिन ए , बी, बी-१ बी – २, ई आणि सी आणि इतर पोषक घटक आहेत या सर्व घटकांमुळे केस एकदम उत्तम आणि निरोगी तसचे केसांची वाढ चांगली होत राहते. 

१०) कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी
संशोधनात असेही आढळून आले की, या फळांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. याच्या आधारे असे आहे की, वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आण्याचे असेल तर एवोकॅडो फळाचे सेवन करणे गरजेचे आहे. 

हे पण वाचा : सॅल्मन फिश काय आहे? सॅल्मन फिश खाण्याचे 8 फायदे जाणून घ्या संपूर्ण माहिती

 

how to use avocado in marathi
how to use avocado in marathi
एवोकॅडो फळाचा उपयोग | how to use avocado in marathi

एवोकॅडो फळ (avocado in marathi) खास प्रकारचे फळ आहे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याचे सेवन करू शकता. कशाप्रकारे हे फळ खाले जाते ते आपण खालीलप्रमाणे पाहू. 

  • सकाळी नाश्ता किंवा ऑमलटे सोबत एवोकॅडो फळ खाऊ शकता.
  • फ्रुट सलाड सोबत जोडून एवोकॅडो फळ खाऊ शकता.
  • एवोकॅडोची आईस्क्रीम बनवून खाऊ शकता.
  • फ्रेन्च फार्सज बनवून खाऊ शकता 
  • ग्रील ब्रॅड सॅन्डविचमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता.

एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे YouTube विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ⇐

FAQ’s

प्रश्न : एवोकॅडो फळ रोज किती खावे?
उत्तर : दररोज अर्धा किंवा एक एवोकॅडो फळ खाणे फायदेशीर आहे. जास्त प्रमाणात सेवन करू नये.

प्रश्न : एवोकॅडो फळ खाण्याचे काही तोटे आहे का?
उत्तर : एवोकॅडो फळ खाण्याचे फायदे जरी भरपूर असेल तरी जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त खाल्याने काही जणांना ऍलर्जी होऊ शकते.

प्रश्न : एवोकॅडो फळ कसे खावे?
उत्तर : एवोकॅडो फळ कच्चे खाले तर जास्त फायदा मिळतो.

प्रश्न : एवोकॅडो फळाला मराठीत काय म्हणतात (avocado in marathi) ?
उत्तर : हे फळ भारतीय नसल्यामुळे याला अमेरिकेप्रमाणे एवोकॅडो फळच असे म्हणतात. 

प्रश्न : एवोकॅडो फळ कधी खावे?
उत्तर : दिवसाच्या वेळेत तुम्ही हे फळ कधीही खाऊ शकता.

सारांश :
एवोकॅडो फळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आहे जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ते फायदे कोण कोणत्या स्वरूपात आहे ते आपण आज पाहिले हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल तरी तुम्हाला एवोकॅडो फळ (avocado in marathi) बद्दल काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट करा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. धन्यवाद ||

 

Leave a Comment