भारत सरकारने आयुष्मान भारत योजना (ayushman bharat yojana) देशातील गरीब कुटुंब व शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) या नावानेही ओळखली जाते केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रायलने आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला या योजनेत प्रत्येक व्यक्तीला ५ लाखांपर्यन्त मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. खाजगी व सरकारी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ५ लाखांपर्यन्त मोफत वैद्यकीय उपचार घेता येईल.
तुम्हाला पण आयुष्मान भारत योजना (ayushman bharat yojana) लाभ घेण्याची इच्छा आहे का ? यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड बनवावे लागेल, यासाठी आपण आयुष्मान भारत कार्डसाठी काय पात्रता, लाभ, फायदे याबाबत सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
आयुष्मान भारत योजनेचे उद्धिष्ट | ayushman bharat yojana in marathi
- भारत देशातील गरीब कुटुंब व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी विविध आजारांवर उपचार करण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
- सामान्य जनतेची आजारांवर उपचार साठी ५ लाखांपर्यन्त खर्च सरकार देत आहे.
- या योजने अंर्तगत प्रत्येक व्यक्तीचे आयुष्मान कार्ड काढून आरोग्य विमा सरंक्षण देण्यात येत आहे.
- या योजनेचे प्रमुख उद्धिष्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारांव्यतिरिक्त दीड हजारहून अधिक आजारांचा समावेश आहे
- आयुष्मान भारत योजनेचे मुख्य उद्धिष्ट देशातील दहा कोटी कुटुंबाना विमा सरंक्षण देण्याचे आहे यामध्ये गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबाचा समावेश आहे.
आयुष्मान गोल्डन कार्ड म्हणजे काय | ayushman bharat card apply online
या योजनेच्या मार्फत एक आयुष्मान गोल्डन कार्ड भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काढू शकतात या योजने अंतर्गत कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय व लिंग याबाबत कोणतेही मर्यादा नाहीत या योजनेत पात्र असणाऱ्या कुटुंबियांना आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाईल हे कार्ड देशातील १३ हजार सरकारी आणि खाजगी रुग्णालयात स्वीकारले जाईल या कार्ड मार्फत तुम्ही कोणत्याही आजारांवर मोफत उपचार सुविधा मिळवू शकतात. पेशंटला ऍडमिट करण्यासाठी या कार्डची आवश्यकता असते.
आयुष्मान भारत योजना थोडक्यात माहिती
१. | योजनेचे नाव | आयुष्मान भारत योजना (आयुष्मान कार्ड ) |
२. | कोणाच्या देखरेखाली | भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय |
३. | कधी सुरु केली योजना | साल 2018 |
४. | योजनेचा लाभ | ५ लाखांपर्यन्त मोफत वैधकीय उपचार |
५. | वेबसाईट | https://pmjay.gov.in/ |
६. | अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
७. | ओळखपत्र | आयुष्मान गोल्डन कार्ड |
८. | कागदपत्रे | आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे |
आयुष्मान भरात योजनेची पात्रता व निकष | ayushman bharat yojana eligibility
शहरी भागातील पात्रता व निकष
- गृहस्थ कलाकार, शिंपी , सफाई कामगार
- कारागीर, स्वच्छता कर्मचारी, गार्डनर
- इलेट्रीकशन, मेकॅनिक, दुरुस्ती म्हणून काम करणार
- बांधकामातील मजूर, कामगार
- पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक आणि कुली
- प्लम्बर आणि वॉशर मॅन
- वाहतुकीतील कामगार, रिक्षा चालक, ड्राव्हर
- कचरा गोळा करणारे कामगार
- गॅरेजमध्ये काम करणारा कामगार
- छोटा मोठ्या हॉटेल मध्ये काम करणारे कर्मचारी
- छोटे व्यवसाय करणारे कारागीर
- हतकाम विणकाम करणारे
- मोल मजुरी करणारे कामगार
- भाजी पाला विकणारे, घरगुती व्यवसाय करणारे
ग्रामीण भागातील पात्रता व निकष
- पत्रे असणारी कच्चे घरे यातील कुटुंब
- एक खोली असणारे कुटूंब
- अपंग प्रमुख सदस्य असणारे कुटुंब
- शाररिक सक्षम सदस्य नसणारे
- SC/ST कुटुंबे
- झोपडीत राहणारे कुटुंब
- घरे नसणारी कुटुंब
- भिकारी
- बिगारी कामगार
आयुष्मान योजनेत कोणता वैधकीय खर्च समाविष्ट होतो | pradhan mantri ayushman bharat yojana/ayushman bharat yojana
- पेशंटचा ऍडमिट झाल्यानंतर सर्व खर्च कव्हर केला जातो.
- दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर शुल्कासाठी पंधरा दिवसाचे कव्हरेज असते.
- आयुष्मान योजनेत औषध आणि इतर वैदकीय पुरवठा देखील समाविष्ट केले जातो.
- दवाखान्यात राहण्याचा खर्च
- या योजनेत किलनिकल व प्रयोग शाळा चाचण्या
- आयुष्मान भारत योजनेमध्ये उपचार व सल्ला शुल्क समाविष्ट आहे.
- ICU खर्च समाविष्ट आहे.
- उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणीमुळे झालेला वैद्यकीय खर्च यामध्ये समाविष्ट आहे.
आयुष्मान भारत योजनेमध्ये कोणते आजार समाविष्ट होतात | ayushman bharat yojana list
आरोग्य मंत्रालयाने या योजने अंतर्गत १७६० आजरांवर उपचार होईल असे जाहीर केले आहे तसेच काही गंभीर आजार या योजनेत समाविष्ट केले आहेत ते पुढीलप्रमाणे
- पायांवर होणारी विविध शस्त्रक्रिया
- कर्करोग
- मणक्याचे विकार
- कॉवीड-१९ उपचार
- कोरोनरी बायपास
- जुन्या आणि नव्या अशा सर्व आजारांवर तुम्ही मोफत उपचार मिळूव शकतात.
आयुष्मान भारत योजनेचे फायदे | ayushman bharat yojana card
- हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना तुम्हाला आयुष्मान कार्ड दाखविणे अनिवार्य आहे.
- या योजनेचं लाभ कोणत्याही सरकारी आणि खाजगी रुग्णलयात उपलब्ध आहे.
- पेशंट पूर्ण बरे झाले आहेत याची पुष्टी करण्यासाठी १५ दिवसांसाठी वैदकीय तपासणी देखील केली जाते.
- आयुष्मान कार्ड असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे किंवा शुल्क भरण्याची आवश्यता नाही.
- वैधकीय खर्चासोबत वाहतुकीसाठी येणार खर्च यात समाविष्ट करण्यात आलेला आहे.
- या योजनेत डेकेअरचा समावेश आहे.
- देशातील ४०% लोकसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे.
आयुष्मान कार्ड ऑनलाईन कसे काढावे | ayushman card registration
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन apply करण्यासाठी https://pmjay.gov.in/ वेबसाईटवर क्लिक करा
- त्यांच्यानंतर वेबसाईटवर दिलेले am I Eligible वर क्लिक करा
- त्यानंतर beneficiary लॉगिन वर टॅबवर क्लिक करा
- यानंतर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही तुमचा आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर टाका आणि otp येईल तो रिकाम्या बॉक्स मध्ये टाका catch एंटर करून सबमिट करा
- नंतर E-KYC चा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून ऑथेंटिकेशन ची प्रक्रिया पूर्ण करा.
- हे सर्व झाल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल त्याच्यावर ज्या सदस्याचे आयुष्मान कार्ड काढायचे आहे ते सिलेक्ट करा
- पुढे परत E-KYC साठी ओपन होईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लाईव्ह फोटो घेतला जाईल ते झाल्यानंतर सेल्फी अपलोड करा
- पुढे अडडिशनल ऑपशन येईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या फॉर्ममध्ये पूर्ण माहिती भरावी
- शेवटी फॉर्म सबमिटवर क्लिक क्लिक करणे
- सर्व माहिती नीट भरल्यानंतर २४ तासाच्या आत आयुष्मान कार्ड approve होईल.
FAQ’s :-आयुष्मान भारत योजना (ayushman bharat yojana) बद्दल प्रश्न आणि त्यांचे उत्तरे
प्रश्न : आयुष्मान कार्डसाठी कोण पात्र आहे?
उत्तर : वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी आहे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी
प्रश्न : आयुष्मान कार्ड कसे बनवावे?
उत्तर : आयुष्मान कार्ड ऑनलाइन सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरून काढावे.
प्रश्न : आयुष्मान गोल्डन कार्ड काय आहे?
उत्तर : आयुष्मान गोल्डन कार्ड हे असे ओळख पत्र ज्याच्या साहाय्याने कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट होऊ शकतो.
प्रश्न : आयुष्मान कार्डसाठी नोंदणी कशी करावी?
उत्तर : ऑनलाइन वेबसाईट वरून https://pmjay.gov.in/ करावी
प्रश्न : आयुष्मान कार्डची लिमिट किती आहे?
उत्तर : आयुष्मान कार्डची लिमिट ५ लाखांपर्यन्त वैद्यकीय उपचार.
प्रश्न : आयुष्मान कार्डची प्रति वर्षी ५ लाखांपर्यन्त लिमिट आहे का?
उत्तर : हो, प्रति वर्षी ५ लाख रुपये.
प्रश्न : आयुष्मान कार्ड मध्ये कोणते कोणते आजार येतात?
उत्तर : कोरोना, हृदयरोग, डेंगू, चिकुनगुन्या, मलेरिया, डायलिसीस, पायाची शत्रक्रिया इतर गंभीर आजार
प्रश्न : आयुष्मान कार्डसाठी कुटुंब संख्या किती पाहिजे?
उत्तर : कुटुंबातील कितीही सदस्य लाभ घेऊ शकतात , ज्यांचे नाव रेशन कार्डवर आहे अश्या सर्वाना लाभ घेता येऊ शकतो.
प्रश्न : आयुषमान कार्ड वय वर्ष किती वर्षांपासून लागू होते?
उत्तर : वयाच्या दहाव्या वर्षांपासून आयुष्मान योजना लागू होते.
प्रश्न : आयुष्मान कार्डसाठी कोणते कागदपत्रे लागतात?
उत्तर : फक्त आधार कार्ड आणि आधारला मोबाईला लिंक असणे गरजेचे असते.
सारांश :
आज आपण या लेखात आयुष्मान भारत योजना (ayushman bharat yojana) याची सविस्तर माहिती पाहली आहे यात आपण योजनेचे उध्दीष्टे , फायदे, पात्रता, कागदपत्रे, आयुष्मान कार्डसाठी नोंदणी कशी करायची हे पण पाहिले आहे. या योजनेची माहिती आपल्या जवळच्या लोकांना शेअर नक्की करा.
lek ladki yojana | मुलींसाठी 1 लाख हवे आहे ? तर जाणून घ्या, लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व पात्रता क्लिक करा.