Ayushman Card Eligibility And Non Eligibility List भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजने’ अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आयुष्यमान कार्ड’ आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांना अद्यापही हे कार्ड अजूनही मिळालेले नाही, किंवा त्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पात्रतेचे निकष पूर्ण न करणे.
Ayushman Card Eligibility And Non Eligibility List
(Ayushman Card Eligibility And Non Eligibility List) योजनेच्या नवीन अटी आणि पात्रता संपूर्ण माहिती :
कोण पात्र असणार ?
- असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिक
- ज्यांनी आधीपासून कोणत्याही सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घेतलेला नाही.
- दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटुंबातील सदस्य
- अनुसूचित जाती -जमातीतील नागरिक
- निराधार किंवा आदीवासी
- रोंजदारीवर काम करणारे श्रमिक
- 70 वर्षाहून अधिक वय असलेले नागरिक
कोण पात्र नसणार ?
- संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी
- ज्यांच्याकडे ESIC कार्ड आहे.
- PF कपात होणारे कामगार
- जे आर्थिकदृष्ट्या सधन आहेत
- सरकारी नोकरीत कार्यरत असलेले
- जे नियमिपणे इनकम टॅक्स भरतात
Ayushman Card साठी पात्रता कशी तपासायची?
आपली पात्रता तपासासाठी https://pmjay.gov.in/ या संकेत स्थळावर जा. ‘Am I Eligible ‘ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र आहेत कि नाही ते कळू शकते.
आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे ?
- जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जा
- तेथे तुमची पात्रता तपासली जाईल
- आवश्यक कागदपत्रे सादर करा व याची पडताळणी करा
- सर्व माहिती योग्य आढळ्यास अर्ज दाखल करून घेतला जाईल
- त्यानंतर काही काळात तुमचे आयुष्मान कार्ड जारी केले जाते.
निष्कर्ष : आयुष्मान कार्ड मिळाल्यावर, तुम्ही दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर विलंब न करता अर्ज करा.
डिस्क्लेमर : Ayushman Card Eligibility And Non Eligibility List या लेखातील माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. योजनेची अचूक माहिती संबंधित शासकीय अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्यावी. कोणताही निर्णय घेताना स्वतःची जबाबदारीने कृती करावी.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |