बजाजने जगातील पहिली CNG Bike, Bajaj Freedom 125 CNG Bike 5 जुलै 2024 लॉन्च करून पूर्ण भारतात धमाका केला आहे. कंपनीने या सुपर बाईकला Bajaj Freedom 125 CNG Bike असे नावही देण्यात आलेले आहे. अगदी सुरुवाती पासून या बाईकची चर्चा सर्वत्र चालू होती अखेर आज या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे. मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते जगातील पहिली CNG बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. ह्या बाईकची किंमत देखील जाहीर करण्यात आलेली आहे. कोणताही बाइकमध्ये प्रमुख भाग जो असतो तो मायलेज बजाज कंपनींकडून असे सांगण्यात आले आहे की, बाईकचा मायलेज 213 किमी प्रति किलोमीटर पर्यंत देईल. चला तर मग आपण या बाईकची संपूर्ण माहिती पाहूया.
Bajaj Freedom 125 CNG Bike मध्ये दोन लिएटरची पेट्रोलची टाकी आणि दोन किलो CNG ची टाकी आहे. दोन्ही इंधन एकत्र करून बाईक 330 किमी धावेल असा बजाज कंपनीचा दावा आहे.
Bajaj Freedom 125 CNG Bike माहिती
बजाज कंपनीने आपली पहिली CNG Bike लॉन्च करून पूर्ण मार्केटमध्ये धमाका केला आहे. या CNG बाईकमध्ये काय खास असणार आहे ते आपण पाहणार आहोत. नवीन CNG बाईकची निर्मिती ही भारत देशातील बजाज कंपनीने केली आहे. कंपनीने Bajaj Freedom 125 CNG Bike मध्ये 125 सीसी चे इंजिन देण्यात आलेले आहे. बाईकच्या सीट खाली 2 लिटरची CNG ची टाकी देण्यात आलेली आहे. बाईकला आकर्षक असा ऍडव्हेंचर असा जबरदस्त लुक देण्यात आला आहे. 125 सीसीचे इंजिन असेल तर ही CNG मोडवर बाईकची कार्यक्षमता 100 सीसी सारखी असेल. विशेष म्हणजे नवीन बाईकमध्ये CNG मोड आणि रेगुलर पेट्रोल मोड असे दोन्ही ऑप्शन टोगॅल स्वीच देण्यात आले आहे.
Bajaj Freedom 125 CNG Bike किंमत
बजाज कंपनीची भारतातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 CNG Bike याची किंमत ड्रम ब्रेक आणि हॅलोजन हेडलाईट याही किंमत 95,000/- एक्स शोरूम आहे आणि ड्रम ब्रेक आणि LED हेडलाईट याही किंमत 1,05,000/- अशी आहे. आणि टॉप एन्ड व्हिरिएंट फ्रंट डिस्क ब्रेक अँड LED हेडलाईट त्याची किंमत 1,10,000/- इतकी आहे. कंपनीकडून असेही सांगण्यात आलेले आहे की, ही एक बजेट बाईक असणार आहे. 125 सीसी सेगमेंट ही बाईक महाग असू शकते पण CNG मोड असल्यामुळे आणि जास्त मायलेज असल्यामुळे ह्या बाईकची विक्री जास्त होऊ शकते.
बाईक तीन मॉडेल | किंमत |
Bajaj Freedom 125 Disc LED | 1,10,000/- |
Bajaj Freedom 125 Drum LED | 1,05,000/- |
Bajaj Freedom 125 Drum | 95,000/- |
हे पण वाचा ⇓
Bajaj Chetak 2901 | बजाज इलेक्ट्रिक fast स्कूटर लॉन्च | Best Price 95,998/- जाणून घ्या संपूर्ण माहिती
CNG बाईकचे फायदे च फायदे
CNG बाईक करण्याचे उद्धिष्ट हे वाढत्या पेट्रोलचे भाव लक्षात घेऊन केले आहे. भारतात पेट्रोल हे कमीतकमी 100 रुपये प्रति लिटर आहे आणि CNG चे भाव 60 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. एक पेट्रोल बाईक 40 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असते. आणि एक CNG बाईक 213 किलोमीटर प्रति किलोग्रॅम मायलेज देते. म्हणजे पेट्रोल पेक्षा CNG मोटरसायकल खूप परवडते. आणि पैशाची बचत होते.
असा समजा की, एक किलोमीटरला पेट्रोल बाईकला 2.50 रुपये खर्च होतो आणि CNG बाईकला 0.60 रुपये पर्यन्त खर्च होतो. म्हणजे 100 किलोमीटर जाण्यासाठी 250 रुपयेचे पेट्रोल लागते आणि CNG बाईकला 100 किलोमीटर जाण्यासाठी 60 रुपये खर्च होतात.
अशा प्रकारे वर्षाचे आखाडे पाहिले तर, जर कोणी कस्टमर 1 वर्षात 10,000 किलोमीटर जात असेल तर पेट्रोल बाईक चालविण्यासाठी 25,000/- रुपये खर्च होतील आणि असा खर्च CNG बाईकला फक्त 6000/- रुपये इतका येईल.
पेट्रोल बाईकच्या तुलनेत CNG बाइकमध्ये 75 % बचत होते हा फक्त एक अनुमान आहे.
Bajaj Freedom 125 CNG Bike फीचर्स
- Bajaj Freedom 125 CNG Bike ही 125 सीसी इंजिन आहे आणि CNG मोड ही 100 सीसी इंजिन पर्यन्त आहे.
- ह्या बाईकला एक ऍडव्हेंचर लुक देण्यात आला आहे.
- बजाज CNG बाईकला एक 2 लिटरची टाकी देण्यात आलेली आहे.
- Bajaj Freedom 125 CNG Bike ला एक 2 लिटरची CNG टाकी देण्यात आलेली आहे.
- ह्या बाईकमध्ये मजबूत असे दोन्ही टॅंक, सिल्वर कलर असेसिरीज, राऊंड हेड लाईट, हान्डेलबार ब्रेसेस, नकल गार्ड, आणि फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे.
- ऍडव्हेंचर बाईक प्रमाणे सीटची उंची, चांगले ग्राउंड कलरन्स आणि ऍडव्हेंचर स्टाइल असणार आहे.
- 5 स्पोक आलोय व्हील दिले आहे.
- बाईकची स्टायलिश डिझाईन स्ट्रॉंग आहे.
- पेट्रोल मोड आणि CNG मोड असे स्वीच देण्यात आलेले आहे.
Model | Bajaj Freedom 125 CNG Bike |
Engine Capacity | 125 cc |
Launch | 05 Jule 2024 |
No. of Cylinders | 1 |
Front Break | Drum |
Rear Break | Drum |
Speedometer | Digital |
Braking Type | Combi Brake System |
Mode | Petrol Mod and CNG mod |
CNG बाईकमुळे प्रदूषण कमी होईल
CNG बाईकमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. एका चाचणीच्या दरम्यान कार्बन डायोक्सइड उसर्जनात 50 % घट, कार्बन मोनोऑक्ससाइड उसर्जनात 75 % घट, आणि गैर मिथेन ड्रायड्रोकार्बन उसर्जनात सुमारे 90 % घट झाली आहे. पेट्रोल बाईकच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की, CNG बाईकमुळे कमी प्रदूषण झाले आहे.
FAQ’s
प्रश्न : Bajaj Freedom 125 CNG Bike कधी लॉन्च होणार आहे?
उत्तर : 05 जुलै 2024
प्रश्न : बाईकची किंमत किती आहे?
उत्तर : 80,000 ते 1,00,000 दरम्यान
प्रश्न : बाईक किती सीसी आहे?
उत्तर : 125 cc इंजिन आणि CNG मोडवर 100 cc
प्रश्न : बाईकचा टॉप स्पीड किती आहे?
उत्तर : Top Speed 90 kmph
प्रश्न : CNG bike मायलेज किती आहे?
उत्तर : 80 to 90 किलोमीटर per KG .
सारांश :
बजाजची नवीन बाईक भारतातील पहिली सान्ग बाईक Bajaj Freedom 125 CNG Bike या बदल माहिती आपण या लेखात पाहिली आहे. ज्यामध्ये बाईकची किंमत आणि फीचर्स या बदल माहिती आपण पाहिली आहे. या माहितीमध्ये तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट करू शकता. आणि माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद…