Bank Holidays in april 2025 in maharashtra रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून प्रत्येक महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचादेखील समावेश असतो. राज्यानुसार सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल केला जातो. आता 31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 च्या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंध असलेल्या आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करावा लागतो. त्यामुळे 31 मार्चची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी इत्यादी शहरांमध्ये 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल.
Bank Holidays in april 2025 in maharashtra
महाराष्ट्र राज्यातील आणि देशभरातील ज्या बँका आहेत त्या एप्रिल महिन्यात दहा दिवस बंद राहणार आहेत ते दहा दिवस कोणते आहेत नेमके त्याच्यामुळॆ आपल्याला आर्थिक व्यवहार करण्यासाठी काय प्लॅनिंग करावे लागेल या सर्वांची माहिती आपण आज घेणार आहोत.
कोणकोणत्या सुट्या मिळणार? आणि शनिवार-रविवार मुळे कोणत्या सुट्या वाया जाणार? हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. कारण लाँग वीकेंड पाहून लोक वेगवेगळ्या गोष्टींचे नियोजन करतात. एप्रिलमध्ये एकूण 2 लाँग वीकेंड मिळत आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Bank holidays in april 2025 in maharashtra in marathi list
एप्रिल महिना सुरु होत असून, या महिन्यात अनेक धार्मिक सण आणि विशेष प्रसंगामुळे बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या मिळणार आहेत. RBI च्या नियमानुसार, एप्रिल 2025 मध्ये राज्यातील आणि देशभरातील विविध राज्यामध्ये एकूण 10 दिवस बँक बंद राहणार आहेत. या बँक सुट्ट्यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या धार्मिक सण आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारचा समावेश असणार आहे.
एप्रिल महिन्यातील संपूर्ण सुट्ट्यांची यादी :
- 1 एप्रिल 2025 (मंगळवार) – आर्थिक वर्ष
- 6 एप्रिल 2025 (रविवार) – श्री राम नवमी
- 10 एप्रिल (गुरुवार) – भगवान महावीर जयंती
- 12 एप्रिल (दुसरा शनिवार ) हनुमान जयंती
- 13 एप्रिल (रविवार)
- 14 एप्रिल (सोमवार) डॉ. बाबासाहेब जयंती
- 18 एप्रिल (शुक्रवार) गुड फ्रायडे
- 20 एप्रिल (रविवार)
- 26 एप्रिल (चौथा शनिवार)
- 27 एप्रिल (रविवार)Bank Holidays in april 2025 in maharashtra
ऑनलाईन बँकिंगची सोय :
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेत जाऊन व्यवहार करता येणार नाहीत. पण एटीएममध्ये बँकेचे व्यवहार करता येतील. एटीएम, ऑनलाईन बँकिंग सेवा आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि युपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येईल. त्यामुळे बँक बंद असताना पैसै देण्याचे आणि घेण्याचे व्यवहार एटीएम, ऑनलाईन बँकिंग सेवा आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून करावेत.
महत्वाचे बँकिंग व्यवहार (जसे कि लोन प्रोसेसिंग, चेक डिपॉजिट) सुट्ट्यापुर्वी पूर्ण करा. मोठ्या रक्कमेची देणी घेणी काही दिवस लांबणीवर टाका किंवा डिजिटल माध्यमातून व्यवहार पूर्ण करा.Bank Holidays in april 2025 in maharashtra
इतर सरकारी माहितीसाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Bank Holidays in april 2025 in maharashtra