BGauss RUV 350 Powerful इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्जवर 135 किमी | 50 मिनिटात फुल बॅटरी चार्ज

BGauss कंपनीने नवीन दमदार आणि नवनवीन फीचर्स असणारी इलेक्ट्रिक स्कूटर BGauss RUV 350 लॉंच केली आहे. BGauss कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हिरिएंटमध्ये लॉंच केली आहे. या तीनही मॉडेलची किंमत वेगवेगळ्या आहेत. बेस मॉडेलची किमंत 1.10 लाख रुपये आहे . मिड व्हिरिएंटची किंमत 1.25 लाख रुपये आहे. आणि टॉप मॉडेलसाठी किंमत 1.35 लाख रुपये जाहीर करण्यात आलेली आहे. या तिन्ही मॉडेलची नावे RUV 350i , RUV 350 EX , आणि RUV 350 Max अशी आहेत. लॉंच ऑफर अशी आहे की, कंपनीकडून 20,000/- रुपयांची सवलत सुद्धा देण्यात आलेली आहे. BGauss कंपनीची भारतात 120 डिलरशिप मार्फत स्कूटरची विक्री करण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊ स्कूटरचे फीचर्स आणि संपूर्ण माहिती. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BGauss RUV 350 माहिती 

BGauss कंपनीने आपली नवीन स्कूटर BGauss RUV 350 नवीन फीचर्ससह लॉंच केली आहे. RUV मध्ये तीन मॉडेल सादर करण्यात आले आहे. नवीन फीचर्स सहित तीन मॉडेल आहेत तीन व्हिरिएंटमध्ये असणाऱ्या स्कूटर RUV 350 i या बेस स्कूटरची किंमत 1.10 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. दुसरे मिड व्हिरिएंट RUV 350 EX या मॉडेलची किंमत 1.25 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरे टॉप MAX व्हिरिएंट किंमत 1.35 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. कंपनीने लॉंच सवलत दिलेली आहे यामध्ये 20,000/- रुपयाची सवलत दिली आहे आणि सोबत कॉन्टॅक्टड टेक, फ्री वॉरंटी आणि फ्री इन्शुरन्सचाही समावेश आहे. 

BGauss RUV 350 तीन व्हिरिएंट विक्री भारतातील BGauss च्या 120 डिलरशिप मार्फत जुले महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरु होईल. या स्कूटरची पूर्ण बॉडी मेटलची आहे. जबरदस्त असा इलेक्ट्रिक स्कूटरचा लुक आहे. ही स्कूटर पूर्ण फिचर पॅक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. पुण्यातील चाकण MIDC मध्ये या स्कूटरची पूर्णपणे निर्माती झाली आहे. 

BGauss RUV 350
BGauss RUV 350

BGauss RUV 350 फीचर्स 

  • बेस व्हिरिएंट मॉडेल RUV 350 i मध्ये स्टॅंडर्ड एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • तसेच टॉप अँड मॅक्स ट्रीममध्ये 5 इंचाची टीफटी स्क्रीन देण्यात आली आहे.
  • स्कॉउटरमध्ये पूर्णपणे एलईडी देण्यात आली आहे.
  • 15 लिटर अंडरसीट स्टोरेज सोबत 4.5 लिटर फ्लोअर बोर्ड स्टोरेज देण्यात आला आहे यामध्ये तुम्ही स्कूटरचा चार्जर ठेवता येतो.
  • BGauss RUV 350 स्कूटरमध्ये इको, राईड आणि स्पोर्ट असे तीन प्रकारचे मोड देण्यात आलेले आहे.
  • आपल्याला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल अलर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टव्हिटी मिळते.
  • स्कॉउटरमध्ये खूप लांब आणि रुंद भरपूर स्पेस सीट आहे.
  • BGauss RUV 350 स्कूटरमध्ये अंडर स्पेस असल्यामुळे हेल्मेट सामावून घेऊ शकते.
  • BGauss RUV 350 मध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
  • स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंग येते.
  • तिन्ही मॉडेलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहे. 
  • तीनही मॉडेलमध्ये 75 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड मिळू शकतो.
  • बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी बॅटरीमध्ये एलएलपी सेलचा वापर करण्यात आला आहे. 
  • तीनही मॉडेलमध्ये टीव्हीएस कंपनीचे टायर देण्यात आलेले आहे.
  • स्कूटरच्या दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहे. 

हे पण वाचा ⇓

बजाज इलेक्ट्रिक fast स्कूटर लॉन्च | Best Price 95,998/- जाणून घ्या संपूर्ण माहिती

टाटाची जबरदस्त EV 1 नंबर कार | जाणून घ्या सर्व फीचर्स आणि संपूर्ण माहिती

BGauss RUV 350

BGauss RUV 350 डिझाईन 
  • BGauss RUV 350 कोर्स बॉडी स्टाइल मिळते.
  • आपल्याला ई- स्कूटरप्रमाणे पूर्ण सपाट फ्लोर बोर्ड डिझाईन केला आहे.
  • या स्कूटरचे प्रमुख आकर्षण म्हणजे 16 इंचाची आलोय व्हीलस डिझाईन केली आहे.
  • हि दोन्ही चाके पूर्णपणे ट्यूबलेस टायरमध्ये गुंडाळी आहे. 
  • सीट लांबलचक आणि भरपूर रुंद असे डिझाईन कंपनीने केले आहे. 
  • स्कूटरमध्ये पाच कलर आहेत ब्लू, ग्रीन, ग्रे, रेड आणि व्हाईट. 
BGauss RUV 350 किंमती 
  • बेस मॉडेल RUV 350 i इलेक्ट्रिक स्कूटर किंमत 1.10 लाख रुपये आहे.
  • मिड रेंज RUV 350 EX इलेक्ट्रिकस्कूटर किंमत 1.25 लाख रुपये आहे.
  • टॉप स्पेक RUV 350 Max इलेक्ट्रिक स्कूटर किंमत 1.35 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम किंमती आहे.  
BGauss RUV 350 कलर 
  • ब्लू (Blue)
  • ग्रीन (Green)
  • ग्रे (Grey)
  • रेड (Red)
  • व्हाईट (White)
स्कूटरची बॅटरी
  • स्कूटरमध्ये 3kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. 
  • इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोटर आणि बॅटरी सीटच्या खाली आहे.
  • 50 मिनिटात पूर्ण बॅटरी चार्ज होते.
  • स्कूटरमधील मोटर 3.5 kW ची पॉवर आणि 165 nm चा टॉर्क जनरेट करते.
  • बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी एल एल पी सेलचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे बॅटरीची लाईफ जास्त काळ राहते.
  • एकदा पूर्ण बॅटरी चार्ज केल्यानंतर स्कूटर 135 किमी पर्यंतची रेंज आहे. 
  • स्कूटरमध्येच स्कूटरचा चार्जर ठेवता येतो.  

BGauss RUV 350

स्टोरेज 

BGauss RUV 350 स्कूटरमध्ये ओपन ग्लोव्हबॉक्स, मल्टिपल हुक आणि अंडर सीट स्टोरेज स्पेससह अनेक पर्याय आहे. जे हाफ हेल्मेट सामावून घेऊ शकतात. अतिरिक्त स्पेस आहे जी चार्जला सामावून घेऊ शकतात. 

BGauss RUV 350 नवीन स्कूटर हि टीव्हीएस आयक्यूब, अथर रिझट, बजाज चेतक आणि बरेज इलेक्ट्रिक स्कूटर या व्हिरिएंटला टक्कर देतील.   

BGauss RUV 350 Youtube review विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

FAQ’s

प्रश्न :  BGauss RUV 350 इलेक्ट्रिक स्कूटर कधीपासून उपलब्ध होईल?
उत्तर : जुलै 2024 पासून विक्रीसाठी भारतातील BGauss डीलरशीप मधून होईल.

प्रश्न : इलेक्ट्रिक स्कूटरची किंमती किती आहे?
उत्तर : बेस मॉडेलची किमंत 1.10 लाख रुपये आहे . मिड व्हिरिएंटची किंमत 1.25 लाख रुपये आहे. आणि टॉप मॉडेलसाठी किंमत 1.35 लाख रुपये

प्रश्न : इलेक्ट्रिक स्कूटर कोणते कलर आहेत?
उत्तर : स्कूटरमध्ये पाच कलर आहेत ब्लू, ग्रीन, ग्रे, रेड आणि व्हाईट.

प्रश्न : एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर किती किमी जाते?
उत्तर : BGauss कंपनीचा असा दावा आहे की, एका चार्जमध्ये स्कूटर 135 किमी जाईल.

प्रश्न : BGauss RUV 350 चे किती मॉडेल आहे?
उत्तर : तीन मॉडेल आहेत. मॉडेलची नावे RUV 350i , RUV 350 EX , आणि RUV 350 Max अशी आहेत. 

सारांश :
या लेखात आपण BGauss RUV 350 या इलेक्ट्रिक स्कूटर बदल माहिती पाहिली आहे यामध्ये किंमत आणि फीचर्स या बद्दल माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तुम्ही नवीन इलेकट्रीक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर BGauss RUV 350 या एक उत्तम पर्याय असू शकतो. हि माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद || 

Leave a Comment