Book My Home Mhada Pune पुण्यात घराच्या शोधात असणाऱ्या मित्रांनो, तुमच्यासाठी एक भारी बातमी आहे. MHADA पुणे मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. आता फक्त अर्ज करून तुम्हाला हक्काचं घर मिळू शकतं. काय सांगता, मस्त ना? काही शिल्लक राहिलेली घरं ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने वाटायची ठरवण्यात आलं आहे. ही योजना खास सामान्य प्रवर्गातल्या गरजू आणि पात्र लोकांसाठी आहे.
म्हणजे जर तुम्हाला अजून MHADA कडून घर मिळालेलं नाही आणि तुम्ही पात्र असाल, तर आता सोडतीची वाट न पाहता थेट अर्ज करून घर घेऊ शकता. कमाल आहे, होय ना? चला या बातमीत जाणून घेऊया, अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा? आणि घरांच्या लोकेशन बाबत माहिती.
Book My Home Mhada Pune
आता ही शिल्लक राहिलेली घरे तुम्हाला कशी मिळणार?
असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? तर ऐका – MHADA ने 15% सामाजिक गृहनिर्माण आणि 20% सर्वसमावेशक योजनांतून काही घरे तयार केली होती, पण मागणी कमी झाल्याने ती शिल्लक राहिली. मग आता ही घरे ऑनलाइन अर्जावर आधारित वाटायचं ठरवण्यात आलं आहे. जो आधी अर्ज करेल, त्याला आधी घर मिळेल, अगदी सोपं आणि सरळ..
मग अर्ज कधी आणि कसा करायचा?
तर लक्ष द्या, 10 एप्रिल 2025 म्हणजेच आज पासून अर्ज सुरू होणार आहेत. तुम्हाला फक्त https://bookmyhome.mhada.gov.in या वेबसाईटवर जायचं आणि नोंदणी करायची. सगळं ऑनलाइन होणार आहे, त्यामुळे घरी बसूनच सगळं करता येईल. फक्त अर्ज भरताना सगळी माहिती आणि कागदपत्रं नीट भरून अपलोड करा, म्हणजे काही अडचण येणार नाही.
नोंदणी प्रक्रिया : (Book My Home Mhada Pune)
या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हा आहे. पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावर (https://bookmyhome.mhada.gov.in) नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून, विकासकांकडून शिल्लक सदनिकांचा अहवाल प्राप्त होताच त्या सदनिकांचे वितरण सुरू होईल. (Book My Home Mhada Pune)
ही प्रक्रिया निरंतर चालणार असून, जोपर्यंत सर्व शिल्लक सदनिका वितरित होत नाहीत, तोपर्यंत ती सुरू राहील. पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि सभापती (राज्यमंत्री दर्जा) शिवाजी आढळराव पाटील यांनी सर्व गरजू आणि पात्र अर्जदारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
म्हाडा घराची ऑनलाईन नोंदणीसाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हफ्ता तारीख फिक्स, “या” दिवशी येणार 1500 रुपये
आता ही घरे कुठे आहेत, असं जर तुम्ही विचारत असाल तर –
जशी जशी विकसकांकडून घरांची माहिती MHADA ला मिळेल, तशी ती वेबसाईटवर अपडेट होत जाईल. म्हणून मित्रांनो, म्हाडाच्या वेबसाईटवर नजर ठेऊन बसा, कधी काय नवीन अपडेट येतंय का? हे नेहमी चेक करत राहा.
MHADA पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार “ही योजना अगदी पारदर्शक असणार आहेत आणि गरजू लोकांना घर मिळावं म्हणूनच तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा, हा चान्स सोडू नका.(Book My Home Mhada Pune)