आता पाण्याची चिंता मिटली; बोअरवेलसाठी 50 हजार रुपये सरकारकडून अनुदान, पहा संपूर्ण डिटेल्स | Borewell Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे – Borewell Anudan Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाणार असून, शेतीसाठी पाण्याचा ठोस स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेमुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना कमी खर्चात बोरवेलची सुविधा उपलब्ध होणार आहे. चला, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Borewell Anudan Yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे, आणि ती योजना म्हणजे ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’. या योजनेतून आता बोअरवेलसाठी 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजेच, आता शेतकऱ्यांना बोअरवेल खोदण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार नाही आणि त्यांना आता त्यांच्या शेतीच्या उत्पादनात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा पाण्याच्या समस्येवर मोठा निर्णय :

सदर योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 100% अनुदानावर सिंचनाच्या सुविधा पुरवत आहे. यात बोअरवेल खोदणे, नवीन विहिरींचे खोदकाम, प्लास्टिक अस्तरीत शेततळी, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पीव्हीसी पाइप बसवणे आणि जुनी विहीर दुरुस्ती यांचा समावेश केला गेला आहे. यामध्येच आता बोअरवेल देखील समाविष्ट करण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येकी 50,000/- रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय करता येणार असून, शेती करणे अधिक फायदेशीर आणि सोयीस्कर ठरणार आहे.

महाराष्ट्रातील “या” शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ | Borewell Anudan Yojana Maharashtra

सदर योजनेसाठी काही अटी आणि पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. 

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • अनुसूचित जमातीचा शेतकरी असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराकडे वैध जातीचा दाखला आवश्यक 
  • सातबारा उतारा आणि आठ अ उतारा असणे गरजेचे आहे. 
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्त्पन्न १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. 
  • ०.४० हेक्टर शेती अर्जदाराच्या नावे असावी.  हे सर्व निकष पूर्ण झाल्यास, शेतकरी या योजनेंतर्गत बोअरवेल साठी अनुदान घेऊ शकणार आहे. 

बोअरवेल अनुदानासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : 

सदर योजनेत अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

  1. आधार कार्ड
  2. जातीचा दाखला 
  3. उत्पनाचा दाखला 
  4. सातबारा व आठ -अ उतारा 
  5. 100 रुपयांच्या स्टम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र
  6. तलाठ्याचा दाखला (०.४० हेक्टर शेती असलेला)
  7. बोअरवेल साठी विहीर नसल्याचा दाखला 
  8. बँक पासबुक
  9. पासपोर्ट साईज फोटो

या सर्व कागद्पत्रा व्यतिरिक्त, कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र, गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र, जागेचा फोटो, आणि ग्रामसभेचा ठराव हि कागदपत्रे देखील हि अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक असणार आहे. 

बोअरवेल अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : 

  • सदर योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
  • बोअरवेल अनुदान मिळवण्यासाठी सगळ्यात आधी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर जाऊन लॉगिन करा.
  • त्यानंतर ‘शेतकरी योजना’ या विभागात जाऊन ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ निवडून या अनुदानासाठीचा अर्ज भरून सबमिट करा.
  • या योजनेसंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी सर्व इच्छुक व्यक्तींनी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधावा.Borewell Anudan Yojana Maharashtra
इतर सरकारची योजनांची माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Borewell Anudan Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment