CMF ने त्यांचा नवीन स्मार्टफोन CMF Phone 1 भारतात 8 जुलै 2024 रोजी लॉंच करण्यात येणार आहे. CMF चा जबरदस्त असा फोन लॉंच करण्यापूर्वी या फोनची संपूर्ण माहिती लीक झाली आहे. सोशल मीडियामध्ये या या स्मार्टफोनची भरपूर चर्चा ट्रेण्डिंगमध्ये आहे त्याचा CMF कंपनीने जाहीर केले आहे की या CMF Phone 1 भारतात 8 जुलै रोजी लॉंच करण्यात येईल. CMF ने या फोनचा टिझर जारी केल्यापासून सगळीकडे या फोनची चर्चा चालू झाली आहे. CMF हा Nothing चा सब ब्रँड आहे. या सोबतच कंपनी CMF Phone 1 , CMF Buds Pro 2 , आणि CMF Watch Pro 2 हे अजून प्रॉडक्ट लॉंच करणार आहेत. चला तर मग थोडा सुद्धा वेळ न घालवता या फोन विषयी संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूया.
CMF Phone 1 माहिती
CMF ने अतिशय स्वस्तात फोन लॉन्च करणार आहेत कमी किंमतीत भरपूर फीचर्स असणारा असा CMF Phone 1 ग्राहकांना खरेदी करणे एकदम फायदेशीर ठरणार असा हा फोन आहे. खूप कमी बजेटमध्ये हा फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. फोनची माहिती अशी आहे की, रियर कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे आणि सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 20,000/- रुपयांपेक्षा कमी किंमती या फोन लॉन्च होणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आलेले आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे आणि 33W फास्ट चार्जिंग स्पोर्ट देण्यात आलेली आहे. IP52 रेटिंग सोबत फोन भारतात लॉंच होणार आहे.
CMF Phone 1 किंमत
CMF Phone 1 हा फोन कंपनीने दोन व्हिरिएंटमध्ये लॉंच करणार आहे असे समजले आहे यामध्ये एक व्हिरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज याची अंदाजे किंमत 15,999/- असू शकते आणि दुसऱ्या व्हिरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज अंदाजे किंमत 17,999/- असू शकते ही अंदाजे किंमत आहे या किंमतीतच फोन लॉन्च होऊ शकतो. टिप्सटरच्या मते फोनच्या बॉक्सवर फोनची किंमत 19,999/- रुपये दिली आहे. त्यामुळे फोनची किंमत हि 20,000/- रुपयेपेक्षा कमी असू शकते.
फोनची विक्री 12 जुलै 2024 पासून दुपारी 12 वाजल्यापासून कंपनीची अधिकृत वेब साईटवरून आणि फ्लिपकार्ट, रिटेल स्टोरमधून सुरु होईल ब्रँड सेलच्या पहिल्या दिवशी 1000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट ऑफर मिळून जाईल.
हे पण वाचा ⇓
फक्त 9,000 मध्ये रिअलमी फोन लॉंच 50MP कॅमेरा | जाणून घ्या संपूर्ण माहिती
Oneplus Nord CE 4 Lite | Best बजेट फोन लॉंच 19,999/- जाणून घ्या, फीचर्स आणि संपूर्ण माहिती
CMF Phone 1 स्पेसिफिकेशन
कमी किंमतीत असणारा CMF Phone 1 फोन ग्राहकांना खूप फायदेशीर ठरणार आहे या फोनचे स्पेसिफिकेशन आपण जाणून घेऊया एका टिप्सटरने काही माहिती शेअर केलेली आहे हा फोन 8 जुलै 2024 रोजी लॉंच होणार आहे.
*प्रोसेसर*
CMF Phone 1 ओकोटा कोर चिपसेटने AnTuTu बेंचमार्क चाचणीमध्ये 6,73,000 गूण मिळवले आहेत या प्रोसेसरचा स्कोअर Snapdragon 782G , Dimensity 7050 आणि Snapdragon 6 Gen 1 चिपसेटपेक्षा चांगला आहे.
*डिस्प्ले*
CMF Phone 1 मध्ये 6.67 इंचचा AMOLED डिस्प्ले असू शकतो ज्यामुळे स्मार्टफोनला वेगळा प्रीमियम लुक मिळतो तसेच रिफ्रेश रेट 120Hz आहे. HDR10 + स्पोर्ट आहे. आणि 2000 नीटस पिक ब्रायनट्स दिला जाऊ शकतो. Media Tek Dimension 7300 5G SoC प्रोसेसरने सुसज्ज असा मिळू शकतो.
*कॅमेरा*
CMF Phone 1 स्मार्टफोन कॅमेराचा विचारलं तर या फोनमध्ये सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो जो सेंटर पंच होल कट आऊटमध्ये फिट होतो. आणि रियर मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेल + 50 मेगापिक्सेल मेन लेन्स कॅमेरा मिळू शकतो या फोनमध्ये AI Vivid मोड दिला जाऊ शकतो.
*बॅटरी*
फोनला पॉवर बॅक देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. आणि 33W ची फास्ट चार्जिंग दिली आहे. हा हँडसेट IP52 रेटिंग सोबत लॉंच होणार आहे.
*रॅम आणि स्टोरेज*
कंपनीने दोन व्हिरिएंटमध्ये फोन लॉंच करणार आहे एक 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि दुसरा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असे दोन व्हिरिएंट लॉंच होणार आहेत.
*कलर*
ब्लॅक, ऑरेंज, ग्रीन आणि ब्लू
CMF Phone 1 Features
OS | Android v14 |
Display | 6.67 inch, Super AMOLED Screen |
Camera | 50 MP + 50 MP Rear Camera & 16 MP Front Camera |
Processor | Mediatek Dimensity 7300 chipset, Octa Core Processor |
Battery | 5000 mAh 33w fast Charging, 5w Reverse Charging |
Connectivity | 4G, 5G, VoLTE, Bluetooth, WiFi |
Memory | 6/8GB RAM & 128GB |
USB | USB Type-C |
Sim | Dual Sim |
Colours | Black, Orange, Light Green and Blue |
CMF Phone 1 डिझाईन
फोनची मुख्य खासियत म्हणजे फोनचा बँक पॅनल तुम्हाला हवा तसा चेंज करता येतो यात कंपनीने चार कलरचे बॅक पॅनल दिले आहे यात ब्लॅक, ऑरेंज, लाईट ग्रीन, आणि ब्लू पॅनल मिळतील सोबत असणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरने तुम्ही बॅक पॅनल चेंज करू शकता.
FAQ’s
प्रश्न : CMF फोन 1 काय आहे?
उत्तर : CMF Phone 1 नवीन स्मार्टफोन आहे 50 MP कॅमेरा आहे, 5000 mAh ची बॅटरी आहे. 6/8GB RAM & 128GB स्टोरेज आहे.
प्रश्न : CMF Phone 1 कधी लॉंच होणार आहे?
उत्तर : 8 जुलै 2024 रोजी लॉन्च होणार आहे.
प्रश्न : कॅमेरा किती आहे?
उत्तर : 50 MP+ 50 MP Rear Camera & 16 MP Front Camera
प्रश्न : फोनमध्ये बॅटरी किती आहे?
उत्तर : 5000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली आहे.
प्रश्न : फोनची किंमत किती आहे?
उत्तर : 20000/- पेक्षा जास्त किंमत नसणार.