महाराष्ट्रात डिजिटल रेशनकार्ड सुरु, तुम्ही पात्र आहात का? “या” पद्धतीने काढून घ्या डिजिटल रेशनकार्ड | Digital Ration Card Maharashtra In Marathi

Digital Ration Card Maharashtra In Marathi आज रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्याच्या वितरणासाठी नव्हे, तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि ओळखळपत्र म्हणून महत्वाचे दस्तऐवज मानले जाते. रेशन कार्ड सरकार मान्य मानलं जात. आज आपण या लेखात डिजिटल रेशन कार्ड मोबाइलवरून कसे डाउनलोड करणार आहोत त्याचे कोणते फायदे आहे आणि कोणाला डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे हे पाहणार आहोत.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Digital Ration Card Maharashtra In Marathi

Digital Ration Card संपूर्ण माहिती : 

रेशन कार्ड हे कुटुंबातील सदस्यांची अधिकृत माहिती दर्शवतं. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी याचा आधार घेतला जातो. पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा म्हणून विविध ठिकाणी वापर केला जातो. पासपोर्ट, गॅस कनेक्शन, बँक खाते उघडण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं. ग्रामीण भागात तर हे सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं.

रेशन कार्ड हे अनेक कुटुंबांसाठी केवळ ओळखपत्र नाही तर स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी अत्यावश्यक साधन आहे. मात्र रेशन दुकानात जाताना कार्ड घरी विसरल्यास किंवा नवीन कार्ड अजून मिळाले नसेल, तर चिंता वाटणं स्वाभाविक आहे.

आता या त्रासातून सुटका मिळणार आहे. भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक सोयीस्कर डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे – ‘Mera Ration 2.0’ नावाचं अ‍ॅप. (Digital Ration Card Maharashtra In Marathi) या अ‍ॅपच्या मदतीने वापरकर्ते मोबाईलवरच आपलं डिजिटल रेशन कार्ड पाहू शकतात आणि तेच रेशन दुकानदाराला दाखवून धान्य मिळवू शकतात.

Digital Ration Card Maharashtra

डिजिटल रेशन कार्ड कसे वापराल?

1. सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘Mera Ration 2.0’ हे अ‍ॅप Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करा.

2. अ‍ॅप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडा आणि तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.

3. नंतर ‘Login with OTP’ वर क्लिक करा. आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.

4. लॉगिन झाल्यावर तुमचं डिजिटल रेशन कार्ड मोबाईल स्क्रीनवर दिसेल.

5. हे कार्ड दुकानदाराला दाखवून धान्य घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण न्यूज; मे महिन्यात “या” महिलांना 3000 रुपये एकदम जमा होणार, ह्या महिला पात्र असणार?

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

निष्कर्ष :

जर तुमच्याकडे अजून रेशन कार्ड नसेल आणि सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारायच्या टाळायच्या असतील, तर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळावर किंवा आपले सरकार पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. https://rcms.mahafood.gov.in ही सेवा मोबाईल-आधारित असल्यामुळे तुमचं कार्ड कधीही आणि कुठेही सहजपणे उपलब्ध होईल. त्यामुळे रेशन कार्ड विसरल्याने धान्य मिळण्यात अडथळा येणार नाही.

Disclaimer :
Digital Ration Card Maharashtra In Marathi वरील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केली गेली आहे. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शासकीय कार्यालयांतून सविस्तर माहिती घ्यावी. या योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल स्वतः चौकशी करून खात्री करावी. या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment