Free Sand For Gharkul Yojana घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र सरकारने घरकुलधारकांसाठी (Gharkul yojana) 05 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि घर उभारणीचा खर्च काही प्रमाणात कमी होईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला गेला आहे.
Free Sand For Gharkul Yojana
सरकारने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी मोफत वाळू योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, घरकुल बांधकामाचा खर्च कमी होईल. ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, ज्या ठिकाणी आम्हाला इन्व्हरमेंट क्लियरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होतील. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
कोण पात्र आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थी असलेले नागरिक
- ज्या नागरिकांना घर बांधणीसाठी सरकारी मान्यता घेतली आहे.
- संबंधित जिल्ह्याच्या महसूल विभागात नोंदणी असलेल्या लाभार्त्याना हि सुविधा दिली जाईल. Free Sand For Gharkul Yojana
Free Sand For Gharkul Yojana online
ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे :
सदर नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. |
अर्जासोबत घरकुल मंजुरी पत्र, ओळखपत्र आणि बांधकाम परवानगी दस्ताऐज संलग्न करणे आवश्यक आहे. |
पात्र नागरिकांना पाच ब्रास वाळूची परवानगी पत्राद्वारे दिली जाईल. |
वाळू संबधीत अधिकृत घाटावरून सरकारी नियमानुसार वाहतूक करून नेता येईल.Free Sand For Gharkul Yojana |
याशिवाय तुम्ही 5 ब्रास वाळूसाठी शासनाच्या “महाखनिज” अँपवर सुद्धा नोंदणी करू शकता.
वाळू ठेक्याची किंमत :
प्रति ब्रास 137 रुपये, त्यावर 600 रुपये रॉयल्टी, 10% डीएम (जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी), तसेच स्वॉप्टवेअर कंपनीचे शुल्क यांचा समावेश होतो. त्यामुळे एकूण किंमत सुमारे 1250 ते 1350 रुपये प्रति ब्रास असेल.
मोफत 5 ब्रास वाळू योजनेचे फायदे :
शासकीय प्रकल्प जलद पूर्ण होतील : घरकुल आणि इतर पायाभूत सुविधा गतीने उभारता येतील. |
घरकुल बाधणाऱ्यांसाठी मोठा दिलासा : वाळू मोफत मिळाल्याने बांधकाम खर्च कमी होईल. |
नदीतील वाळू उपशावर नियंत्रण : पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. |
M सॅण्डला चालना : कृत्रिम वाळूचा अधिक वापर वाढेल, परिणामी नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण होईल.Free Sand For Gharkul Yojana |
5 ब्रास वाळूसाठी आवश्यक कागदपत्रे :
- बांधकामाचे ठिकाण
- आधारकार्ड
- मिळकत उतारा
याशिवाय, इतर नागरिकांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. वाळू मिळवण्यासाठी नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
सरकारी योजनांची माहिती | येथे क्लिक करा ⇐ |
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.
महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Free Sand For Gharkul Yojana