शासनाचा निर्णय; घरकुलसाठी आता मिळणार 50 हजार वाढीव अनुदान, “या” नागरिकांना होणार फायदा | Gharkul Yojana Anudan Amount

Gharkul Yojana Anudan Amount गावागावांतील गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानात 50000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण 2 लाख 9 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये 15000 रुपये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gharkul Yojana Anudan Amount

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब कुटुंबांसाठी आज एक महत्त्वपूर्ण दिवस ठरला आहे. राज्य सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-जी) मोठी घोषणा केली असून, घरकुल योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय लाभार्थ्यांना मोफत वीज पुरवठ्यासाठी सौर पॅनेलची सुविधाही देण्यात येणार आहे.

आता कोणकोणते लाभ मिळणार?

  • PMAY अंतर्गत मुख्य अनुदान – ₹1,20,000
  • मनरेगामधून 90 दिवसांची मजुरी – ₹27,000
  • स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयासाठी – ₹12,000
  • नवीन वाढीव अनुदान (राज्य शासनाकडून) – ₹50,000
  • एकूण मिळणारे अनुदान – ₹2,09,000

हा निर्णय का घेण्यात आला?

सध्या घरकुलासाठी लागणारे बांधकाम साहित्य महाग झाले आहे, वाळूची टंचाई जाणवत आहे, आणि अनुदान अपुरे पडत होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली होती. आता सरकारने हे लक्षात घेऊन 50000 रुपयांचे (Gharkul Yojana Anudan Amount) वाढीव अनुदान मंजूर केले आहे. 

Gharkul Yojana Anudan

सौर ऊर्जा यंत्रणेचा समावेश :

घरकुलांवर हरित व स्वच्छ वीजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढीव अनुदानातील ₹15,000 हे सौर यंत्रणा उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

वाळूचा प्रश्न कधी सुटणार? :

घरकुलासाठी आवश्यक असलेली वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण अद्याप सुधारित धोरण स्पष्ट नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाळूचे लिलाव रखडलेले आहेत. शासनाने कारवाईत जप्त केलेली व लिलावातील वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचे नियोजन केले आहे.

राज्य सरकारने या योजनेसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाणार आहे. प्रत्येक टप्प्यातील बांधकामाची छायाचित्रे आणि जिओ-टॅगिंग करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. घरकुलाची मालकी महिलांच्या नावावर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. तसेच विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांना या योजनेत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. 

योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी राज्य सरकारने विशेष यंत्रणा स्थापन केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांमार्फत लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि मदत पुरवली जाणार आहे.(Gharkul Yojana Anudan Amount)

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण न्यूज; लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थी लिस्ट जाहीर, चेक करा अपात्र यादी

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरता येईल आणि त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा घेता येईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||(Gharkul Yojana Anudan Amount)

Leave a Comment