Gudi Padwa 2025 Marathi ; गुढीपाडवा शुभ मुहूर्त दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करा आणि ‘या’ वस्तू खरेदी करू नका, संपूर्ण माहिती पहा

Gudi Padwa 2025 Marathi आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजेच गुढीपाडवा या गुढीपाडव्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त असणार आहे त्याचप्रमाणे आपण गुढीला कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे आणि कोणत्या वस्तू खरेदी केल्या नाही पाहिजे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gudi Padwa 2025 Marathi

जगभरातील सगळे महाराष्ट्रीयन लोक या दिवशी आपल्या घराच्या दारात, खिडकीत किंवा बाल्कनीत गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात करतात.

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात आणि खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेकजण गुढीपाडव्याला नवीन कपडे, धातू, गाड्या, घर अशा अनेक गोष्टींची खरेदी करतात. परंतु, या दिवशी काही विशिष्ट वस्तूंची खरेदी टाळावी असे ज्योतिषशास्त्र सांगते. चला जाणून घेऊया गुढीपाडव्याला कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात.

गुडीपाडव्याच्या शुभ मुर्हतवर “या” वस्तू खरेदी करा : 

नवीन कपडे आणि भांडी

या दिवशी नवीन कपडे आणि स्वयंपाकासाठी लागणारी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

सोने आणि चांदी

या दिवशी सोन्याचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि घरात आर्थिक स्थिरता निर्माण करते.

गाडी किंवा घर

नवीन गाडी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेली मोठी गुंतवणूक आर्थिक उन्नतीस मदत करते असे मानले जाते.

धान्य आणि अन्नधान्य

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्य खरेदी करणे घरात समृद्धी टिकवते आणि अन्नसाठा टिकून राहण्याचे अश्वासन देते, असे मानले जाते.

गोड पदार्थ

कोणत्याही सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी गोड खरेदी करणे आणि ते वाटणे शुभ मानले जाते.

गुडीपाडव्याच्या शुभ मुर्हतवर “या” वस्तू खरेदी करू नका : 

जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू

सेकंड-हँड कपडे, विविध वस्तू किंवा उपकरणे गुढीपाडव्याला खरेदी करणे अशुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

उधारीवर वस्तू घेणे

गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू उधारीवर घेणे टाळावे. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात असे मानले जाते.

लोखंडाच्या वस्तू

या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करण्याचे टाळावे, कारण लोखंड नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

Gudi Padwa 2025 Marathi गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्प करण्याचा, सकारात्मकता वाढवण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण. योग्य खरेदी करून आणि शुभ गोष्टींचा स्वीकार करून आपण हे नववर्ष अधिक आनंददायी आणि समृद्ध करू शकतो. त्यामुळे या सणाचा उत्साहात आणि सकारात्मकतेने साजरा करा.

Disclaimer : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. marathibharat.com वेबसाईट अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.Gudi Padwa 2025 Marathi

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

सदरील महाराष्ट्र सरकारी योजनेची माहिती तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना सुद्धा या नवीन नियमाची माहिती होईल आणि या माहितीचा त्यांना फायदा होईल.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन योजनेच्या माहितीसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद ||Gudi Padwa 2025 Marathi

Leave a Comment