दहावी, बारावी 2025 निकालाची तारीख ठरली, “या” दिवशी ऑनलाईन पाहता येणार | HSC SSC Result 2025 Maharashtra Board

HSC SSC Result 2025 Maharashtra Board यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावीच्या परीक्षाही लवकर घेण्यात आल्या होत्या. यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HSC SSC Result 2025 Maharashtra Board

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल यंदा नवीन पद्धतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरागत निकाल प्रक्रिया यंदा बदलली असून डिजिटल माध्यमांचा वापर करत विद्यार्थ्यांना अधिक सुलभपणे निकाल उपलब्ध करून देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. विशेषत: २१ लाख विद्यार्थ्यांसाठी डिजिलॉकर अॅप हे एक महत्त्वपूर्ण साधन ठरणार आहे.

मे महिन्याच्या “या” दिवशी लागणार निकाल : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी आश्वासन दिल्यानुसार, यंदा निकाल नेहमीपेक्षा लवकर जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा आणि दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा, या हेतूने बोर्डाने यंदाच्या वर्षी परीक्षा आधीच घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

परीक्षेतील नाविन्यपूर्ण बदल :

यावर्षी दहावी-बारावीच्या (HSC SSC Result 2025 Maharashtra Board) परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले, जेणेकरून निकाल प्रक्रिया वेगवान होईल. क्रीडागुणांची नोंदणी २१ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आली असून, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण :

छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर, मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यात बारावीची ४६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. या पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ८५ हजार ३३० विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यात ९५ हजार ६९७विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २४९ परीक्षा केंद्रावरुन बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यानंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात आल्या. उत्तरपत्रिकांची वेळेत तपासणी व्हावी यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ८ एप्रिलपर्यंत जवळपास पूर्ण उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्याची अधिकाऱ्यांनी दिली.

HSC SSC Result 2025 Maharashtra Board Online

महाराष्ट्र बारावीच्या निकालाची तारीख 2025 :(HSC SSC Result 2025 Maharashtra Board)
महाराष्ट्र बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसलेले विद्यार्थी चालू आणि मागील वर्षांच्या निकालाच्या तारखा खाली पाहू शकतात:

महाराष्ट्र बोर्ड निकाल (वर्ष) निकालाच्या घोषणा तारखा
2022 07 जून 2022
2023 25 मे 2023
2024 21 मे 2024
2025 मे 2025 पहिल्या आठवड्यात 

 

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 ऑनलाइन कसा पाहायचा :

  • पुढील एका अधिकृत वेबसाइटवर जा: mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in.
  • बारावीचा निकाल 2025 साठी लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील (जसे की सीट नंबर) एंटर करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • तपशील तपासा आणि नंतरसाठी निकाल डाउनलोड करा.

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 एसएमएसद्वारे तपासा :

  • तुमचे मेसेजिंग अँप उघडा.
  • MHHSC टाइप करा आणि त्यानंतर तुमचा सीट नंबर (त्यामध्ये जागा ठेवून) टाइप करा.
  • तो 57766 वर पाठवा.
  • तुम्हाला तुमचा निकाल एसएमएसद्वारे मिळेल.
  • तो सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या.
सरकारी GR माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment