Jagriti Yatra Scheme In Marathi आज आपण पाहणार आहोत की फक्त शंभर रुपयात आपल्याला पूर्ण देशात प्रवास कसा करता येईल यासाठी आपल्याला काय करावे लागेल कोणती योजना आहे आणि कोणत्या योजनेअंतर्गत हा प्रवास आपल्याला मिळणार आहे याविषयीची माहिती आपण आज बघणार आहोत.
Jagriti Yatra Scheme In Marathi संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी देशातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला जर प्रवास करायचा असेल आणि तो प्रवासाचा भाग तुमच्या आवडीचा असेल पूर्णभार पद्धत तुम्हाला प्रवास करायचा असेल तर फक्त तुम्हाला शंभर रुपये लागतील व फक्त शंभर रुपये तुम्हाला पूर्ण भारतभर प्रवास करता येईल नेमकी कोणती अशी योजना आहे
या योजनेचा फायदा कसा घेता येईल पात्रता काय असतील फॉर्म कुठे भरावा लागेल आणि आपल्याला कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रवास करता येईल कोणत्या तारखेला प्रवास करता येईल त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर तुम्हाला प्रवास आवडत असेल तर नक्की हे तुमच्यासाठी खूपच चांगले माहिती आहे तर बघूया संपूर्ण माहिती
भारत असो वा परदेश…फिरायला कोणाला आवडत नाही? रोजच्या धावपळीच्या जीवनात काही दिवस विश्रांती घेऊन नवीन ठिकाणी फिरायला जाणं ही एक वेगळीच मजा असते. मात्र, अलीकडच्या काळात प्रवासाचा खर्च इतका वाढला आहे की अनेकांच्या स्वप्नांना वेळेअभावी आणि पैशांअभावी लगाम बसतो.
Jagriti Yatra Scheme In Marathi पण जर तुम्हाला फक्त 100 रुपयांत संपूर्ण भारतदर्शन करता आलं, तर? हो, हे खरं आहे! भारतात एक अनोखी ट्रेन आहे, जी तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यात फिरवते आणि तेही केवळ 100 रुपयांमध्ये…चला तर मग, जाणून घेऊया या विशेष ट्रेनविषयी सविस्तर माहिती.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण मे महिन्याचा 1500 रुपयाचा हफ्ता मिळाला का? मे हफ्ता वितरित यादी जाहीर, चेक करा आपले नाव?
या ट्रेनचं नाव काय आहे?
भारताच्या कोपऱ्याकोपऱ्यात अवघ्या 100 रुपयांत फिरवणाऱ्या या ट्रेनचे नाव आहे जागृती यात्रा. या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे. “उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचा विकास करणे.” ही ट्रेन गेल्या 17 वर्षांपासून नियमितपणे चालत आहे, तरीही आजही अनेकांना याविषयी फारशी माहिती नाही. जागृती एक्सप्रेस दरवेळी सुमारे 500 प्रवाशांना हा अनोखा प्रवास करण्याची संधी देते.
ही ट्रेन वर्षातून एकदाच चालते :
जर तुम्ही विचार करत असाल की हवी तेव्हा कधीही बुकिंग करता येईल, तर ते शक्य नाही. या ट्रेनसाठी अर्ज प्रक्रिया दर वर्षी मे महिन्यात सुरू होते आणि प्रवास नोव्हेंबरमध्ये सुरू होतो.
प्रवास किती दिवसांचा असतो?
जागृती एक्सप्रेस 15 दिवसांत सुमारे 8,000 किमीचा प्रवास करते. या दरम्यान प्रवाशांना केवळ भारतदर्शन नव्हे तर उद्योजकतेविषयी शिकवले जाते, व्याख्याने घेतली जातात आणि विविध उपक्रमांचे आयोजन होते.
प्रवाशांसाठी वयोमर्यादा काय आहे?
या ट्रेनमध्ये प्रवासासाठी वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. जर तुमचं वय या श्रेणीत नसेल, तर तुम्हाला या प्रवासासाठी पात्र ठरवले जाणार नाही.
या स्टेशनांवरून ट्रेन प्रवास करते :
जागृती एक्सप्रेसची यात्रा दिल्लीहून सुरू होते. त्यानंतर ही ट्रेन खालील प्रमुख ठिकाणांवरून प्रवास करते:
अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरू, मदुराई त्यानंतर ओडिशा, आणि मग मध्य भारत शेवटी पुन्हा दिल्लीला परत येते
या वर्षीचा प्रवास
प्रारंभ: 7 नोव्हेंबर 2025
समारोप: 22 नोव्हेंबर 2025
यात्रेसाठी निवड प्रक्रिया :
जागृती यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हालाही या खास प्रवासाचा भाग व्हायचं असेल, तर www.jagritiyatra.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकता.
या अर्जामध्ये काही प्रश्न विचारले जातात, जे तुमच्या विचारशैलीबद्दल, समाजासाठी काही करायची तयारी आहे का, आणि तुम्ही किती गंभीर आहात हे दाखवतात. हे प्रश्न थोडे विचार करायला लावणारे असतात, त्यामुळे काळजीपूर्वक उत्तरं द्यावीत.Jagriti Yatra Scheme In Marathi
तुमचे अर्ज वाचून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ तुमचा विचार करतात. काही वेळा तुमच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलद्वारे छोटासा संवाद (इंटरव्ह्यू) केला जाऊ शकतो.
जर तुम्ही Facilitator म्हणजेच सुविधादार म्हणून अर्ज करत असाल, तर तुमच्या अनुभवाला, नेतृत्वगुणांना, आणि तरुणांसोबत काम करण्याच्या क्षमतेला अधिक महत्त्व दिलं जातं. त्यासाठी एक स्वतंत्र फॉर्म भरावा लागतो आणि एक छोटा अनौपचारिक संवाद (इंटरव्ह्यू) होतो.
जर तुम्हाला शिष्यवृत्ती हवी असेल, तर तुमची आर्थिक स्थिती समजण्यासाठी काही माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात जसं की उत्पन्नाचा दाखला. ही माहिती आम्हाला खरंच गरजूंना मदत करता यावी यासाठी लागते.Jagriti Yatra Scheme In Marathi
हेही वाचा : क्लिक करा ⇒ खुशखबर; बँक रेपो रेटमुळे सोन्याच्या किंमती घसरण, गुंतवणुकीसाठी योग्य संधी उपलब्ध, आजचा सोन्याचा दर पहा
अर्ज कसा करावा?
- नोंदणी करा: अधिकृत वेबसाइटवर जा आणि “Apply Now” वर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- ईमेल पुष्टी: नोंदणीनंतर तुमच्या ईमेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचं खाते अॅक्टिव्ह करा.
- प्रवेश करा: नोंदणीकृत ईमेल व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- फी भरा: अर्ज प्रक्रिया शुल्क 100 भरून पुढील टप्प्याला जा.
- मुख्य अर्ज भरा: फी भरल्यानंतर अर्ज उपलब्ध होईल.
यामध्ये
पुढील तीन विभाग असतात :
1. तुमची वैयक्तिक माहिती
2. सामाजिक किंवा व्यवसायिक सहभाग
3. विचारसरणी आणि दृष्टिकोन
अर्ज पूर्ण करा व सबमिट करा: सर्व माहिती नीट भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
शिष्यवृत्ती माहिती
सर्वच अर्जदारांना संधी द्यावी, हाच यांचा उद्देश आहे. म्हणूनच, गरजू आणि पात्र उमेदवारांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते.
शिष्यवृत्ती ही गुणवत्तेवर आणि आर्थिक गरजांवर आधारित असते.Jagriti Yatra Scheme In Marathi
अर्जामध्ये शिष्यवृत्तीची विनंती दर्शविल्यास, निवडीनंतर शिष्यवृत्ती फॉर्म भरणे आवश्यक आहे.
अधिकृत उत्पन्नाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
इतर निधी संधी: यातून यात्रिकांना ट्रस्ट, महाविद्यालये, CSR कंपन्या यांच्याकडूनही सहाय्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. एक विशेष मार्गदर्शक पुस्तिका या संदर्भात दिली जाणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Jagriti Yatra Scheme In Marathi वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.