Ladki Bahin June Mahina Hafta लाडकी बहिणी योजना ज्या योजनेने मागील वर्षभरात संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळवली आणि ज्या योजनेने विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण वातावरणच बदलून टाकले असे महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना.
याच लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या अर्थातच बाराव्या हप्त्याचे वितरण दिनांक पाच जुलै पासून सुरू करण्यात आले आणि त्यानंतर आशा लावून बसलेल्या अनेक लाडक्या बहिणींची सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये निराशा करण्यात आली कारण त्यांना योजनेचा हप्ता जमा झाला नाही.
आता ज्या अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना पुन्हा हप्त्याचे वितरण होणार का योजनेचे पैसे उर्वरित महिलांना कधीपर्यंत जमा होतील अशी सर्व माहिती आपण आज घेणार आहोत.
Ladki Bahin June Mahina Hafta
नमस्कार लाडक्या बहिणींनो योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी नेहमीप्रमाणेच राज्य सरकारकडून महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 2985 कोटी रुपयांचा निधी जून महिन्याचा हप्त्याचा वितरणासाठी वर्ग करण्यात आला.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ गुड न्यूज; म्हाडाची नवीन जाहिरात आली, तब्बल 5285 घरांची लॉटरी “या” दिवशी होणार बुकिंगला सुरुवात
त्यानंतर 05 जुलैपासून प्रत्यक्षात महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे पंधराशे रुपये प्रमाणे जमा होण्यास सुरुवात झाली परंतु नेहमीप्रमाणे ज्या ज्या महिलांना सुरुवातीलाच हप्ते येतात त्यांना मात्र योजनेचे पैसे न मिळाल्याने त्या चौकशी करायला लागल्या अर्थातच चार-पाच दिवसांचा कालावधी नेहमीच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी लागतो परंतु तो कालावधी संपून देखील बहिणींना मात्र पैसे मिळाले नाहीत.Ladki Bahin June Mahina Hafta
जून महिन्याचे हफ्त्याचे वितरण पूर्णपणे बंद
आता जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण संपूर्णपणे बंद आहे आणि यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत कारण राज्य सरकार द्वारे बोलले गेले होते की ज्या काही 07 अटी देण्यात आले आहेत त्या अटींचे काटेकोरपणे अंमलबजावणी आता सुरू आहे.
परंतु अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला पैसे का मिळाले नाहीत असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारात आहेत तर ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून स्वतःचे अर्ज केले होते त्यांना वेबसाईट वरती तक्रार अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे.Ladki Bahin June Mahina Hafta
परंतु ज्यांनी नारीशक्ती मोबाईल ॲप्लिकेशन वरून अथवा ज्यांनी ऑफलाइन अंगणवाडी सेविका असतील किंवा नगरपंचायत ग्रामपंचायत अंतर्गत स्वतःचे अर्ज केले होते अशा महिलांना मात्र तक्रार अर्ज देखील करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने महिला प्रचंड नाराज आहेत.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ आनंदाची बातमी; लाडकी बहीण जून हफ्ता जमा झाला, आता “या” दिवशी जुलै हफ्ता 1500 रुपये जमा, तारीख फिक्स
योजनेसाठी तक्रार अर्ज
आता योजनेचा जून महिन्याचा हप्ता परत मिळणार का नाही याबद्दल सरकारकडून कितवा अथवा महिला व बालविकास विभागाकडून कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही त्यासोबतच किती महिलांना पैसे जमा झाले आहेत किती महिला अपात्र झाले आहेत याबद्दल देखील सरकारकडून कोणतीही आकडेवारी समोर आली नाही.Ladki Bahin June Mahina Hafta
विधिमंडळ अधिवेशनामध्ये बोलताना काही आमदारांनी देखील याबद्दल मागणी केली आहे की एखादी वेबसाईट सुरू करा ज्या वेबसाईटवर आपला आधार नंबर अथवा फॉर्म नंबर टाकल्यानंतर लाडक्या बहिनींना त्यांना पैसे येणार का नाही हे समजणार नाही किंवा पैसे येणार नसल्यास कोणत्या कारणामुळे पैसे घेणार नाहीत हे देखील त्यांना समजणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin June Mahina Hafta वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.