Ladki Bahin Loan Application महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी मागील दोन-तीन दिवसांपूर्वी मिळाली आणि या बातमीनुसार लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून राज्य सरकार द्वारे सुमारे 01 लाख रुपये बिनव्याजी कर्ज स्वरूपात मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
आणि यामुळेच सर्व लाडक्या बहिणी आता हे पैसे किंवा हे कर्ज कसे मिळवायचे यासाठी अर्ज कसा करायचा आणि यामध्ये पात्रता काय असणार आहेत कागदपत्र कोणती लागणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत तर त्या संदर्भातील सविस्तर पद्धतीने माहिती आपण आज घेणार आहोत.
Ladki Bahin Loan Application
लाडकी बहीण कर्ज योजना संपूर्ण माहिती :
नमस्कार लाडक्या बहिणींनो योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे कर्ज सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे आणि त्यांना व्यवसायासाठी भांडवल नाही किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी ज्यांना या व्यवसाय कर्जाची गरज आहे त्यांच्यासाठीच राज्य सरकार द्वारे आणि बँका द्वारे ही योजना राबवली जाते.
आता या योजनेअंतर्गत सुरुवातीला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी त्यांच्या व्यवसायानुसार आणि गरजेनुसार दहा हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याचे जाहीर केले. आणि या कर्जासाठी बिनव्याजी अर्थातच कोणत्याही प्रकारचे व्याज घेतले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.Ladki Bahin Loan Application
हेही वाचा : क्लिक करा ⇒ विद्यार्थ्यांनो मोफत टॅबलेट मिळवा ! Free Tablet Yojana Maharashtra योजनेसाठी आजपासून अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा
कारण राज्य सरकार द्वारे ज्या विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल किंवा इतरही जी महामंडळ आहेत जी ही व्याज परताव्याची काम करतात त्यांच्या मंडळांशी लाडक्या बहिणींना संलग्न करायचे आहे.
लाडकी बहीण योजना कर्ज घेण्यासाठी असा करा अर्ज
आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला देखील कर्ज पाहिजे असल्यास तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जावे लागणार आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा जो कोणता व्यवसाय असणार आहे त्या व्यवसायासंदर्भात आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
म्हणजेच की तुमच्या व्यवसायासाठी मशीनरी लागणार आहे का बर मशिनरी लागणार असल्यास त्याचे कोटेशन काय असणार आहे तुम्ही जागा घेणार की भाड्याने व्यवसाय करणार अशा संदर्भातील जी काय माहिती असणार आहे त्याचे करार असणार आहेत ते सर्व तुम्हाला बँकेमध्ये व्यवस्थित पद्धतीने आवश्यक असणारे कागदपत्र द्यावी लागणार आहेत. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप पाहून त्याची पडताळणी करून तुम्हाला दहा हजार रुपये ते एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज बँकेद्वारे त्वरित मंजूर केले जाणार आहे अर्थात यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणे देखील आवश्यक असणार आहे.Ladki Bahin Loan Application
कर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे कर्ज मिळण्यासाठी कागदपत्र कोणते आवश्यक असणार
- लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- व्यवसायाचा आराखडा
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
हेही वाचा : क्लिक करा ⇒ पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण जून हफ्ताची लिस्ट आली, “या” दिवशी 1500 रुपये जमा होणार
निकर्ष : Ladki Bahin Loan Application वरील सर्व कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की सुरुवातीला ही योजना फक्त मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरू केली असल्याने यामध्ये मुंबईमधीलच लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत.
पुढे इतरही जिल्ह्यातील बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका देखील या योजनेची अंमलबजावणी करतील असे बोलले जात आहे परंतु अजून तरी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारेच ही योजना सुरू असणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही मुंबईमधील रहिवासी असणे आवश्यक असणार आहे आणि मगच तुम्ही या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकता.
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin Loan Application वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.