Ladki Bahin Maharashtra News Today नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेबद्दल विविध प्रकारच्या अपडेट आपण प्रत्येक महिन्याला पहात असतो ज्यामध्येच मागील दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना तीस हजार ते 40 हजार रुपये कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे ज्या रकमेद्वारे ती महिला छोटा मोठा व्यवसाय करू शकते आणि तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते असे देखील दादांनी सांगितले.
आता ही योजना घोषित झाली आहे परंतु या योजनेबद्दलची अंमलबजावणीची प्रक्रिया अजूनही झाली नाही आणि त्यातच मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना आता मोफत पिठाची गिरण असेल किंवा वॉशिंग मशीन असेल यांसारख्या गृहपयोगी वस्तू मिळणार अशी बातमी पसरत आहे आता याबद्दल नक्की सत्यता काय आहे आहे तेच आपण आज जाणून घेऊया.
Ladki Bahin Maharashtra News Today
पिठाची गिरणी आणि वाशिंग मशीन मिळणार संपूर्ण माहिती
तर सुरुवातीलाच ही जी बातमी पसरत आहे ज्यामध्ये सांगितले जात आहे की केंद्र सरकार द्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी वॉशिंग मशीन असेल अथवा आटा चक्की असेल यासारख्या गृहपयोगी वस्तू मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि यासाठी तुम्ही तुमचे अर्ज करायचे आहेत.
तर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब एक लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी योजना आहे त्यामुळे यामध्ये केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा दूरधोरून संबंध नाही आणि म्हणूनच संपूर्ण देशातील महिलांना वॉशिंग मशीन असेल अथवा आटा चक्की असेल यांसारख्या वस्तू देणे हे शक्य नाही आणि त्यामुळेच ही जी बातमी पसरत आहे किंवा ही जी अपडेट येत आहे याबद्दल खात्री केली असता ही 100% खोटी असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजना जून हफ्ता जमा होण्याची तारीख फिक्स, 1500 की 2100 जमा होणार लगेच पहा
Free Ata Chakki Yojana Maharashtra 2025
मोफत आटाचक्की असेल अथवा पिठाची गिरण असेल ही कोणाला मिळती तर मित्रांनो यामध्ये लक्षात घ्या की ही जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या योजनांमध्ये या प्रकारचा लाभ दिला जातो.
त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या योजनांसाठी अर्ज करावा लागतो आणि तो अर्ज केल्यानंतर त्या अर्जामध्ये ज्या कुटुंबाची निवड होते त्या कुटुंबासाठी ही मोफत किंवा अनुदानावरती आटा चक्की दिली जाते यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचा संबंध येत नाही. लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येते आणि आटा चक्की ही तुम्हाला जिल्हा परिषद अंतर्गत मिळते त्यामुळेच या दोन्ही योजनांचा दुर दुरून कोणताही संबंध नाही.Ladki Bahin Maharashtra News Today
Ladki Bahin Yojana New Schemes 2025
मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास या योजनेमध्ये फक्त आणि फक्त महिन्याला पंधराशे रुपये लाभ ही एकमेव योजना सुरू आहे या अंतर्गत इतर कुठलीही योजना सुरू नाही. म्हणजेच जे लाडक्या बहिणींना सरकारकडून व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहेत त्या योजनेसाठी देखील फक्त घोषणा झाली आहे तिची देखील अजून कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
ज्यावेळी योजनांची अंमलबजावणी केली जाते त्यावेळी त्या योजनेचा शासन निर्णय असेल अथवा अधिसूचना प्रकाशित केली जाते त्यानंतर त्यामधील नियम व अटी असेल किंवा पात्रता असतील याबद्दल देखील एक प्रत काढली जाते आणि त्यानंतरच योजना प्रत्यक्षात सुरू होते. त्यामुळेच लाडक्या बहिणींना एक गोष्ट जी खात्री करायची आहे की तुम्ही असल्या कुठल्याही प्रकारच्या लिंक वर क्लिक करू नका अन्यथा तुम्हाला मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकतात. Ladki Bahin Maharashtra News Today
हेही वाचा : क्लिक करा ⇒ अधिवासींसाठी गुड न्यूज; स्वतःच्या हक्काच्या घरासाठी 2 लाखांचे अनुदान, अर्ज प्रक्रिया आताच सुरु
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची देखील चौकशी अनेक लाडक्या बहिणी करत आहेत तर जून महिन्याच्या आत त्याबद्दल राज्य सरकारकडून आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देखील सांगण्यात आले आहे की जून महिन्याचा हप्ता सर्व पात्र व लाभार्थी लाडक्या बहिणींना महिना संपायच्या आधी जमा करण्यात येणार आहे.
याचाच अर्थ साधारणपणे 24 ते 25 तारखेच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती प्रत्यक्षात योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात होऊ शकते. आता याबद्दल पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर अथवा तारीख फिक्स झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या वेबसाईटवर अपडेट मिळणार आहे त्यामुळेच आपला व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करायला विसरू नका.Ladki Bahin Maharashtra News Today
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
डिस्क्लेमर : वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून संकलित असून ती सामान्य जनतेच्या जागरूकतेसाठी दिली आहे. सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात, त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना लागू करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट अथवा स्थानिक प्रशासनाची खात्री करून घ्या. आम्ही कुठल्याही योजनेचे आर्थिक लाभ किंवा वेळबद्ध अंमलबजावणी याची हमी देत नाही.