ब्रेकिंग न्यूज; “या” जिल्हातील एक लाख लाडकी बहीण योजेनचा लाभ बंद; 11 वा हफ्ता कधी? मोठी अपडेट | Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected List

Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्र सोलापूर जिल्हयातील तब्बल 11 लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हफ्ते मिळाले. पण विधानसभा निवडणुकीनंतर निकषानुसार पडताळणी सुरु झाली आणि आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे.   

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्र सोलापूर जिल्हयातील तब्बल 11 लाख नऊ हजार महिलांना पहिले तीन हफ्ते मिळाले. निकषानुसार पडताळणी सुरु झाली यात चारचाकी वाहने असलेल्या, संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी सन्मान निधीतील महिला लाभार्थींचा लाभ एक हजाराने कमी करण्यात आला आहे. आता योजनेचा अकरावा हप्ता मेअखेर वितरित होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १५ हजार ५६६ महिलांकडे चारचाकी वाहने असल्याची यादी वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थी महिलांची देखील पडताळणी झाल्याने त्यात देखील हजारो महिलांचा लाभ बंद झाला आहे.

Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected List आता गावागावातील ज्या महिलांना लाभ मिळाला नाही, त्यांना ऑनलाइन तक्रार करता येत नाही आणि कोणाकडे तक्रार करायची हे माहिती नाही. त्यामुळे त्या महिला अद्याप लाभ मिळेल, या आशेवर आहेत.

मे हफ्ता “या” दिवशी मिळणार ?

शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत लाभ मिळणे अपेक्षित असल्याने मे अखेर योजनेचा पुढील हप्ता मिळेल, असे अधिकारी सांगत आहेत. पण, किती महिलांना तो लाभ वितरित होईल, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेच नाही.

त्याचप्रमाणे माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी महिलांना 2100 रुपये देणार अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आता सांगण्यात येत आहे की ज्यावेळेस राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्यावेळेस 2100 रुपये महिलांना देण्यात येतील त्याचप्रमाणे आता राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार.

Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected

सोलापूर जिल्ह्यातील 11 लाखांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी चारचाकी वाहने असलेल्या, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा लाभ बंद झाला आहे. तर शेतकरी सन्मान निधी योजनेतील महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयेच लाभ दिला जातोय. जिल्ह्यातील नेमके किती लाभार्थी कमी झाले हे जिल्हास्तरावर समजत नाही.

सर्व कामकाज मंत्रालय स्तरावरूनच :

१ जून २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. आता अकरावा हप्ता मेअखेर मिळणार आहे. दरम्यान, योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला व बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातूनच सुरू आहे. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले, दरमहा किती लाभार्थींना लाभ मिळाला किंवा नाही, याची माहितीच समजत नाही. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रारी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ सरकारचा धमाका; 35 लाख घरांची लॉटरी, “या” नागरिकांना मिळणार हक्काचे घर, पहा योजनेची संपूर्ण माहिती 

निष्कर्ष :
(Ladki Bahin Yojana 11th Hafta Rejected List) महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मागील हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment