Ladki Bahin Yojana 11th Installment Update महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मे महिन्याचे 1500 रुपये अद्याप जमा झाले नाहीत, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातारण आहे, मात्र समोर आलेय माहितीनुसार मे आणि जून महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये जूनच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana 11th Installment Update
मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार :
तथापि, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लाडकी बहीण योजने अंतर्गत सध्या एकूण 10 हफ्ते वितरित करण्यात आले असून लाभार्थी महिला 11 व्या हफ्त्याची प्रतीक्षेत आहेत.
Ladki Bahin Yojana 11th Installment Update | जूनमध्ये एकत्रित जमा होणार ?
स्थानिक अहवालानुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मे व जूनचे मिळवून 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वट पौर्णिमा या सणानिमित्त हा हफ्ता दिला जाऊ शकतो, असा अन्दाज व्यक्त करण्यात आला आहे. हा हफ्ता नेमका कधी येणार, याबाबत लवकरच महिला व बालविकास मंत्री अधिकृत माहिती देतील, अशी अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
माझी लाडकी बहीण योजना हि आर्थिक दृष्ट्या व गरजू महिलांसाठी आहे. या योजनेतून पात्र लाभार्थना दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येते. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 10 हफ्ते वितरित झाले असून, मे महिन्यासाठी 11 वा हफ्ता देय आहे.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना मिळणार 10 हजार रुपये, “या” योजनेत लगेच अर्ज करा, पहा संपूर्ण माहिती
अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीची कारवाई :
लाडकी बहीण योजनेतून 2652 शासकीय कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघडीस आले असून, शासनाने त्यांच्या विरोधात ३.५८ कोटी रुपयांची वसुली मोहीम सुरु केली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजनेची आर्थिक तरतूद :
या योजनेसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केली आहे. सध्याच्या चालू आर्थिक वर्षासाठी अंदाजे 3575 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये वितरण यंत्रणा, प्रशासकीय खर्च आणि इतर संबंधित खर्चांचा समावेश आहे.
मागील महिन्यांत अनेक लाभार्थ्यांना नियमित पेमेंट मिळत राहिले आहे, आणि आता 11व्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही.
हेही वाचा : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; मोफत भूखंड आणि घर देणार, “या” नागरिकांना घरकुल योजनेची सुवणर्संधी
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin Yojana 11th Installment Update वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या १००% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.