Ladki Bahin Yojana July Installment Date महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अखेरीस आनंदाची बातमी असणार आहे कारण मागील अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणीच्या हप्त्याची वाट पाहतो त्या तोच जून महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आज पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana July Installment Date
आता योजनेअंतर्गत दिनांक 30 जून 2025 रोजी राज्य सरकार द्वारे शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला होता ज्या शासन निर्णय द्वारे लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी सुमारे 2984 कोटींचा निधी राज्य सरकारद्वारे महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या वतीने हा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आज पासून जमा होत आहे.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ जम्बो भरती; बँक ऑफ बडोदा बँकेत तब्बल 2500 रिक्त जागांसाठी भरती सुरु, पदवीधर लगेच अर्ज करा
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले
तर मित्रांनो याबद्दल आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे कालच फेसबुक पोस्टद्वारे योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात अपडेट देण्यात आली होती आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की योजनेचा जून महिन्याचा हप्ता उद्यापासूनच सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होईल.
आता योजने अंतर्गत हा बारावा हप्ता असणार आहे आणि यापूर्वीच्या सर्व हप्त्यांमध्ये आपण पाहिले आहे सर्व लाभार्थी आणि पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास चार-पाच दिवसांचा कालावधी लागतो.
आणि त्यामुळेच आज वितरण सुरू झाले आहे परंतु सर्व लाभार्थी लाडक्या बहिणीच्या वरती पैसे जमा होण्यास दोन-तीन अथवा चार ते पाच दिवसांचा कालावधी देखील जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.Ladki Bahin Yojana July Installment Date
आज या जिल्ह्यांत होणार लाडकी बहिण हफ्त्याचे वितरण –
आता योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो की आमच्या जिल्ह्यामध्ये अथवा आमच्या तालुक्यांमध्ये किंवा आमच्या गावामध्ये कधीपर्यंत पैसे येणार ? तर मित्रांनो याचा असा काही फिक्स पॅटर्न नसतो परंतु आतापर्यंत आलेल्या पण पाहिले आहे की सुरुवातीला मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरित केला जातो.
हेही वाचा : क्लिक करा ⇒ PMRDA Sector 12 फेज 2, 6452 घरांचा प्रकल्प लवकरच पूर्ण, सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी खुला
(Ladki Bahin Yojana July Installment Date) त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर भागांमध्ये अथवा विभागांमधील जे जिल्हे आहेत मग ठाणे असेल पुणे असेल सोलापूर असेल नाशिक किंवा इतरही जे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत.
योजनेचा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे असणार आहे 2100 रुपयांबद्दल राज्य सरकारच्या द्वारे कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्याप तरी घेतला गेला नाही आणि त्यामुळे जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे आणि केवळ जून महिन्यात हप्ता जमा होणार आहे जुलै महिन्याबद्दल देखील कोणतीही अपडेट नाही.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer : Ladki Bahin Yojana July Installment Date वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे. आम्ही या बातमीच्या 100% सत्यतेची हमी देत नाही. त्यामुळे कृपया सखोल विचार करून आणि अधिकृत स्रोतांकडून पुष्टी करून घेऊन पुढील कार्यवाही करावी. कोणत्याही निर्णयापूर्वी संबंधित सरकारी विभागाकडून अधिकृत माहिती मिळवून घ्यावी.