Ladki Bahin Yojana May Hafta Date Status महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजेनसाठी आता आदीवासी विकास विभागाकडून मोठा आर्थिक हातभार देण्यात आला आहे. अनुसूचित जमातीतील महिलांना लाभ देण्यासाठी मे महिन्यासाठी या योजनेसाठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. शुक्रवारी आदीवासी विकास विभागाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे अधिवासी महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजने अंतर्गत मानधनाचे वाटप लवकरच होणार आहे.
Ladki Bahin Yojana May Hafta Date Status
या निधीचा उपयोग केवळ त्या आदीवासी महिलांसाठी केला जाणार आहे, ज्या योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत. या पूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले होते कि, अनुसूचित जमातीतील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा निधी आदिवासी विकास विभागाच्या बजेटमधून दिला जाईल. याच पार्श्वभूमीवर २०२५-२६ च्या अर्थसंकलपात अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी 21415 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या पैकी आदीवासी विकास विभागासाठी देण्यात 3420 कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठीच 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा होणार असून, यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारचा निर्णय आदिवासी भागांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जात आहे. यामुळे अनेक महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ लवकरच मिळेल आणि त्यांना स्वयंपूर्णतेचा आधार मिळेल.
मे हफ्ता उद्यापासून जमा होण्यास सुरुवात :
(Ladki Bahin Yojana May Hafta Date Status) माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेमुळे गरजूंना म्हणजेच गरीब महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये आर्थिक मदत मिळते. यामुळे महिलांना घरखर्च चालवायला आणि आपली स्वतःची गरज पूर्ण करायला मदत होते.
एप्रिल महिन्यात महिलांना दहावा हफ्ता (10 वा हफ्ता) मिळाला होता. आता मे महिन्यात अकरावा हफ्ता (11 वा हफ्ता) देण्यात येणार आहे. 26 ते 31 मे 2025 पासून ह्या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
योजनेचे कोणाला किती पैसे मिळणार ?
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की:
काही महिलांना फक्त ₹500 मिळतील. कारण त्या महिलांना आधीच ‘नमो शेतकरी योजना’ मधून ₹1000 मिळाले आहेत. काही महिलांना एप्रिलमध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यांना मे महिन्यात ₹3000 रुपये मिळणार आहेत.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
Disclaimer :
Ladki Bahin Yojana May Hafta Date Status वरील माहिती विविध स्रोतांमधून संकलित केली गेली आहे. कृपया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा शासकीय कार्यालयांतून सविस्तर माहिती घ्यावी. या योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल स्वतः चौकशी करून खात्री करावी. या लेखातील माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आम्ही या माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही हमी देत नाही.