Lakhpati Didi Yojana Maharashtra in marathi 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली आहे.
Lakhpati Didi Yojana Maharashtra in marathi
लखपती दीदी योजना संपूर्ण माहिती :
एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी हि योज़नदेखील चर्चेच्या केंद्र स्थानी आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलाना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी प्रयत्न केले जातात.
महिला कशा होणार लखपती?
लखपती दीदी योजनेनुसार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकवले जाणार आहेत. या ट्रेनिंगच्या दरम्यान महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठीही टिप्स दिले जातील. त्याचबरोबर आर्थिक विषयांची माहिती देण्यासाठी वर्कशॉप्स, बिझनेस प्लॅन, मार्केटिंग, बजेट, सेव्हिंग आणि गुंतवणुकीची माहिती दिली जाते.
त्याचबरोबर व्यवसासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह डिजिटल बँकिंग सर्विस, मोबाईल वॉलेट आणि फोन बँकिंगबद्दल देखील महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
Lakhpati Didi Scheme
सदर योजनेसाठी काय आहे पात्रता :
लखपती दीदी योजनेसाठी पात्रतेच्या अटी प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात वेगळ्या आहेत. पात्रतेचे सामान्य निकष खालीलप्रमाणे
- या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
- त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक.
- महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे.
- या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
कोणती कागदपत्रे लागणार आहे ?
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडं (Lakhpati Didi Yojana Maharashtra in marathi)
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- उत्पन्न प्रमाणपत्र,
- पत्त्याचा पुरावा,
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र,
- पासबूक,
- मोबाईल नंबर,
- पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा ?
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल, या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल.
हे पण वाचा : क्लिक करा ⇒ लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हफ्ता तारीख फिक्स, “या” दिवशी येणार 1500 रुपये
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :
- जरी ऑनलाईन अर्ज करता येत नाही तरी सरकारने सर्व सूचना देण्याकरिता एक ऑफिसियाला वेबसाईट प्रसारित केलेली आहे.
- सर्वप्रथम आपणास सरकारची योजना वेबसाइट lakhpatididi.gov.in वर जावे लागणार आहे.
- तेथे गेल्यावर तुमची नोंद करून खाते बनवणे आवश्यक आहे.
- नोंदणी करण्या करीत साइन उप नावाच्या पर्यायावर क्लीक करावे लागणार.
- मग आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमची सर्व जे मागितली आहे ती वैक्तिक माहिती टाकावी लागणार आहे.
- ते सर्व माहहती भरणं झाल्यावर तुमि जो मोबईल नंबर टाकला त्यावर एक OTP येईल, त्याच OTP चा उपयोग करून तुमाला लाग इन करायचे आहे.
- तुमच्या पुढे लखपती दीदी योजना फ़ॉर्म नावाचा एक पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे.
- तिथे तुमच्या पुढे जो फॉर्म ओपन होईल त्यावर व्यवस्थित माहिती भरून आणि काही कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचे आहे.(Lakhpati Didi Yojana Maharashtra in marathi)
| Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |
| Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा ⇐ |