महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या जन्मानंतर तिच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ (lek ladki yojana) सुरु करण्यास दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून शासनाने निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt.) मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, मुलींना शिक्षणात आर्थिक मदतीसाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी, ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी तसचे शाळा बाह्य असणाऱ्या मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘लेक लाडकी योजना’ (lek ladki yojana) राज्य शासनाने सुरु केलेली आहे ‘लेक लाडकी योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना टप्याटप्यामध्ये आर्थिक साहाय्य देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये देण्यात येतील याप्रमाणे लाभार्थी मुलीला एकूण रुपये १,०१,००० एवढी रक्क्म देण्यात येत आहे.
लेक लाडकी योजना माहिती | lek ladki yojana in maharashtra
महरराष्ट्रातील रहवासी असणाऱ्या कुटुंबातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी, गरीब कुटुंबासाठी ज्याचे वार्षिक उत्पन्न सरासरी १ लाख पेक्षा कमी आहे, अश्या कुटुंबातील मुलींना १,०१,००० रुपये आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत केले जाते ते अनुदान सहाय्य टप्याटप्याने पुढीलप्रमाणे दिले जाते. मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या कुटुंबाला ५ हजार रुपये दिले जातात. अजून एवढेच नाही तर मुलगी पहिल्या वर्गात गेल्यावर तिच्या कुटुंबाला ६ हजार रुपये दिले जातात. यानंतर या योजेने अंतगर्त मुलगी सहावी वर्गात पोहोचल्यावर कुटुंबाला ७ हजार रुपये मिळतात पुढे मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिला ८ हजार रुपये मिळतील. पुढे मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर DBT मार्फत तिच्या बँक खात्यावर ७५००० रुपये ट्रान्सफर केले जातात असे एकूण १,०१,००० रुपये मुलीला जन्मपासून ते प्रौढ होईपर्यत लेक लाडकी योजेने अंतर्गत पैसे दिले जातात.
लेक लाडकी अटी व शर्ती | lek ladki yojana form
- लाभार्थी कुटुंब हे मूळ महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक राहील, बाहेरील राज्यातील कुटुंब अपात्र असतील
- या योजनेसाठी कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी शिधाधारक (रेशन कार्ड) असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीचे कोणत्याही राष्ट्रीय कृत बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न सरासरी १ लाखापेक्षा जास्त नसावे.
- ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा या तारखेनंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील, तसचे एक मुलगी व एक मुलगा असले तर ही योजना मुलीला लागू राहील.
- पहिल्या लाभार्थी मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी महाराष्ट्र कुटुंब नियोजन प्रमाण पत्र सादर करणे अनिवार्य राहील याची नोंद घ्यावी.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जन्माला आलेली अपत्ये (बाळ) ही जुळी असली तर मुलगा व मुलगी असेल तर मुलगी पात्र असेल आणि दोनीही जुळ्या मुली असतील तर दोनीही मुली योजनेसाठी पात्र असतील पण मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील, त्यानंतर पित्याने किंवा मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य आहे.
लेक लाडकी योजेनची उद्देश | lek ladki yojana in marathi
- मुलींच्या जन्मास प्रोहासन देऊन राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि माता व पित्याचा आर्थिक भार कमी करण्यासाठी.
- या योजनेमुळे मुलींचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
- ग्रामीण व शहरी भागातील बालविवाह रोखण्यासाठी.
- राज्यातील मुलींचे कुपोषण कमी करण्यासाठी.
- या योजनेमुळे मुलगा व मुलगी भेदभाव कमी होईल
- शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आण्यासाठी आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोसाहित करणे.
- या योजनेमुले गर्भ हत्या रोखण्यास मदत होईल.
पाच टप्यांमध्ये रक्कम मिळणार ते खालीलप्रमाणे
1 | मुलगी जन्मानंतर | रुपये – 5000/- |
2 | जेव्हा मुलगी पहिली मध्ये गेल्यानंतर | रुपये – 6000/- |
3 | जेव्हा मुलगी सहावी मध्ये गेल्यानंतर | रुपये – 7000/- |
4 | जेव्हा मुलगी अकरावी मध्ये गेल्यानंतर | रुपये – 8000/- |
5 | जेव्हा मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर | रुपये – 75000/- |
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | lek ladki yojana documents
- लाभार्थीचा जन्म दाखला
- पिवळे अथवा केसरी शिधापत्रिका (रेशन कार्ड)
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी म्हणजे मुली जन्मनंतरच्या प्रथम लाभावेळी आधार कार्ड अट शिथिल राहील.
- माता आणि पित्याचे दोघांचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- आई व वडील यांचे मतदान ओखळपत्र ( शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असले पाहिजे)
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्त्पन्न १ लाखपेक्षाकमी जास्त नसावे.)
- मुलगी शाळेत शिक्षण घेत असल्याबाबतच संबधीत शाळेचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट)
- अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील ( मुलगी अविवाहित असल्याबाबत स्वयं घोषणापत्र)
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेबद्दल थोडक्यात माहिती | lek ladki yojana 2024
१ | योजनेचे नाव | लेक लाडकी योजना |
२ | कोणी केली घोषणा | महाराष्ट्र सरकार बाल व विकास महामंडळ |
३ | लाभार्थी | गरीब कुटुंबातील जन्माला आलेल्या मुली |
४ | एकूण रक्कम | रुपये – १,०१,०००/- |
५ | उद्देश | मुली जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यत आर्थिक सहाय्य |
६ | कोणाला मिळेल लाभ | पिवळे व केसरी शिधाधारकांना (रेशन कार्ड) |
७ | राज्य | महाराष्ट्र |
८ | अर्ज प्रक्रिया | अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म जमा करणे |
९ | स्थिती | ऍक्टिव्ह |
लेक लाडकी योजेनचे लाभ
- लेक लाडकी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी शिधाधारक (रेशन कार्ड) अशा कुटुंबाना मिळणार.
- लेक लाडकी योजेने मार्फत महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मांपासून ते त्यांच्या वयाच्या १८ वर्ष पूर्ण होईपर्यत त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन एकूण १,०१,००० रुपयांची आर्थिक मदत होईल.
- या योजनेच्या मार्फत राज्यातील गरीब कुटुंबातील मुली, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटूंबातील मुलींना कोणत्याही अडचणी, समस्या निमार्ण होणार नाही शिवाय त्या स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील आणि स्वतःचा विकास करू शकतील.
- जेव्हा मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होईल तेव्हा DBT च्या साहाय्याने या योजनेचे पैसे बँकेत जमा केले जातील जेणेकरून मुली पुढील शिक्षण घेऊ शकतात.
लेक लाडकी योजनेचे फायदे
- या योजनेमुळे मुलींचे शैक्षणिक भविष्य सुधारेल.
- या योजने अंतर्गत आर्थिक सहायतेमुळे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी चांगली नोकरी मिळवू शकतील.
- या योजनेमुळे गरीब कुटुंबातील मुलीला शिक्षणासाठी कोणावरही अवलंबून राहता येणार नाही ती स्वता स्वालंबी बनू शकतील.
- १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा फायदा होईल.
- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न १ लाखापेक्षा जास्त नाही अश्या लोकांना या योजनेचा फायदा होईल.
- महाराष्ट्र रहिवासी असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा फायदा आहे.
लेक लाडकी योजनेबाबत महत्वाच्या गोष्टी | lek ladki yojana information
- लेक लाडकी योजने अंतर्गत देण्यात येणारे विविध टप्यांमधील आर्थिक साहाय्य (रक्कम) हे थेट लाभार्थीच्या DBT मार्फत देण्यात येईल
- लाभार्थीचे बँक खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडावे.
- बँक खाते हे लाभार्थी व माता यांच्या नावे संयुक्त बँक खाते असणे आवश्यक (Joint account)
- जर मातेचा मृत्यू झाला असेल तर पिता व लाभार्थीचे संयुक्त बँक खाते असणे आवश्यक (Joint account)
- अधिक माहितीसाठी https://maharashtra.gov.in/ भेट द्या.
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा | lek ladki yojana registration
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबधीत ग्रामीण अथवा शहरी क्षेत्रातील संबधीत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे सोबत दिलेला फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून जमा करावी.
⇒ खाली अर्जाचा फॉरमॅट PDF दिला आहे. तो फॉर्म डाउनलोड करून घेणे.
⇒ यात तुमची वैयत्तिक माहिती, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, अपत्याची माहिती, बँकांची माहिती, तारीख, ठिकाण टाकून सही करणे.
⇒ सर्व कागदपत्रे जोडून अर्ज भरून झाला कि अंगणवाडी सेविकेकडे जमा करून पोहोच पावती घेणे.
लेक लाडकी योजना Government GR PDF डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
लेक लाडकी योजना अर्ज (Form) PDF डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
लेक लाडकी योजना प्रोसेस YouTube विडिओ पाहण्यासाठी क्लीक करा. ⇐
FAQ’s :- योजनेबद्दल प्रश्न आणि त्यांचे उत्तरे
प्रश्न : लेक लाडकी योजना काय आहे?
उत्तर : महाराष्ट्रातील मुलींना सरकारकडून अर्थ सहाय्य मिळते.
प्रश्न : लेक लाडकी योजना अर्ज आणि महाराष्ट्र शासन GR ?
उत्तर : लेक लाडकी योजना अर्ज व GR वरील बाजूस डाउनलोडसाठी दिलेला आहे.
प्रश्न : योजनेसाठी कोण पात्र आहे?
उत्तर : योजनेसाठी पिवळ्या व केसरी शिधाधारक (रेशन कार्ड) यांना व ज्यांचे वार्षिक उत्त्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे.
प्रश्न : अर्ज कोठे जमा करायचा ?
उत्तर : अर्ज अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा.
प्रश्न : कुटुंबातील किती मुलींना लाभ मिळतो ?
उत्तर : कुटुंबातील दोन मुलींना मिळतो.
प्रश्न : किती अर्थसाह्य मिळते ?
उत्तर : १,०१,००० एकूण रुपये.