मोठी बातमी; दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा, पहा संपूर्ण माहिती | Maharashtra 10th Result 2025

Maharashtra 10th Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष आता दहावीच्या निकालाकडे लागले आहे. विद्यार्थी ‘महा एचएससी बोर्ड डॉट इन’ (mahahsscboard.in) सह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. यंदा सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra 10th Result 2025

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण, “बारावीच्या निकालानंतर 10 दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु,” असे बोर्डाने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी mahahsscboard.in सह विविध वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

उद्या दहावीचा निकाल जाहीर :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या (१३ मे) दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर १० दिवसांच्या आत निकाल लागेल, असे म्हटले होते. त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्यातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. त्यामुळे शिक्षण मंडळ लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे.

दहावीचा निकाल कधी लागणार?

दहावीचा निकाल कधी लागणार, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न होते. अखेर बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल उद्या, १३ मे रोजी निकाल लागणार आहे. बोर्डाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल १५ मे च्या आत लागणार आहे. पण आता १३ मे ही परीक्षा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

SSC Result Website संपूर्ण माहिती 

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे दहावी बोर्डाचा निकाल(Maharashtra 10th Result 2025) उद्या लागणार आहे यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या बारावी बोर्डाचा निकाल देखील लवकर लागण्यात आलेले आहे त्याचं कारण एकमेव म्हणजे निकाल लवकर लावणे आणि निकाल लवकर लावला म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षा या लवकर लागणार आहेत त्यामुळे दहावी बोर्डाचा निकाल हा जाहीर झालेला आहे उद्या दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा?

दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी करते. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.

(Maharashtra 10th Result 2025) दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.

हे पण वाचा : क्लिक करा ⇒ पोस्ट ऑफिस नवीन योजना 2 लाख गुंतवा आणि मिळावा 89989 फिक्स व्याज, संपूर्ण माहिती पहा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी   येथे क्लिक करा ⇐

Leave a Comment