महाराष्ट्र राज्यात 9000+होमगार्डची बंपर भरती, आज ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra Home Guard Bharti 2024

Maharashtra Home Guard Bharti 2024 : तुम्ही दहावी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महाराष्ट्र होमगार्डमध्ये सुमारे 9000+ पदाची बंपर भरती निघाली आहे. ही नोकरी मिळवण्याची आणि देशाची सेवा करण्याची उत्तम संधी आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी पास, बारावी पास किंवा पदवीधर उमेदवार सुद्धा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र गृह विभाग व महाराष्ट्र होमगार्ड विभाग मार्फत प्रसिद्ध केली आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Home Guard Bharti 2024 माहिती 

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड विभागात तब्बल 9000 + जागांची भरती निघालेली आहे. तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी आहे आज ऑनलाईन अर्ज करा. यामध्ये शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास आहे. त्यानुसार बारावी पास किंवा पदवीधर सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही भरती निघाली आहे. तुम्ही तुमच्या जिल्हयात ऑनलाईन अर्ज भरू शकता. 

तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ऑनलाईन अर्ज भरू शकता. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, अर्ज भरण्याची शेवटची काय तारीख आहे, होमगार्डसाठी किती पगार असतो, प्रत्येक जिह्ल्यात किती होमगार्डच्या जागांच्या जागा आहेत, भरतीची जाहिरात PDF व त्यातील इतर सर्व संपूर्ण माहिती आपण खालील पाहणार आहोत आहे. 

Maharashtra Home Guard Bharti 2024 भरतीचा उद्देश 

देशातील जास्तीतजास्त नागरिकांना सैनिकी, तसेच आपत्कालीन मदतकार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. 

  • होमगार्ड सदस्य : महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना हि शासन संचालित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्य तीन वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवतेनुसार पुढे ३-३ वर्षाच्या टप्याने वयाच्या 58 वर्षा पुनः नोंदणीकृत करता येते.
  • होमगार्डचे कर्तव्य : होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्ये दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणेकमी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक, विमोचन, पुरविमोचन तसेच रोगराई /महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदतकार्य अशी कर्तव्य दिली जातात.

Maharashtra Home Guard Bharti 2024 होमगार्ड नोंदणी 

  • होमगार्ड भरतीसाठी उमेदवारानाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
  • होमगार्ड नोंदणीसाठी कोणत्याही प्रकरणे शुल्क आकारले जात नाही.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली वेबसाईटचे नाव दिले आहे. 
भरती विभाग  महाराष्ट्र गृहविभाग मार्फत होमगार्ड 
भरती प्रकार  सरकारी (महाराष्ट्र शासन) नोकरी मिळण्याची संधी 
भरती जिल्हे  महाराष्ट्रातील सर्व जिल्हे 
एकुण पदे  9000 +
पदाचे नाव  होमगार्ड जवान 
शैक्षणिक पात्रता  दहावी पास, बारावी पास किंवा पदवीधर 
वयोमर्यादा  वय वर्ष 20 ते 50 वर्ष 
अर्ज सुरु दिनांक  25 जुलै 2024 
अर्ज स्वीकारण्याची पद्धत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
नोकरी ठिकाण  स्वतःचा जिल्हा 
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक  प्रत्येक जिह्ल्याचा अर्ज स्वीकारण्याचा दिनांक वेगवेगळी आहे.
भरती कालावधी  कायमस्वरूपी 

 

हे पण वाचा ⇓

10 वी पास उमेदवारांना रेल्वेत सरकारी नोकरी, 3317 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Home Guard Bharti 2024 होमगार्ड पगार 
  • होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रुपये 570 /- कर्तव्य भत्ता 
  • आणि रुपये 100 /- उपहार भत्ता दिला जातो.
  • तसेच प्रशिक्षण काळात रुपये 35 /- खिसाभत्ता व रुपये 100 /- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये 90 /- कवायत भत्ता दिला जातो.
  • होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही.  
Maharashtra Home Guard Bharti 2024 होमगार्ड सदस्याचे फायदे 
  • सैनिकी गणवेश परिधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण 
  • संघटनेमध्ये सलग 3 वर्ष सेवा करणाऱ्या व 60 % उपस्थित असणाऱ्या होमगार्डला राज्य पोलीस दल, वनविभाग, अग्निशामक दलामध्ये 5 % आरक्षण.
  • प्रथमोपचार, अग्निशामक, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
  • गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार / पदके मिळविण्याची संधी.
  • शेती/ स्वतःचा व्यवसाय / नोकरी सांभाळून देशसेवा करण्याची संधी.
Maharashtra Home Guard Bharti 2024 होमगार्ड भरती नियम, पात्रता व अटी
  • शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी पास, बारावी पास किंवा पदवीधर 
  • शारीरिक पात्रता : वय वर्ष – 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत, उंची – पुरुषांकरिता – 162 से. मी.  महिलांकरिता – 150 से. मी. 

आवश्यक कागदपत्रे 

  • आधारकार्ड
  • रहिवाशी पुरावा 
  • शैक्षणिक सर्व कागदपत्रे 
  • जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र व शाळा सोडल्याचा दाखला 
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र 
Maharashtra Home Guard Bharti 2024 ऑनलाईन अर्ज भरणे
  • होमगार्डचे नोंदणी अर्ज उमेदवारांनी https:/maharashtracdhg.gov.in/mahahg/login.php या संकेतस्थळावर भारत येतील. अर्ज भरणेपूर्वी दिलेले माहिती पत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेतून भरायची असून माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरायची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मतारीख. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या साहाय्याने एकदाचा अर्ज भरता येईल.
  • उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्याना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हातील अर्ज बाद होतील.
  • अर्ज सबमिट केल्यावर Print Registration Form या मेनूमध्ये जाऊन त्याची प्रिंट आऊट काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनानी लिहायचे आहे. 
  • सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर करण्यात येईल.  
  • कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः सही केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी बंधनकारक राहील.
  • उमेदवारांनी नोंदणी करिता स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल नोंदणी दरम्यान किंवा प्रवासा दरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवारांची राहील.
  • अंतिम गुणवत्ता यादी याच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 

ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा

  • होमगार्डच्या विभागाच्या https:/maharashtracdhg.gov.in/mahahg/login.php या संकेत स्थळावर जाऊन HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सबमेनू निवडावा.
  • सर्व प्रथम जिल्हा select करावा. आणि नंतर अर्जतील संपूर्ण माहिती नीट भरणे.
  • अर्ज भरल्यानंतर आपल्याला एक 12 अंकी नंबर मिळेल तो नीट जपून ठेवावा.
  • यानंतर लिंग, संपूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ई मेल id ही माहिती काळजीपूर्वक भरावी.

Maharashtra Home Guard Bharti 2024

पुणे जिल्ह्यात किती रिक्त जागा खालीलप्रमाणे 

अ. क्र. पुणे जिल्हा  पुरुष  महिला  एकूण 
1 बारामती  82 19 101
2 भोर  39 17 56
3 दौंड  03 05 08
4 घोडेगाव  27 14 41
5 इंदापूर  12 21 33
6 जुन्नर  27 42 69
7 खेड  177 42 219
8 लोणीकाळभोर  66 19 85
9 पौड  57 20 77
10 पुणे शहर  482 98 580
11 सासवड  86 14 100
12 शिरूर  44 39 83
13 उरळीकांचन  80 18 98
14 वडगाव मावळ  104 56 160
15 वालचंदनगर  73 17 90
एकूण  1359 441 1800

उर्वरित रिक्त जागा महाराष्ट्रातील इतर जिल्हयात आहे. इतर जिल्ह्यातील माहिती खाली दिलेल्या वेबसाईटमध्ये आहे. 

महत्वाच्या लिंक्स 

भरतीची जाहिरात आणि PDF पाहण्यासाठी  येथे क्लीक करा 
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  येथे क्लीक करा 
Whats-app ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लीक करा 

 

टीप : ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी PDF जाहिरात पूर्णपणे नीट वाचावे.

मित्रांनो अश्या नवं नवीन सरकारी आणि खाजगी नोकरी अपडेट मिळविण्यासाठी आज आपल्या ग्रुपला जॉईन करा. 

वरील माहितीबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा आणि हि माहिती तुमच्या मित्रांना आणि गरजू लोकांना नक्की शेअर करा. धन्यवाद ||  

 

 

 

Leave a Comment